Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रुग्‍णांचा उच्च दर्जाची सेवा द्या

$
0
0
सरकार ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा चांगल्या दर्जाची मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करते. परंतु, येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना सेवा मिळत नाही.

पुन्हा प्रतीक्षा स्पेशल वॉटर ट्रेनची

$
0
0
मनमाड रेल्वेस्थानकात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना आणि येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक बिकट होण्याची चिन्हे असताना शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आता रेल्वेने एकेकाळी पाणीटंचाईच्या काळात सुरू केलेल्या वॉटर स्पेशल ट्रेनची आठवण येत आहे.

जिल्हा बँकेच्या लिलावात ३७ ट्रॅक्टर्सची विक्री

$
0
0
प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळवण विभागीय कार्यालयामार्फत झालेल्या ट्रक्टर लिलावाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्हा बँकेच्या ट्रक्टर लिलावात ३९ पैकी ३७ ट्रॅक्टर विक्री झाले.

मोफत दफन विधी योजनेला सुरुवात

$
0
0
लिंगायत गवळी, महानुभाव, गोसा‍वी, ख्रिश्चन समाजातील नागरिकांना अंत्यविधीसाठी अर्थसहाय्य करण्याच्या मागणीला महापालिने मंजुरी दिली असून या योजनेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

पाणी कपातीबाबत आज होणार निर्णय?

$
0
0
लांबलेला पाऊस आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करून पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर DFO वठणीवर

$
0
0
वन हक्क दाव्याचे प्रस्ताव प्रलंबित राहण्याला खुद्द वनविभागही जबाबदार असल्याची माहिती उजेडात आली आहे. नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन्ही विभागाच्या उपवनसंरक्षकांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकार आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी अखेर बैठकांना हजेरी सुरू केली आहे.

बिबट्या आला रे, आला!

$
0
0
इंदिरानगर भागात बिबट्याने दर्शन दिल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरातील अजिता सोसायटीच्या आवारात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या असल्याचे एका दूध विक्रेत्यानेही पाहिले, असा दावा केला जातो आहे.

विवरणपत्रांचा पडला पाऊस

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) बाबतचे विवरणपत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रत्यक्षात ४ हजार ७०० तर ऑनलाईन पध्दतीने ४ हजार ३०० विवरणपत्र एलबीटी विभागाकडे जमा झाले आहेत. महापालिकेने नोटीसा देईपर्यंत व्यापारी आपले विवरणपत्र सादर करू शकतात, अशी माहिती एलबीटी विभागाने दिली आहे.

मतदार नोंदणीला संमिश्र प्रतिसाद

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोनदा घेण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेला संमिश्र प्रतिसाद लाभला आहे. मतदार नोंदणीसाठी सोमवारी अखेरचा दिवस असून, त्यानंतर या सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे.

उपक्रेंद्रासाठी जागा मिळवून देऊ

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शिवणई येथील जागा तातडीने हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

'स्थायी'त घडणार चमत्कार?

$
0
0
महापालिकेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाचा आज फैसला होणार आहे. वेळेवर चमत्कार होणार असल्याचा दावा मनसे तसेच भाजपनेही केला असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

उद्योगांसाठी ८०० एकराचे बळ

$
0
0
औद्योगिक कारणासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनात गेल्या अनेक वर्षांनंतर यंदा जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसीला यश आले आहे.

वणीच्या चौघांचा अपघातात मृत्यू

$
0
0
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या वणीच्या भाविकांच्या कारला अपघात होऊन चार जण जागीच ठार झाल्याने वणीकरांवर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये जगदंबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष व माजी उपसरपंच संजय यशवंत थोरात यांचाही समावश आहे.

सीता सरोवर मोजतेय शेवटची घटका

$
0
0
सीता सरोवरातील पथदीप बंद पडले आहेत. सरोवर परिसरातील झाडांची चोरी होत आहे. परिसरात असलेला एकमेव हातपंपही बंद पडला आहे. येथील दशक्रिया शेडचीही दुरवस्था झाली आहे.

वासननगर समस्यांच्या गर्तेत

$
0
0
शहरात नवनवीन वसाहती उदयास येत आहेत. मात्र, सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. वसाहती एकविसाव्या शतकातील अन् सुविधा अठराव्या शतकातील अशी स्थिती पहायला मिळत आहे.

नाशिक: भाजप-मनसे युती तुटणार

$
0
0
नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आज सत्ताधारी भाजप आणि मनसेचेच उमेदवार एकमेकांविरूद्ध उभे ठाकले. या लढाईत मनसेने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला असून या नाट्यमय घडामोडीनंतर दोन्ही पक्षांचा नाशिक पालिकेतील ‘संसार’ मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अपक्ष नगरसेवकाचे मत ठरले निर्णायक

$
0
0
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राहुल ढिकले एकामताने विजयी झाले. अपक्ष नगरसेवक पवन पवार यांचे मत मनसेच्या पारड्यात पडले.

इंटर्नल मार्क

$
0
0
नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने ही इंटर्नल मार्कांची कमाल आहे, असं बोललं जात आहे. अशीच चर्चा शाळेत निकाल घेऊन जाण्यासाठी आलेल्या काही पालकांची सुरू होती.

फोटोसेशन

$
0
0
एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकांचा सेट मान्यवरांच्या हातात देण्यात आला. सगळ्यांनी प्लास्टिकचे आवरण बाहेर काढले. पुस्तक हातात धरुन फोटोग्राफरकडे पाहत असताना उपस्थित एका मान्यवराला मात्र पुस्तकाचे मुखपृष्ठ नेमके कोणते हेच कळत नव्हते.

‘आपत्ती व्यवस्थापनास असक्षम टोल नाक्यांवर कारवाई करा’

$
0
0
नाशिक जिल्ह्रातील प्रमुख महामार्गांवरील १२ टोल नाक्यांवर आपत्ती व्यवस्थापनाची कुठलीही यंत्रणा नसल्याने अपघाताचा असल्याने अशा नाक्यांची चौकशी करून दोषींवर ठोस कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी विधानसभेत केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images