Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘व्ही. एन. नाईक’साठी ८२.२५ टक्के मतदान

$
0
0
क्रांतीवीर वसं‌तराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी रविवारी (२० जुलै) ८२.२५ टक्के मतदान झाले. ७ हजार २१५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला. ‘श्री विजय’, ‘लोकनेते’ आणि ‘परिवर्तन’ अशा तीन पॅनल्समध्ये निवडणूक झाली.

खड्ड्यांपासून दिलासा

$
0
0
पावसाने ओढ दिल्यामुळे महापालिकेने यंदा पावसाळीपूर्व कामे ९० टक्के पूर्ण केली आहेत. विशेषतः खड्डे दुरूस्तीचे कामास गती देण्यात आल्यामुळे ४ हजार २९५ खड्ड्यांपैकी ३ हजार ६१३ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे.

प्रवाशी वाढवा अभियान

$
0
0
एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करता व्हावी, तसेच त्यातून राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने महामंडळाने प्रवासी वाढवा विशेष अभियान हाती घेतले आहे.

‘मिशन-१५०’ चे ध्येय बाळगा

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शिवसैनिकांनी स्वत:ला झोकून देत आणि विजयश्री खेचून आणली. आता, शिवसेनेचे १५० आमदार विधानसभेत जायला हवेत. तेव्हा ‘मिशन-१५०’ हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागा, असे आवाहन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.

केबीसी फसवणूक ११० कोटींवर

$
0
0
केबीसी विरोधात तक्रारअर्ज देणाऱ्यांची आडगाव पोलिस स्टेशनला गर्दी वाढतेच आहे. रविवारी रात्रीपर्यंत ३ हजार १२४ जणांनी अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे फसवणुकीच्या रकमेचा आकडा देखील १०० कोटींच्या पुढे गेला आहे.

राष्ट्रवादी १४४ जागांवर ठाम

$
0
0
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला १४४ जागा मिळाव्यात ही आमची आग्रही भूमिका आहे. येत्या बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे सांगितले.

उपनगर नाका बनला अपघातांचे केंद्र

$
0
0
नाशिक-पुणेरोडवरील उपनगर नाक्यावर वाहतूक विस्कळीत होत असून, हा नाका मृत्युचा सापळा बनला आहे. वाढत्या रहदारीने नागरिक त्रस्त झाले असून, याठिकाणची वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चुंचाळे खून प्रकरणातील चौघांना पोलिस कोठडी

$
0
0
दोन दिवसांपूर्वी अंगाला धक्का लागल्याची कुरापत काढून चुंचाळेत तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचा प्रकार रविवारी (ता.२०) रात्री घडला. अंबड पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

संगणक परिचालकांचा नाशिकरोडला मोर्चा

$
0
0
ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी आयटकच्या नेतृत्वाखाली वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी महसूल कार्यालयावर मोर्चा काढून निर्दशने केली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले.

हेल्थ केअरमध्ये रोजगार संधींचा पाऊस

$
0
0
नाशिकच्या हेल्थ केअर सेक्टरमध्ये येत्या पाच वर्षांमध्ये सुमारे १००० कोटींची गुंतवणूक होणार असल्याने आहे. शहरात हेल्थ केअर क्षेत्रात पन्नास हजारांहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

खोदलेले रस्ते बनले स्विमिंग पूल

$
0
0
महापालिकेने अशोकनगर येथील जाधव संकुलमधील काँक्रिटिकीकरणाच्या कामाने रहिवाशी त्रस्त झाले आहेत. त्यातच महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पाण्यात गाडी घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याने महापालिकेने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

फेरीवाला फेरसर्वेक्षणास मंजुरी

$
0
0
शहरात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण करुन त्यांना आकारण्यात येणारी नोंदणी फी पाचशे रुपयांवरुन तीनशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक महापालिकेच्या शहर फेरीवाला समितीची बैठक राजीव गांधी भवन येथे सोमवारी झाली.

दरोडे, घरफोडीने दहशतीचे वातावरण

$
0
0
तालुक्यातील धामणगाव व अंदरसूल शिवारात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडे टाकून सुमारे ३ लाख ९० हजार ५०० रुपयांची लूट केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोळी समाजावर स्वार्थातून अन्याय

$
0
0
टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी समाजाला अनुसूचित जातींच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आदिवासी वाल्मिक एकलव्य सेनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

राधेश्याम सोनीला न्यायालयीन कोठडी

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना ३८ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या लासलगाव येथील व्यापारी राधेश्याम सोनी याला निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सभापतीपदी पुन्हा ठकुबाई सावंत

$
0
0
इगतपुरी पंचायत समितीच्या अविश्वास ठराव नाट्यानंतर सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. आमदार गट व विरोधी गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सभागृहात नाट्यमय घडामोडी घडत चिठ्ठी प्रक्रियेने चमत्कार दाखविले. यात आमदार निर्मला गावित गटाची सरशी झाली. सभापतीपदी पुन्हा ठकुबाई सावंत विराजमान झाल्या.

सटाणा पालिका कामगारांचा मोर्चा

$
0
0
गत सात दिवसांपासून बेमुदत संपात उतरलेल्या सटाणा नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रशासनाला निवदेन दिले. सटाणा नगरपरिषदेचे १७८ कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले असून नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसलेले आहेत.

केबलचालकांकडून दंडाचीही वसुली

$
0
0
एप्रिल आणि मे या दोन महिन्याचा करमणूक कर प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर केबलचालकांनी भरला असला तरी त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या दंडातून किमान ३० लाख रुपये प्रशासनाला प्राप्त होणार आहेत.

‘त्या’ दोघा बोगस आर्किटेक्टची तक्रार

$
0
0
आर्किटेक्ट नसतानाही स्वतःला आर्किटेक्ट म्हणून सादर करणाऱ्या त्या दोघा आर्किटेक्टची तक्रार आर्किटेक्ट कौन्सिलकडे करण्यात आल्याची माहिती द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या (आयआयए) नाशिक शाखेचे अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

`भीक नको, हवे घामाचे दाम`

$
0
0
शेतमालाचा भाव सरकार व बाजार समिती ठरवते. शेतकऱ्याला कांदा उत्पादन करण्याचा, विकण्याचा अधिकार आहे. पण शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. व्यापारी आमचा दुश्मन नाही. हे व्यापारी आपल्याचं शेतकऱ्यांची पोर आहेत. शेतकरी विरोधी कायदे नसते तर आज व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना लुटणे शक्य नव्हते, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images