Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘त्या’ कारकुनाला पोलिस कोठडी

$
0
0
जमीन खरेदीच्या परवानगीची टिपणी तयार करून तिला मंजुरी मिळवून देण्यासाठी तसेच नजराणा भरण्याचे पत्र देण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अव्वल कारकुनाला कोर्टाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

प्रचारातून आमदार-खासदार गायब

$
0
0
येत्या २९ जून रोजी होणाऱ्या प्रभाग ६१ च्या पोटनिवडणुकीत आमदार आणि खासदार दोघांनीही अद्याप तितकासा रस दाखवलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार हेंमत गोडसे प्रभाग ६१ मध्ये फिरकलेच नसल्याने ही बाब विरोधकांच्या पथ्यावर पडणारी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

गोदावरी प्रदूषण ‘MPCB’ला समन्स

$
0
0
गोदावरी नदीच्या प्रदूषणास नाशिक महापालिका आयुक्त जबाबदार असल्याच्या याचिकेबाबत नाशिक कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) प्रादेशिक अधिकारी अंकुश फुलसे यांना समन्स जारी केले आहे.

खंडणी मागितल्याने २ तरुणांवर गुन्हा

$
0
0
शिवसेनेचे नांदगाव विधानसभा अध्यक्ष सुहास कांदे यांच्या नावाने खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयित तरुणांविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरेश वाडकरांच्या चौकशीचे आदेश

$
0
0
जमीन व्यवहाराप्रकरणात गायक सुरेश वाडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश नाशिक कोर्टाने भद्रकाली पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.

कांद्याचे निर्यातमूल्य घटवा

$
0
0
कांद्याचे निर्यात मूल्य शून्य करावे, अशी मागणी करीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत त्यांच्या मागणीचे निवेदन सादर केले.

महसूल सुविधा ‌आता ऑनलाइन

$
0
0
राज्याच्या महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सोयी-सुविधा, दाखले, प्रमाणपत्र यापैकी दहा सुविधा ऑनलाइन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सेवा सुरु करण्याचा आग्रह मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी धरला आहे.

‘राज-उद्धव समेटीचे प्रयत्न थांबव‌िले’

$
0
0
‘राज अन् उध्दव एकत्र‌ि‌त आल्यास महाराष्ट्रासाठी ही बाब आशादायी राहील. दोन्हीही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या मनातील ती सुप्त इच्छा आहे. मा‌त्र, सद्यस्थ‌ितीत तसे कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत आण‌ि ते दोघे एकत्र‌ित येण्याची फारशी शक्यताही नाही, अशी माह‌िती लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी द‌िल‌ी.

भाडेवाढीविरोधात काँग्रेसचे रेलरोको

$
0
0
मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ नांदगाव तसेच मनमाड शहर काँग्रेस कमिटीतर्फे मनमाड रेल्वेस्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात आले. हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस काही मिनिटे रोखून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेल्वे भाडेवाढीचा निषेध करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

जोगन यांना पोलिस कोठडी

$
0
0
येवला शहर पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक मंगल बाबुराव जोगन (वय २८) यांना बुधवारी निफाड येथील अतिरिक्त व सत्र न्यालायासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचे उपोषण

$
0
0
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या बोगस पंचनाम्यांची चौकशी करून मदतीपासून वंचित ठेवलेल्या पीडित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान अदा करावे, या मागणीसाठी सटाणा शहरासह मुंजवाडच्या बारा शेतकऱ्यांनी बुधवारपासून बागलाण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यात लाखोंचा घोटाळा

$
0
0
प्रत्यक्षात जमिनीवर कांदा, डाळिंब पीक नसताना बोगस पंचनामे करून बागलाण तालुक्यात शासकीय मदतीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय पथकाची ‘बीएचआर’वर धडक

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेतील (बीएचआर) सोळाशे कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेने कोणत्याही पूर्वसूचनेविना राज्यभरातील आपल्या शाखा बंद ठेवल्याच्या तक्रारींची केंद्रीय सहकार खात्याने गंभीर दखल घेतली आहे.

पीएफ ऑफिस झाले अपडेट !

$
0
0
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालय म्हटले की, तेथील संथ कामकाजामुळे येथे जाणाऱ्या कामगारा अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, असा आतापर्यंतचा समज होता. मात्र, पीएफ कार्यालयाने कात टाकली असून, ऑनलाइन प्रक्रियेसह जलदकामकाज पद्धती स्व‌िकारल्याने पीएफ ऑफिस अपडेट झाले असून, आता एका महिन्यात क्लेम प्र‌क्रिया पूर्ण होऊ शकणार आहे. यामुळे कामगारवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

हिंमतराव पाटलांची चौकशीच नाही

$
0
0
वनविभागातील भ्रष्टाचारासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फेब्रुवारीमध्ये काही संशयितांची यादी मिळाली होती. यामध्ये चवथ्या–पाचव्या क्रमांकावर पाटील एवढेच आडनाव होते. पाटील कोण याचा उलगडा होत नसल्याने पाटील आडनावाच्या व्यक्तीची चौकशीच झाली नव्हती अशी माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी बुधवारी दिली.

लालफितीत अडकले वसतिगृह?

$
0
0
आदिवासी विकास आयुक्तालयाने जुने सिडकोत कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली घरांची दयनीय अवस्था झाली आहे. आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची ३९ घरे पाडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव केवळ समन्वयाच्या अभावापायी मागे पडला आहे.

पिंपळगाव स्थानकाला बसेसचा असाही ‘बायपास’

$
0
0
नाशिक विभागातील सर्व आगाराच्या बसेसला पिंपळगाव बसस्थानकात थांबा द्यावा, या मागणीचे निवदेन पिंपळगाव आगारप्रमुख मनीषा सपकाळ यांना शहर शिवसेना व भाजपच्या वतीने देण्यात आले.

रेशनच्या गव्हात आढळले यूरिया, डीएपी

$
0
0
कळवाडी (ता. मालेगाव) येथील स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात आलेल्या गव्हात रासायनिक खत आढळल्याने संतप्त ग्रामस्थांनी संबधित धान्य दुकानदाराविरोधात ग्रामपंचायतीकडे दाद मागितली.

अंधांसाठी खुलं होतंय वाचनालय

$
0
0
श‌िक्षणाच्या मर्याद‌ित टप्प्यापल‌िकडे अंधांना वाचनासाठी मुबलक प्रमाणात अवांतर साह‌ित्यही उपलब्ध करुन देण्यात यावे, यासाठी नॅशनल असोस‌िएशन फॉर द‌ि ब्लाईंड (नॅब) च्या माध्यमातून दृष्टीबाधितांसाठी वाचनालय आण‌ि संदर्भ ग्रंथालय खुले करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (द‌ि.२७ जून) होणार आहे.

कर्जबाजारी पाल‌िकेला नकोशी झाली मदत

$
0
0
वृक्षलागवडीपोटी महापाल‌िकेचा होणारा तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचा खर्च वाचव‌िण्यासोबतच वृक्षलागवडीची हमी घ्यायला न‌िमा पुढे सरसावली आहे. मात्र, कुंभमेळ्याच्या तोंडावर कर्जाच्या ओझ्याखाली बुडतीला लागलेल्या महापाल‌िकेला हा मदतीचा हातही नकोसा झाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images