Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

$
0
0
रस्त्यावर बेशिस्तपणाचे दर्शन घडवत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर बुधवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सीबीएस आणि शालिमार येथील तब्बल २०० रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

शिवाजी सहाणे यांची उलटतपासणी संपली

$
0
0
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जयंत जाधव यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या जुलै अखेर निकाल लागण्याची शक्यता शिवाजी सहाणे यांनी वर्तविला आहे.

नाशिक होणार होर्डिंगमुक्त

$
0
0
शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणारे अनधिकृत होर्डिंग, फलक, पोस्टर्स लवकरच हटवावी लागणार आहे. अशा होर्डिंग्सवर चार आठवड्यांच्या आतच कारवाई करून १९ जुलैपर्यंत त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला दिले आहेत.

नगररचना सहसंचालक बदलीसाठी दबाव

$
0
0
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील अनेक बांधकामाचे प्रस्ताव रखडल्याने नाशिक महापालिकेतील नगररचना सहाय्यक संचालक विनय शेंडे यांची तातडीने बदली करावी अन्यथा एकही प्रकरण दाखल केले जाणार नाही, असा इशारा बिल्डर, इंजिनीअर तसेच आर्किटेक्ट यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

नेहमीचीच हिडीस फिडीस!

$
0
0
कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील संबध सर्वज्ञात आहेत. अधिकारी कसाही असला तरीही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढे हाजी-हाजी करावे लागते. त्यातील काही स्वाभिमानी कर्मचाऱ्यांनी जर तत्वात न बसणाऱ्या अधिकाऱ्याच्या सूरात सूर नाही मिळविला तर त्याची काही खैर नाही.

एसटी कर्मचाऱ्यांना अखेर पावली ‘लक्ष्मी’

$
0
0
एसटी महामंडळाचे तोट्याचे आकडे वाढतच असल्याने मुळातच वेतन कमी. ते वाढावे अशी रास्त अपेक्षा. मात्र, अपेक्षेनुरूप पगार न वाढता तोंडाला पानेच पुसली जातात. वाढीव फरकाची रक्कमही दोन वर्षे न मिळाल्याने कर्मचारी नाराज होते. परंतु, दिलेल्या शब्दाला जागत महामंडळाने बुधवारी थकबाकीतील अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली.

श‌िक्षकांच्या मेड‌िकल ब‌िलांची लागणार तड

$
0
0
शालेय श‌िक्षण आण‌ि क्र‌‌ीडा व‌िभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आण‌ि व‌िनाअनुदान‌ित शाळांमधील श‌िक्षक आण‌ि श‌िक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिलांबाबतच्या प्रलंब‌ित प्रकरणांची तड यापुढे त्वरित लागणार आहे.

तहसील कार्यालयात एजंटाला अटक

$
0
0
नाशिक तहसील परिसरात फिरणाऱ्या एका एजंटला खुद्द तहसीलदारांनीच बुधवारी पकडले असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, तहसिल परिसरात एजंटगिरी बोकाळल्याचा दावा खुद्द तहसिलदारांनीच केला आहे. सुभाष सानप असे पकडलेल्या एजंटचे नाव आहे.

पाथर्डी फाटा येथे ३ लाख लांबविले

$
0
0
मोटरसायकलच्या सिटखालील डिकी तोडून चोरट्याने ३ लाखांची रोकड लांबविली. पाथर्डी फाटा येथे सोमवारी दुपारी सव्वा बारा ते साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. केनी गिदुमल कटारीया (वय ४५, रा. सुंदरी बंगला, वझरेनगर, गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पाथर्डीफाटा येथील टोयोटा शोरूम समोर त्यांनी मोटरसायकल उभी केली होती.

काँग्रेसने रोखल्या रेल्वे गाड्या

$
0
0
मोदी सरकारने केलेल्या रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेस शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची पुन्हा कानउघाडणी

$
0
0
विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले हे नाशिक जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर अत्यंत असमाधानी आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असताना बुधवारी त्यांनी तब्बल पाच तास बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

‘सेंट फ्रान्स‌िस’विरोधात एकवटले पालक

$
0
0
त‌िडके कॉलनी परिसरातील सेंट फ्रान्स‌िस स्कूलने यंदा केलेली फी वाढ ही अवास्तव असल्याचा मुद्दा उचलत व‌िव‌िध संघटना आण‌ि पालक एकटावले आहेत. शाळेच्या व्यवस्थापनापासून तर श‌िक्षण व‌िभागापर्यंत या फी वाढीच्या व‌िरोधात पाठपुरावा केला जाणार आहे.

सायकल प्रवास करून विठुरायाला भेटणार

$
0
0
आषाढी एकादशीचे औच‌ित्य साधत नाश‌िक ते पंढरपूर हे सुमारे पावणे चारशे क‌िलोमीटर अंतर अवघ्या पाच द‌िवसात गाठण्याचा संकल्प त‌िघा नाश‌िककरांनी केला आहे. या यात्रेत संतांच्या अभंगांच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याचाही संकल्प त्यांनी सोडला आहे.

पगारवाढीवरून चांदवड टोलनाका बंद

$
0
0
चांदवड येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन बुधवारी दुपारी सुरू केले आहे. या नाक्यावर सुमारे दीडशे कर्मचारी असून अखिल भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी शुक्ल यांनी दिली.

चीनचा नाशकात इंडस्ट्रीअल पार्क

$
0
0
जगातील वेगवान अर्थव्यवस्था असलेल्या चीन सरकारने भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत नाशकात इंडस्ट्रीअल पार्क साकारला जाणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली आहे.

व‌िजेच्या दांडीने उद्योजकांना घोर

$
0
0
व‌िजेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात उद्योजक त्रस्त झाले असून, महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका उत्पादन निर्मितीला बसत आहे. परिणामी, जिल्ह्यात उद्योजक संतप्त झाले आहेत.

कांदा @ २१००

$
0
0
कांद्याचे निर्यातमूल्य वाढूनही दर दिवसागणिक वाढतच आहेत. बुधवारी सटाणा बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक २१०० रुपये तर लासलगाव बाजार समितीत २००१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मनमाड, येवला, पिंपळगाव बसवंत येथेही कांद्याचे भाव वाढल्याचे दिसून आले.

कष्टाने उजळले भविष्य

$
0
0
इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या व्यक्ती खूप होऊन गेल्या. पण बिकट परिस्थितीवर, आजारावर मात करूनही आपल्याला हवी ती गोष्ट मिळविण्याचं कसब काही लोकांनाच साध्य होतं. असंच कसब आत्मसात करुन नाशिकच्या प्रदीप निकाळजेने दहावीच्या परिक्षेत ७३.६० टक्के मार्क मिळवले आहेत.

..अन् पुन्हा फुलले दहावीचे वर्ग

$
0
0
ऑनलाईन पध्दतीने दहावीचा न‌िकाल अगोदरच जाहीर झाल्याने गुरुवारी मार्कशीट हाती घेण्याची केवळ औपचारिकताच उरली होती. तरीही, शाळेतील जुन्या वर्गांभोवती दहावीच्या व‌िद्यार्थ्यांची पावले थबकू लागली...

३८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

$
0
0
गेल्या काही महिन्यांपासून नांदगाव तालुक्यात शिवसेनेत नव्या-जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदाचे पर्यावसन अखेर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यात झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या नव्या नियुक्तीच्या घोषणेनंतर नांदगाव तालुकाप्रमुख, मनमाड शहरप्रमुख यांच्यासह सेनेच्या जि. प. तसेच, पंचायत समिती सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या सामूहिक राजीनामा अस्त्रावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे तालुक्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images