Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेतकरी झाला भाकरीला पारखा

$
0
0
नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात अद्यापर्यंत पाऊस न झाल्याने शेतकरी भाकरीला पारखा झाला आहे. जून प्रमाणेच संपूर्ण जुलैही कोरडा जाण्याची चिन्हे दिसून लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे

नगरपालिकांमध्ये कामबंद आंदोलन

$
0
0
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व पेन्शनसाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, १० मार्च ९३ ते २७ मार्च २००० पर्यंतच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

समांतर सिनेमामुळे अभिरुचीची नवी वाट

$
0
0
‘समांतर सिनेमाच्या चळवळीने अभिरुचीची नवी वाट चोखाळून रोजच्या जगण्याच्या विषयांना कलात्मकता बहाल केली तसेच चित्रपटातील भूमिकांचा सुक्ष्म आणि बारकाईने विचार करुन जनसामान्यांचे रोजचे प्रश्न मांडले.

बोगसगिरीचा गोरखधंदा कुणाच्या पथ्यावर?

$
0
0
शहरात किमान १०० बोगस आर्किटेक्ट असल्याचा दावा खुद्द आर्किटेक्ट संघटनेने केला. मात्र, आम्हालाही डिझाइन तयार करण्याचा घटनादत्त अधिकार असल्याचा प्रतिदावा सिव्हिल इंजिनीअर संघटनेने केला.

सरकारला ट्रेकिंग संपवायचंय?

$
0
0
राज्याच्या क्रीडाधोरणात गिर्यारोहणाला खेळाचा दर्जा दिला आहे. मात्र, सरकारने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या नावाखाली गिर्यारोहणाचे नियम जारी करत गोंधळ निर्माण केला आहे.

‘कॉम्बो’ची सक्ती केल्यास आंदोलन

$
0
0
सिनेमॅक्समध्ये ‘लय भारी’ सिनेमादरम्यान प्रेक्षकांना सिनेमाच्या तिकिटाबरोबर पॉपकॉर्न आणि कोकालोलाच्या कॉम्बो पॅकची सक्ती केली जात असल्याच्या प्रकारावरुन ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’ने (मनविसे) हल्लाबोल करत हे बंद करण्याची मागणी केली.

‘परी’चं इटलीला टेक ऑफ

$
0
0
परी तशी चिमुकली अन् गोंडसही. मात्र, नियतीने तिच्याशी क्रुर ‌चेष्टा केली. परीच्या हृदयाला सूक्ष्म छिद्र आणि किडनीचाही आजार. परंतु, तिच्यासाठी इटलीतील एक दाम्पत्य देवदूताप्रमाणे धावून आले आहे.

१०० स्मार्ट सिटीत नाशिक हवे

$
0
0
१०० स्मार्ट सिटीज संकल्पनेचा केंद्र सरकारने अर्थसंकल्पांमध्ये अंतर्भाव केला असून यामध्ये नाशिकचा समावेश व्हावा, यासाठी महापालिकेने तातडीने प्रस्ताव तयार करण्याची मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. स्मार्ट सिटीजच्या विकासासाठी ७,०६० कोटी रुपयांची तरतूद केंद्राने केली आहे.

लिंगायत समाजाला OBC दर्जा द्या

$
0
0
लिंगायत समाजबांधवांच्या विविध मागण्यांप्रश्नी लिंगायत समाज संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे शहराच्या मुख्य भागातील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली.

क्रीडा धोरण यंदापासूनच

$
0
0
नाशिक महापालिकेने महासभेत मंजूर केलेल्या क्रीडा धोरणाची अंमलबजावणी यंदाच्या अर्थिक वर्षापासून अमलात आणणार असल्याची माहिती महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिली.

नाशिककरांसाठी फोरजी मोफत

$
0
0
फोरजीच्या माध्यमातून इंटरनेटचा हायस्पीड अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या नाशिककरांना चक्क मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. फोर जी सेवेच्या प्रमोशनसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केबीसी घोटाळा; सहा गजाआड

$
0
0
नाशिक शहरासह संपूर्ण राज्यभरात गुंतवणुकदारांना गंडविणाऱ्या केबीसीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. सोमवारी (ता.१४) आत्महत्या केलेल्या निकम मायलेकांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्याच रात्री तीन जणांना अटक करण्यात आली.

वाडकरांच्या जामिनावर उद्या निर्णय

$
0
0
जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात आरोपी असलेले गायक सुरेश वाडकर बुधवारी नाशिक जिल्हा कोर्टासमोर हजर झाले. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी (दि. १८) रोजी अंतिम निर्णय होणार आहे.

बोरगावच्या विद्यार्थ्यांचे ऑलम्पियाडमध्ये यश

$
0
0
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ‘ब्रह्मा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल बोरगाव’ येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील ऑलम्पियाड परीक्षेत उज्वल यश मिळविले.

पंचवटी विभागीय कार्यालयाची महापौरांकडून पाहणी

$
0
0
नाशिक महापालिकेतर्फे पंचवटी विभागात नव्याने बांधण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी महापौर यतीन वाघ व आयुक्त संजीवकुमार यांनी केली. हे विभागीय कार्यालय नागरिकांसाठी १५ ऑगस्ट पूर्वी खुले करण्यासाठी कामाला गती देण्याची सूचना महापौरांच्या वतीने करण्यात आली.

लालेलाल डाळिंबाने उत्पादक मालामाल

$
0
0
भीषण दुष्काळी परिस्थितीतही पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लालेलाल, दर्जेदार डाळिंबाची विक्रमी आवक होत आहे. रमजान पर्व सुरू असल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. २० किलोच्या क्रेटला सरासरी १२०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरीही मालामाल होत आहे.

युवा सेनेच्या नोंदणीला नाशिकरोडला प्रतिसाद

$
0
0
नाशिकरोड येथे युवा सेनेच्या सदस्य नोंदणीला उत्साहात प्रारंभ झाला असून, त्याला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या सदस्य नोंदणीचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक पूर्व विधान सभा युवा सेनेतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरु झाले आहे.

साक्षांकन सुविधेची गरज

$
0
0
देवळाली कॅम्प परिसरात साक्षांकनाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. देवळाली कॅम्प परिसरातील विशेष कार्यकारी अधिकारी व छावणी परिषद नगरसेवकांचे साक्षांकन करण्याच्या अधिकाराची मुदत संपली आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर द्या बळ

$
0
0
नाशिक शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर हे दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत होत असताना प्रामुख्याने हे शहर सोशल इन्फ्रा सिटी म्हणूनही उदयास येत आहे. सोशल इन्फ्रा म्हणजे समाजाच्या विकासासाठी आणि त्याच्या सेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांची उपलब्धता. शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी नाशिककरांना कनेक्टिव्हिटीच्या सुविधांपासून मनोरंजन, हेल्थ केअर, एज्युकेशन अन् इंडस्ट्रीसाठीच्या गरजांचा विचार आता करावा लागणार आहे.

`वेलनेस टुरिझम`च्या नकाशावर नाशिक

$
0
0
मन आणि शरीरातील थकवा दूर करून चैतन्य निर्माण करणाऱ्या `वेलनेस टुरिझम`च्या नकाशावर नाशिक आले असून, नाशिक हे भारतातील तिसरे ठिकाण ठरले आहे. त्यामुळेच नाशिक शहर परिसरात हेल्थ आणि `वेलनेस रिसॉर्ट`ची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images