Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हुरहुरवणारी स्टेज एग्झिट!

$
0
0
प्रशांत दामले... रंगमंच, टिव्ही आणि चित्रपट यातील परिचित असा प्रसन्न चेहरा. समांतर रंगभूमीपासून ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’ आणि अलीकडेच रंगमंचावर आलेले ‘नकळत दिसले सारे’ यांसारख्या विविध नाटकांपर्यंत आजही सातत्याने प्रयोग करणारे रंगभूमीवरील नामवंत कलाकार म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे.

‘सुदर्शन’ संचालकाच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0
लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची ३८ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुदर्शन आणि कंपनीचा संचालक राधेश्याम सोनीच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ झाली आहे.

कांदा भाववाढीवरून सरकारचा रडीचा डाव

$
0
0
केंद्र सरकार कांदा भाववाढीचा मोठा गहजब करीत असून कांदा उत्पादकांच्या बाबतीत सरकार रडीचा डाव खेळत आहे. शहरी ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर सरकार कांद्यावर निर्बंध लादणार असेल तर कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यायलाच हवा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

द्वारका चौकाने भेदले अहंकाराचे वर्तुळ

$
0
0
द्वारका चौकातील सर्कल अखेर सर्व बाजूंनी कमी करण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न ब-यापैकी सुटला असून, प्रदूषणही कमी झाले आहे. तसेच इंधन व वेळेचीही मोठ्याप्रमाणावर बचत होत आहे.

घोलपांच्या कारकिर्दीचा ट्रॅजिडीने शेवट !

$
0
0
भ्रष्टाचार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेले शिवसेनेचे बबन घोलप यांची आमदारकी जाणे ही काळ्या दगडावरील रेघ झाली आहे. सेनेचा एक नेता खासदार झाला असताना त्याच परिसरातील दुसऱ्या नेत्याला मात्र, पायउतार व्हावे लागत आहे.

सिंहस्थ निधीसाठी गोडसेंचे जेटलींना साकडे

$
0
0
नाशिकमध्ये २०१५ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येणार असून त्यासाठी २ हजार ३७८ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली.

नायब तहसीलदाराचा विनयभंग

$
0
0
नायब तहसीलदार महिलेशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तसेच ‌तिचा विनयभंग करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवारी जामिनावर सोडले.

रिलायन्सने केलेल्या खड्ड्यात पडून तिघे जखमी

$
0
0
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ४ जी कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून शिखरेवाडी परिसरात गुरुवारी तीन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून दोन जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

सुरेश वाडकरांना मिळाला जामीन

$
0
0
जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात आरोपी असलेले गायक सुरेश वाडकर यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा कोर्टामध्ये वाडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी झाली.

६८८ हॉस्पिटल्सला दंडाचे ‘औषध’

$
0
0
मुंबई नर्सिंग होम अॅक्टनुसार दर तीन वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण न करणाऱ्या तब्बल ६८८ हॉस्पिटल्स तसेच क्लिनीकला महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यावर्षी नूतनीकरण न करणाऱ्या डॉक्टर्सकडून पाच हजार रुपये दंड आकारला जाणार असून पुढील वर्षी अशा व्यावसायिकांकडून दररोज ५० रुपये दंड आकारला जाणार आहे.

डेंग्यूचा वाढता फैलाव

$
0
0
सिडको भागात डेंग्यू आजाराचे नवीन दोन पेशंट आढळून आले असून या महिन्यात आतापर्यंत डेंग्यूने प्रभावित झालेल्या पेशंटची संख्या १० इतकी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने हे प्रमाण कमी असले तरी वाढता फैलाव पाहता प्रतिबंधकात्मक उपाययोजना राबवण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले.

प्लास्टिकमुक्त कुंभमेळा

$
0
0
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगसंदर्भात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरात विविध माध्यमांतून जनजागृती, साठेबाजांसह किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.

फसवणूक ७० कोटींवर

$
0
0
गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या केबीसी कंपनीविरोधात तक्रार अर्जांचा पाऊस पडत असून, शुक्रवारी रात्री नऊपर्यंत आडगाव पोलिसांना चौदाशे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांचा ओघ सातत्याने सुरूच असून आतापर्यंत फसवणुकीच्या रकमेचा आकडा ७० कोटींच्या पुढे गेला आहे.

सिन्नरला चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0
सिन्नर शहर व परिसरात झालेल्या तीन धाडसी चोऱ्यांमध्ये रोख रकमेसह सुमारे तीस ते चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. यामध्ये बँक ऑफ बडोदाच्या सिन्नर शाखेतील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पंधरा लाख रुपये चोरून नेले.

निमा अध्यक्षपदी वर्मा की राठी?

$
0
0
निमाची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे असली तरी अध्यक्षपदावरून तडजोडीचे राजकारण रंगण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी एकाच पॅनलचे किशोर राठी व रवी वर्मा यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

तज्ज्ञांकडूनच मागितले महापालिकेने अर्ज

$
0
0
पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंची समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत वृक्ष प्राधिकरण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावी, असे हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. तज्ज्ञ समितीत निरी, सामाजिक वनीकरण यासह पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागणार आहे.

केबीसीची सीबीआय चौकशी करा

$
0
0
तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या केबीसी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

घरपट्टी वसुलीला सापडेना मुहूर्त

$
0
0
भारत प्रतिभूती मुद्रणालय (आयएसपी) आणि करन्सी नोट प्रेस (सीएनपी) या केंद्र सरकारच्या बांधीव मालमत्तेची घरपट्टी २००९ पासून थकली असून २०१२-१३ मध्ये थकबाकीने १ कोटी १६ लाख ३९ हजार ६९२ रुपयांचा टप्पा पार केला.

सोमेश्वर येथे विवाहिता बुडाली

$
0
0
पतीसमवेत वर्षाविहारासाठी गेलेली नवविवाहिता बुडाल्याची घटना सोमेश्वर येथे शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. परिसरातील बोटक्लबच्या तरुणांनी तिला बाहेर काढले. परंतु तिचा मृत्यू झाला होता. शालिनी संजय जाधव (१८, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे तिचे नाव आहे.

व्यापाऱ्यास तीन लाखांचा दंड

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) भरण्यास पात्र असूनही नोंदणी न करता वर्षभरात १६ लाख ९५ हजार रुपयांचा माल आयात करणाऱ्या व्यापाऱ्यास महापालिकेने तीन लाख रुपये दंड ठोठवला आहे. याबरोबर विवरणपत्र सादर न करणाऱ्या १२०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images