Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आहेरांनी स्वीकारला पदभार

$
0
0
प्रकृतीच्या कारणास्तव अश्विनी बोरस्ते यांनी काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नाशिक शहराध्यक्ष पदाची सूत्रे प्रभारी अध्यक्ष असलेल्या शरद आहेर यांच्याकडे सोपवली आहेत.

नाईक संस्थेत ‘परिवर्तन’

$
0
0
वंजारी समाजाची शिखर शैक्षणिक संस्था असलेल्या क्रांतीवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा ‘परिवर्तन’ होण्याची चिन्हे मत मोजणी दरम्यान दिसत होती. यंदा परिवर्तन पनलने सर्व जागांवर आघाडी घेतल्याचे रात्री ९ पर्यंतचे चित्र होते.

धरणसाठ्यात ४ टक्के वाढ

$
0
0
जिल्ह्यात यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली असली तरी आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १५ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसातील दमदार पावसामुळे धरणसाठ्यात ४ टक्के वाढ झाली आहे. धरण प‌‌रिसरात काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेल्थ केअरमध्ये १००० कोटी

$
0
0
देशात आरोग्य सुविधांबाबत उदयोन्मुख शहर बनलेल्या नाशिकला हेल्थ केअरमधील ‘बेस्ट इमर्जिंग सिटी इन हेल्थ केअर’चा मान मिळाल्याने शहरात देशातील दिग्गज साखळी हॉस्प‌िटल्स दाखल होत आहेत.

KBCच्या मालमत्तांवर येणार टाच

$
0
0
केबीसी कंपनीच्या चांदवड, घोटी येथील मालमत्तांसह आडगाव येथील कंपनीचे मुख्य कार्यालय उघडून त्यांची लवकरच तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात अटक असलेल्या सहा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत २४ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

व्यवस्थापनाचा ‘प्रताप’, विद्यार्थ्यांत संताप!

$
0
0
प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील यांना व्यवस्थापनाने पदावरून पायउतार केल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवारी स्वयंस्फूर्तीने कॉलेज बंद पाडले असून, जोपर्यंत प्राचार्यांना सन्मानाने पद दिले जात नाही, तोपर्यंत वर्गात एकही विद्यार्थी बसणार नाही, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये एकही नवा उद्योग का आला नाही?

$
0
0
गेल्या दहा वर्षांत नाशिकमध्ये एकही नवीन उद्योग, नवीन कंपनी आली नाही याचा आता गांभीर्याने विचार करावा लागेल, असे स्पष्ट करीत आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी मंगळवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाना साधला.

कर्मचा-यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

$
0
0
सिन्नर नगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेने प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन मंगळवारी आठव्या दिवशी सुरूच राहिले. संघटनेने मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देण्यात आले.

२९ पैकी २८ जागांवर परिवर्तन पॅनलची बाजी

$
0
0
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांना पराभवाचा दणका देत परिवर्तन पॅनलच्या कोंडाजी मामा आव्हाड यांनी व्ही. एन. नाईक संस्थेच्या निवडणुकीत २० पैकी २८ जागा मिळवित विजयश्री खेचून आणला आहे.

वेतन आयोगाला त्वरित माहिती पुरवा

$
0
0
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम बनणे आवश्यक आहे. त्यासाठी चौथ्या महाराष्ट्र वेतन आयोगाने मागितलेली माहिती सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित द्यावी, असे प्रतिपादन चौथ्या वेतन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी मंगळवारी येथे केले.

रस्त्यांच्या कामांना जोमाने सुरुवात

$
0
0
`खोदलेले रस्ते बनले स्विमिंग पूल` या मथळ्याखाली `मटा`ने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेने सातपूर भागात खोळंबलेली रस्त्यांची कामे तत्काळ सुरू केली आहेत. खोदलेल्या रस्त्यांमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या जाधव संकुलमधील रहिवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

क्रिकेट समालोचनाची नशा !

$
0
0
सध्या भारत-इंग्लंड दरम्यान अतिशय अटीतटीची पाच कसोटी सामन्यांची मालिका चालू आहे आणि भारताचा खेळ चांगला होत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमी प्रत्येक दिवसाच्या खेळाची मजा लुटत अाहेत.

पेपरलेसचा पारदर्शक मार्ग

$
0
0
प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाची किल्ली म्हटल्या जाणाऱ्या नियोजन विभागाला अत्याधुनिक तंत्र आणि यंत्राची जोड देवून तेथील काम पेपरलेस करण्याचा पायलट प्रोजेक्ट नाशिकमध्ये होत आहे.

अंगणवाडी सेविकांचा नाशिकरोडला मोर्चा

$
0
0
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे मंगळवारी विविध मागण्यांसाठी येथील महसूल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नंतर विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

शुक्रवारी गडकरी नाशकात

$
0
0
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय)च्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेसाठी केंद्रीय रस्ते व जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. केंद्रात मंत्री झाल्यानंतर गडकरींचा पहिलाच नाशिक दौरा असणार आहे.

विमान देखभाल-दुरुस्ती होणार

$
0
0
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या लष्करी विमाने व हेलिकॉप्टर्सची निर्मिती, दुरुस्ती व देखभाल करणा-या सरकारी नवग्रह कंपनीने ओझरच्या प्रकल्पात कार्गो हबबरोबरच विमान दुरुस्ती व देखभालीचे केंद्र (एमआरओ) स्थापण्यासाठीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.

१५ वर्षांनी वाढीव मोबदला

$
0
0
वालदेवी धरणासाठी जमिनी दिलेल्या नाशिक तालुक्यातील शेतक-यांना पंधरा वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. या धरणग्रस्तांना सात कोटींचा वाढीव मोबदला मिळणार आहे. कश्यपी धरणग्रस्तांसाठी एक कोटी पाच लाख २९ हजार व लाडची धरणग्रस्तांसाठी शासनाने ०.३८ लाख वर्ग केले आहे.

शाहीमार्गाची आज पाहणी

$
0
0
आगामी सिंहस्थाच्या पाश्वर्भूमीवर शाही मार्गावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी स्थायी समितीच्यावतीने बुधवारी मार्गाचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात परिसराची पहाणी करण्यात येणार असून, नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहे.

काँग्रेस-तिसरा महाजचा 'तलाक'

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेच्या सत्ताकरणात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस व तिसरा महाज यांची गेल्या दोन वर्षांपासून कुरूबरीत सुरू असलेला संसार अखेर तिसरा महाजचे आमदार इस्माईल यांच्या एकतर्फी 'तलाक ..तलाक ..तलाक ' घोषनेने संपुष्टात आला आहे.

KBC तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

$
0
0
अल्पमुदतीत दामदुप्पट पैसे देण्याचे आम‌िष दाखवून लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या केबीसी घोटाळ्याचा तपास आता आर्थ‌िक गुन्हे शाखेकडे सोपव‌िण्यात आला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images