Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिलांना संधी देण्याची गरज

$
0
0
महिला चळवळीला बळ देण्याची गरज असून राज्यघटनेतील ३८, ३९, ४२ व ४४ कलमानुसार महिलांना समानतेचा अधिकार मिळालेला आहे. या समानतेच्या अधिकारासाठीच राज्यकर्त्यांनी महिलांना संधी उपलब्ध करून ‌द्यावी, असे मत आमदार उत्तमराव ढिकले यांनी व्यक्त केले.

प्री फॅबद्वारे म्हाडाची घरे

$
0
0
महाराष्ट्र हौसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा)च्यावतीने नाशिकमध्ये साकारत असलेल्या घरांसाठी अत्याधुनिक अशा प्री फॅब तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे घरबांधणी वर्षानुवर्षे रेंगाळण्याला लगाम बसतानाच कमी वेळात ही घरे ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत.

जिंदालचा वस्त्रोद्योग प्रकल्प

$
0
0
नाशिक जिल्ह्यात प्रस्तावित असलेला जिंदाल समुहाचा वस्त्रोद्योग प्रकल्प इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सुमारे १५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाची घोषणा राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये केली होती.

कुंभमेळ्याआधीच सीसीटीव्ही

$
0
0
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नाशिक शहराच्या काही भागात सीसीटीव्ही बसवण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. काही दिवसात कॉलेजरोड, शालिमार आणि भद्रकाली परिसर सीसीटीव्हीच्या टप्प्यात येणार आहे. यामुळे गुन्हेगारीवर वचक बसणार आहे.

नाशिकला ताप भरला; रुग्ण वाढले

$
0
0
सरासरी तपमानात लक्षणीय वाढ झाल्याने दिवसा उन्हाचा तडाखा तीव्रतेने जाणवू लागला आहे. दुपारच्या सुमारास उकाड्यामुळे नाशिककरांचा घाम निघत असला तरी रात्रीच्या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र वातावरण बदलाचा फटका लहान मुलांना बसत असून तापाच्या पेशंटमध्ये शहरात प्रचंड वाढ झाली आहे.

वाळूतस्कर जेरबंद

$
0
0
कळवण तालुक्यात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या तिघा तस्करांना अभोणा पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर व वाळू जप्त करण्यात आली आहे.

सुरेश वाडकरांचे अपील

$
0
0
नाशिकमधील जमिनीच्या मालकी हक्कावरून प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले असून याप्रकरणी ८ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

नाशिक, मालेगावला मुलींसाठी वसतीगृह

$
0
0
अल्पसंख्यक समाजातील उच्चशिक्षण घेणा-या मुलींसाठी नाशिक आणि मालेगांव येथे वसतीगृह तर मनमाड येथे दुस-या पाळीत आयटीआय अभ्यासक्रम सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

माकपची जाहीर सभा

$
0
0
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जाहीर सभा रविवारी संध्याकाळी सहा वाजता राणेनगरमधील स्वामी विवेकानंद मैदान येथे होणार आहे. सभेला माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य खासदार सीताराम येचुरी, माजी खासदार निलोत्पल बसू, राज्य सेक्रेटरी अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, डॉ. डी. एल. कराड आदी संबोधित करणार आहेत.

रौप्यमहोत्सवी सावरकर साहित्य संमेलन शुक्रवारपासून

$
0
0
भगूर ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व नाशिक ही कर्मभुमी असल्याने मुंबई सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे स्वा. सावरकर साहित्य संमेलन यंदा नाशिकला होणार आहे.

वाट्टेल तिथे करा पार्किंग

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असतानाही राजकीय पदाधिकारी, बडे बिल्डर व खुद्द अधिकाऱ्यांची वाहनेही आता बिनदिक्कतपणे मुख्य इमारतीलगत पार्क होऊ लागली आहेत.

साहित्यिकांच्या ग्रंथसंपदेचे प्रदर्शन

$
0
0
मराठी भाषा समृध्द असून सोपी आहे. तिला समजावून घेतल्यास तिची गोडवी अनुभवायस मिळते. ती कळून घ्यायची झाल्यास पाठांतराची आवश्यकता नसून वाचनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यशोदामाता बिटको गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रेखा काळे यांनी केले.

महाशिवरात्र सत्संग महोत्सव आजपासून

$
0
0
श्री योग वेदांत समिती यांच्यावतीने आसाराम बापू यांच्या सहवासात आज, १० मार्चपासून महाशिवरात्र सत्संग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कुंभमेळा परिसरातील तपोवनात १० ते १३ मार्च हे चार ‌दिवस आसाराम बापू यांच्या सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे.

प्राध्यापकांचा परीक्षेवरील बहिष्कार कायम

$
0
0
नेट-सेटसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय समस्त प्राध्यापकांची दिशाभूल करणारा असून प्राध्यापकांनी छेडलेले परीक्षेवरील बहिष्काराचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्णय प्राध्यापकांच्या एमफुक्टो संघटनेच्या शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ऑनलाईन नोंदणीस स्टॅम्प व्हेंडरचा विरोध

$
0
0
राज्याच्या मुद्रांक व नोंदणी विभागाने ऑनलाईन पद्धती सुरू केल्याने त्याचा परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना (स्टॅम्प व्हेंडर) मोठा फटका बसणार आहे.

एसटी कामगारांची थकबाकी द्या

$
0
0
एसटी महामंडळातील कर्मचा-यांना नोव्हेंबर २०१२ पासून ७ टक्के महागाई भत्त्यापोटी असलेली थकबाती तातडीने द्यावी, अशी मागणी 'महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस'तर्फे (इंटक) करण्यात आली आहे.

दादाभाऊ निकम यांचे निधन

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व दलित चळवळीतील खंदे कार्यकर्ते दादाभाऊ नानाजी निकम (वय ६२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर दसक येथील अमरधाममध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्मार्ट कार्ड केंद्र दोन दिवसात

$
0
0
राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या (इएसआयसी) सातपूर आणि अंबड येथील हॉस्पिटलमध्ये येत्या दोन दिवसात स्मार्ट कार्ड केंद्र सुरू होणार असल्याची माहिती इएसआयसीचे सहसंचालक आर. के. चौधरी यांनी दिली.

पाणीप्रश्नी नगरसेवकांचा ठिय्या

$
0
0
सातपूर प्रभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होतानाच मंगळवारी न होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, काही नगरसेवकांनी यावेळी ठिय्या आंदोलन करीत सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली.

तपासणीविनाच दिले जाते 'पीयूसी'

$
0
0
वाहनाच्या धूरातून वायूप्रदूषण होऊ नये यासाठी दर सहा महिन्याला वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी करणे सक्तीचे आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिलेल्या अनेक पीयूसी तपासणी केंद्रांमध्ये वाहनाला हातही न लावता पीयूसी सर्टीफिकेट दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images