Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

असह्य वेदनेतून निदा शेखची मुक्तता

$
0
0
बीडीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या निदा शेखला गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या कॅन्सरच्या गाठीच्या असह्य वेदनेपासून कॅन्सरतज्ज्ञ राज नगरकर यांनी मुक्त केले. महत्वाची बाब म्हणजे या आजारातून बरं करण्यासाठी निदावर दोन वेळेस ऑपरेशन सुध्दा झाले होते.

पोलिसांच्या उदासीनतेमुळे फसवणूक

$
0
0
जिओडेसिक कंपनीकडून केवळ नाशिक आणि राज्यातीलच नव्हे तर देशभरातील गूंतवणूकादारांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यासाठी डिसेंबरमध्येच आर्थिक गुन्हे शाखा, शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सरकारवाडा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती.

पोलिस भरतीतील हरकती निकाली

$
0
0
भरती प्रक्रियेनुसार पोलिस प्रशासनाने जाहीर केलेल्या उत्तरतालिकेतील एका उत्तरावर उमेदवाराने घेतेलेला आक्षेप बरोबर असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे उमेदवारांना देण्यात आलेल्या ५२ क्रमांकाच्या प्रश्नातील योग्य पर्यायाची शहानिशा करून प्रशासनाने त्याच्या अचूकतेबाबत सहमती दर्शविली आहे.

उध्दव ठाकरे साधणार संवाद

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

दोघांची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0
महिनाभरापूर्वीच विवाह झालेला युवक आणि अविवाहीत युवतीने लहवितजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही देवळाली कॅम्पचे रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वीच पती-पत्नीने या परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

सिंहस्थासाठी मते मागणार

$
0
0
नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून, ते पश्चिम आणि मध्य या दोन्हीपैकी एका मतदारसंघातून उतरण्यास इच्छूक आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून प्रचारालाही सुरुवात केली आहे.

जेलरोड परिसरात डेंग्यूचे रुग्ण

$
0
0
नाशिकरोडवरील आंबेडकरनगर समोर असलेल्या उपमहापौरांच्या प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यानंतर आता जेलरोड परिसरातही डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

त्र्यंबकेश्वर पालिकेवर ताशेरे

$
0
0
र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीवरील काँक्रिटीकीकरण प्रकरणी मुंबई हायकोर्टाने त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर ताशेरे ओढले आहे.

लासलगावला शिक्षिकेचा खून

$
0
0
लासलगाव जवळील निमगाव येथे राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अविवाहीत शिक्षिकेचा शुक्रवारी (ता.४) सकाळी कोयत्याने वार करून खून झाला. त्यानंतर आरोपीने स्वत:च्या हाताची नस कापून व मानेवर वार करीत स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला.

डॉक्टर आंदोलनाचा पहिला बळी

$
0
0
मॅग्मो संघटनेतंर्गत जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटल्समधील हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. थंडी तापाने आजारी महिलेला डॉक्टरांअभावी योग्य व वेळेत उपचार न मिळू शकल्याने तिचा मृत्यू झाला.

`आमचं घर फुटू देणार नाही`

$
0
0
‘तुम्ही एक घर फोडलं आहेच. आता मी आमचं घर फुटू देणार नाही’, असे वक्तव्य खासदार सुपिया सुळे यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषदेत केले. माझ्यात व दादामध्ये (अजित पवार) सत्तेसाठी कधीही भांडणे नव्हती आणि पुढेही होणार नाहीत, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

दुर्मीळ घुबडाला जीवदान

$
0
0
तळवाडे शिवारात जखमी अवस्थेतील दुर्मीळ प्रजातीच्या घुबडाला आडसुरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक शंकरराव आहिरे यांच्या प्रसंगावधानाने जीवदान मिळाले.

पॅसेंजर टर्मिनलवरुन वाद

$
0
0
ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी सज्ज झालेले पॅसेंजर टर्मिनल हे आमच्या मालकीचे असावे, अशी भूमिका हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) घेतली आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला असून याप्रकरणी जिल्हाधिकारी लवकरच मुंबईला जाणार आहेत.

YCMOUचे प्रवेश सुरू

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या ३१ जुलै २०१४ पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

सोनवणेच्या कुटुंबीयांना मदत

$
0
0
मुंबई येथे पोलिस भरती दरम्यान धावण्याच्या चाचणीत मृत्युमुखी पडलेला मालेगाव तालुक्यातील द्याने येथील अंबादास सोनवणे यांच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार दीपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आला

संवाद शिवसैनिकांशी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या तयारीत शिवसेनेने आघाडी घेतली असून, पुढील आठवड्यात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेला मंजुरी

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील प्रस्तावित उपकेंद्रासाठी आवश्यक जमिनीचा ताबा विद्यापीठाकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

STच्या चौघांविरुद्ध गुन्हा

$
0
0
सन १९९१ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत बनावट दस्तऐवज तयार करून एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेतील तत्कालीन निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते. त्याबाबतचे खोटे पुरावे तसेच चुकीचा अहवाल सादर करून बदनामी व नुकसान केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एका विभागनियंत्रकासह महामंडळातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

इगतपुरीत पाणी योजना प्रतीक्षेत

$
0
0
इगतपुरी तालुक्यात अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे ३७ पाणीपुरवठा योजना धुळखात पडल्या आहेत. या योजनांवर १३.५० कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला होता. या सर्व योजनांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आमदार ‌निर्मला गावित यांनी सूतोवाच केले आहे.

इगतपुरीत सभापती, उपसभापतींवर अविश्वास

$
0
0
संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव मोठ्या फरकाने मंजूर करण्यात आला आहे. सभापतींविरोधात उपसभापती रमेश जाधव यांनीही मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images