Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हयात आणि मॅरिएट लांबणीवर

$
0
0
ताज, आयबीस यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल्स नाशकात कार्यरत झाल्यानंतर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इच्छूक असलेल्या हयात आणि मॅरिएट या आंतरराष्ट्रीय हॉटेल्सनी काहीसा पॉज घेतला आहे. या दोन्ही हॉटेल्सची जागा नाशकात असली तरी ते नाशकात हॉटेल कधी सुरु करणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.

पेपर टाकत 'रोशन' कामगिरी

$
0
0
दहावीची परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो जवळच्या एका कंपनीत रूजू झाला. कंपनीत काम करण्याचं कारण होतं, एमसीआयटीचा कोर्स करण्यासाठी आणि दहावीनंतरचं शिक्षण घेण्यासाठी कॉलेजचे फॉर्म भरण्यासाठी पैसे जमा करणं. सोळा वर्षांचा रोशन पण त्याची शिकण्याची उमेद यातूनच दिसते.

खाबुगिरीत नाशिक अव्वल!

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना भस्म्या रोग जडला आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता खाबुगिरीमध्ये उत्तर महाराष्ट्र अव्वल ठरला आहे.

कांदा करणार कोंडी

$
0
0
कांद्याचे दर गगनाला भिडू लागल्याने केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य ३०० डॉलर प्रती टनाने वाढविले होते. मात्र, निर्यात मूल्य वाढवूनही नागरिकांना कांद्यांच्या दरात काहीच दिलासा न मिळाल्याने केंद्राने निर्यात मूल्य पुन्हा २०० डॉलर प्रती टनाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याचे दर कमी होतील अशी शक्यता निर्माण झाली असली तरी याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

जगात भारी ‘नाशिकचा वडापाव’

$
0
0
नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात विकास थिएटर्ससमोर गेल्या दोन वर्षात खूपच प्रसिध्द झालेला हा नाशिकचा वडापाव. या अगोदर मुंबई, पुणे या नावाने बनवलेले वडापाव नाशिककरांना मिळत असत.

ट्रेकला पावसाचा ब्रेक!

$
0
0
वळवाचा पाऊस पडला, की हौशी गिर्यारोहक आणि पर्यटकांना वेध लागतात ते धबधबे आणि हिरव्या रंगाने फुललेल्या डोंगरदऱ्यांचे. यंदा पावसानं हुलकावणी दिल्याने हौशी पर्यटक नाराज झाले आहेत.

इच्छूक नव्हे, आमची तयारीच!

$
0
0
लोकसभा निवडणूक नुकतीच कुठं आटोपली अन् आता विधानसभा निवडणुकीचे वारं वाहू लागलं आहे. मान्सूनप्रमाणंच या वाऱ्यांनी अद्याप जोर पकडला नसला तरी इच्छुक आतापासूनच हे वारं `वादळवारे` समजून कामाला लागले आहेत. काहींनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच तयारी सुरू केलेली आहे, तर काहींना थोडा उशिरानं जाग आली असली तरी त्यांनी नेटानं प्रयत्न चालविले आहेत.

निवृत्ती वय, वास्तव आणि अवास्तव

$
0
0
सेट-नेट होणाऱ्या तरुणांची बेकार फौज पाहता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालयात शिक्षक श्रेणीत काम करणाऱ्या प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, असे वाटते.

ढग आले व्हाट्स अॅपवर!

$
0
0
सोशल नेटवर्किंगचं जाळं इतकं घट्ट व्हायला लागलंय, की परवाकडे या जाळ्यात आपल्या शहरावर रेंगाळणाऱ्या रिकामटेकड्या ढगांनीही व्हाट्सअॅपवर आपला ग्रुप सुरू केला !

मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग

$
0
0
मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात गुरुवारी सकाळी नाशिककडे जाणाऱ्या कंटेनरच्या इंजिन ऑइलला शॉटसर्किटमुळे भीषण आग लागल्याने महामार्गावरील वाहतूक साधारण एक तास बंद होती.

'त्या' रेशनकार्डची गोष्ट

$
0
0
रेशनकार्ड घेण्याकरिता नेहमीच अनेकांना खेट्या माराव्या लागतात हे विदारक चित्र. त्यातही भोळ्या भाबड्या व अडाणी माणसासाठी तर मोठी कसरत. येवला तालुक्यातील भारम येथील महिलेच्या बाबत असेच घडले. तब्बल आठ महिने या महिलेला रेशनकार्डसाठी वाट पहावी लागली.

टोल वसुलीला मुभा कुणाची?

$
0
0
राज्य सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनावेळी राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचे जाहीर केले होते. तसेच हे टोल नाके १ जुलैपासून बंद होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच आदेश दिले. मात्र तरीही धुळे-सूरत बायपास मार्गावरील टोलनाक्यावरील वसुली बंद करण्यात यावी, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने न दिल्याने येथील वसुली राजरोसपणे सुरुच आहे

शिवसेनेला हवा पश्चिम मतदारसंघ

$
0
0
लोकसभेतील युतीच्या विजयानंतर आता शिवसेनेने आपली विस्तार मोहिम तीव्र केली असून पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनाला सोडण्याची मागणी लावून धरली जाणार असल्याचे संकेत शिवसेना सच‌िव व खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत.

जलशुध्द‌ीकरण केंद्र बनले जुगार अड्डा

$
0
0
पंचवटी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्द‌ीकरण केंद्रात जुगाऱ्यांनी व दारुड्यांनी थैमान घातले असून, जलशुध्द‌ीकरण केंद्र म्हणजे जुगार अड्डा बनले आहे.

मेरिटने वाढले टेन्शन

$
0
0
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाने संस्थेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून अकरावी प्रवेशासाठी यंदा ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे ठरवले खरे मात्र, गुरुवारी संस्थेच्या वेबसाईटवर दुपारी चार वाजता लागणारी मेरीट लिस्ट सव्वा तास उशिराने लागल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

बजेटमधून पंतप्रधान, खासदार बेपत्ता

$
0
0
महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी उद्या (दि. ५) विशेष महासभा होणार आहे. अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा होण्यापूर्वीच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह प्रशासनला लक्ष केले जात आहे.

१० बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा

$
0
0
पूर्व आणि पंचवटी प्रभागात डेंग्यू आजाराचे पेशंट आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अस्वच्छता करणाऱ्या १० बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या असून २२ हजार १८९ ठिकाणी अळीनाशक फवारणी व ठिकठिकाणी स्वच्छता करण्यास सुरुवात केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्तपदी कासार?

$
0
0
महापालिकेचे तत्त्कालीन उपायुक्त दीपक कासार यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावास हिरवा कंदील दर्शवल्यास पुढील दोन दिवसात कासार हजर होऊ शकतात, अशी माहिती पुढे येत आहे.

‘सावाना’ सभेत धुमशान

$
0
0
सार्वजनिक वाचनालयाची वर्गणी वाढवावी की, नाही या मुद्द्यावरून सभासद, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जुंपत वाकयुध्द चांगलेच रंगले. तिघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याने सावानाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तब्बल तासभर हमरीतुमरी व धुमशान रंगले.

देवळालीकरांची गैरसोय

$
0
0
देवळाली कॅम्प येथील बंद एटीएममुळे देवळाली कॅम्प येथील रहिवासींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील काही एटीएम काल बंद होती. काही ठिकाणी एटीएममधील पैसे संपले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images