Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वृक्षतोडीचे गुन्हे दाखलच होत नाही

$
0
0
शहरातील अवैध वृक्षतोडीप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास अधिकारी थारा लागू देत नाही. त्यामुळे तक्रार दाखल होत नसल्याचे स्पष्टीकरण विभागीय अधिकाऱ्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत दिले.

वाजपेयींनी दिले, मोदींनी का नाही?

$
0
0
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने गेल्या कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद केली होती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने २०१५ मध्ये नाशिकमध्ये होत असलेल्या सिंहस्थासाठी निधी का दिला नाही, असा सवाल नाशिककरांनी केला आहे.

अच्छे दिन आ रहे है...

$
0
0
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पद्वारे ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत मिळाल्याचा सूर ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘अर्थसंकल्प महाचर्चा’ मध्ये मान्यवरांनी व्यक्त केला.

घोटीचा पाणीपुरवठा पूर्ववत

$
0
0
घोटी शहरावरील भीषण पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे यासाठी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्र्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून घोटीसाठी भावली धरणातून पाणी सोडण्यात आले असून घोटीचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.

तहसीलदांराच्या खुर्चीला घातला नोटांचा हार

$
0
0
संजय गांधी निराधार योजनेतर्गंत दोघा अपंगाचे अर्ज पात्र असतांना देखील केवळ पैशांच्या मागणीसाठी त्यांना लाभापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करत डॉ. माधुरी बाफना व सहकाऱ्यांनी या विभागाच्या तहसीलदारांच्या खुर्चीलाच नोटांचा हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.

राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा

$
0
0
मोदी सरकारच्या अच्छे दिनाला दाद न देता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मोदी सरकारकडून जनतेची निराशा

$
0
0
नरेंद्र मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत अब की बार ने जनतेला भुरळ घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले.

कमोदनरगवासीयांचा जिवाशी खेळ

$
0
0
कमोदनगरमधील रहिवाशांसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल मोठी डोकेदुखी ठरत आहे. पलीकडे जाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागतो.

बॅनरबाजीवर नाशिककराने सुचविला उपाय

$
0
0
‘सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक’ ही संकल्पना दिवसागणिक महापालिका प्रशासनासह सर्वसामान्य नाशिककरही विसरत चालले आहेत. विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, चौकाचौकात फोफावलेली बॅनरबाजीमुळे शहराचे विपुद्रीकरण होत आहे. हे रोखण्यासाठी महापालिकेकडूनही विशेष प्रयत्न होताना दिसत नाही.

द्वारका चौक वाहतूक कोंडी फुटणार?

$
0
0
दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणाऱ्या द्वारका चौकाने मोकळा श्वास घ्यावा यासाठी पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यांना काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे.

महापालिकेचा ‘मराठी’ ला माफीचा डोस

$
0
0
शहरातील सर्व मराठी शाळांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय महापौर अॅड. यतीन वाघ यांनी अर्थसंकल्पीय विशेष महासभेत घेतला. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले तरी अमंलबजावणी कळीचा मुद्दा आहे.

जलतरण तलाव खासगीकरणाचा घाट

$
0
0
नाशिक महापालिकेने नवीन क्रीडा धोरण आखले असून त्यानुसार शहरातील पाच जलतरण तलाव खासगी संस्थांना चालिण्याचा घाट घातला जात आहे.

दिरंगाईमुळे तीन आरक्षणे रद्द

$
0
0
शहर विकास आराखड्यात दर्शवण्यात आलेली मात्र मागील दहा वर्षांपासून महापालिकेने ताब्यात न घेतलेल्या तीन जागांवरील आरक्षणे हायकोर्टाच्या निकालानुसार रद्द करण्यात येणार आहे.

भाजपला हव्यात शहरातील चारही जागा

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शहर भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य नाशिक व देवळाली हे चारही विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी ठेवावे आणि शिवसेनेला ग्रामीण भागातील मतदारसंघ सोडावेत, अशी आग्रही मागणी शहर भाजपाकडून महाराष्ट्र कोअर कमिटीकडे करण्यात आली.

मराठीचं वावडं

$
0
0
मी असं म्हटल्यावर काही लोकांचे डोळे लगेच चमकले असतील, की आला बुवा परत कुणीतरी मराठीचा कैवारी जो मराठी बोला असं परत आरडा ओरडी करून सांगणार. खरा मला एक काळात नाही की आपल्यला आपल्या इतक्या सुंदर आणि विपूल भाषेचा बोलण्याच्या बाबतीत न्यूनगंड का वाटतो हे कळण्याचं पलीकडे आहे.

क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सोमवार १४ जुलैपासून सुरु होणारा प्रशिक्षण कार्यक्रम १८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

शिक्षणाचं स्वप्न पूर्णत्वाला आलं

$
0
0
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण होईल की नाही याची शंका होती. शाळेत असताना कायम चिंता सतावायची. परंतु, ‘मटा हेल्पलाईन’मुळे माझे शिक्षणाचे स्वप्न पूर्णत्वाला आलं.

नाका परिसरात बिबट्याचा वावर?

$
0
0
मुंबई नाका परिसरातील नासर्डी पूलाजवळ काही नागरिकांना शुक्रवारी सकाळी बिबट्याचे दर्शन घडले. वनविभागाने परिसरात केलेल्या पाहणीमध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईनाका परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

मेंढेगिरी समितीचा नाशिकला दणका

$
0
0
नगर-नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करावी तसेच खरीप पिकांना पाणी देऊ नये, अशी शिफारस मेंढेगिरी समितीने केली आहे. या समितीने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवरच मीठ चोळले असून, पाण्याचे हे भांडण आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

भरदिवसा पाच लाख लांबविले

$
0
0
मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी दिवसाढवळ्या भरचौकातून पाच लाखाची बॅग लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ११) नाशिकरोड येथे घडला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images