Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बैठकीची घालमेल

$
0
0
सोमवारचा दिवस नाशिककरांसाठी व्हीआयपी होता. उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचा ताफा नाशकात असल्याने बंदोबस्त आणि त्यामुळे शहराला येणारे व्हीआयपी स्वरुप स्वाभाविकच होते. तर पॉईण्टचा मुद्दा असा की, विभागीय आयुक्तालयातील बैठक संपली आणि मंत्री त्यांचा ताफा घेऊन 'रेस्ट' करायला 'हाऊस'वर आले.

विवाहितेचा विनयभंग करून पतीवर हल्ला

$
0
0
आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून दिरानेच आपल्या भावच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना जुने नाशिक परिसरातील शिवलिंग अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपींने याच कारणावरून आपल्या भावावर हल्ला देखील केला.

'रामसर'चा प्रस्ताव तीन महिन्यात

$
0
0
'रामसर साइट' या जागतिक पाणथळांच्या यादीत समावेश होण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचा प्रस्ताव येत्या तीन महिन्यात राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव नाशिक वन्यजीव विभाग तयार करणार असून राज्य सरकारच्या मान्यतेनंतर तो केंद्र सरकारमार्गे युनेस्कोला पाठविला जाणार आहे.

ऑनलाइन गुन्हेगारी

$
0
0
'ऑनलाइन लॉटरी प्रकरणात लाखोंची फसवणूक', 'तुम्ही कोट्यवधी डॉलर जिंकला आहात असा ई-मेल पाठवून लाखोंना गंडा', 'अश्लील एसएमएस किंवा ई-मेल पाठवून किंवा फेक अकाउंट तयार करून कॉलेज तरुणीचा मानसिक छळ' अशा बातम्या आता नाशिक शहरासाठी नवीन राहिलेल्या नाहीत.

आणखी चार मेडिकलवर कारवाई

$
0
0
मेडिकल दुकानात अधिकृत फार्मासिस्ट नसल्याच्या कारणावरुन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उघडलेली मोहीम सुरुच असून गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यातील आणखी चार मेडिकल दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. या दुकानांवर खरेदी-विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

विभागासाठी ८८० कोटींच्या खर्चाला मान्यता

$
0
0
जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक विभागाच्या ८८० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा वार्षिक योजनेच्या रकमेपैकी १५ टक्के रक्कम दुष्काळी कामांसाठी खर्च करण्याची यावेळी अनुमती देण्यात आली.

STची स्वच्छता पुन्हा ठेकेदाराच्याच हवाली?

$
0
0
ठेकेदारांची मनमानी आणि दडपशाहीने हात पोळूनदेखील एसटी महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने एसटी स्वच्छतेचे (वॉशिंग अँड क्लीनिंग) काम पुन्हा ठेकेदाराच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नोकरीसाठी वेटिंगवर असलेल्या शेकडो अनुकंपाधारकांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहेत.

शिक्षक, शिक्षकेतर परिषदेचे धरणे

$
0
0
'महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थे'मध्ये गैरप्रकारांचा अवलंब होत असल्याचे कारण देत महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेतर परिषदेमार्फत पुण्यामध्ये धरणे आंदोलन आरंभण्यात आले आहे. पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून हे बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या मनमाड कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी आणि या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांच्यासह सहका-यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

पाणीकपातीसाठी नगरसेवकच आग्रही

$
0
0
पाणी कपातीचा मुद्दा काढताच राजकारण्यांच्या तोंडचे पाणी पळते. पाणी कपात केल्यास आगामी निवडणुकीत आपला घसा कोरडा होईल, अशी मनोमन भीती त्यांना वाटत असते. परंतु सिडकोचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आपल्या प्रभागातील एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद करावा, असे निवेदन आयुक्तांना देऊन सगळ्यांनाच 'बुचकळ्यात' टाकले आहे.

संघटना हेच यशवंतरावांचे अधिष्ठान

$
0
0
बहुजन सामाजिक न्यायाची मागणी करताहेत मात्र राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला विरोध करून तो न्याय मिळविण्याला अर्थ नाही, असा विचार अत्यंत कोवळ्या वयात करून यशवंतराव चव्हाण यांनी आपल्यातील मुत्सद्दीपणा दाखवला, संघटना हेच अधिष्ठान मानत त्यांनी राजकीय वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

अनुभवाच्या परिपक्वतेतून येणारे साहित्य समृद्ध

$
0
0
आयुष्याचा उत्तरार्थ हा परिपक्वतेचा असतो. आपल्याला आलेल्या अनुभवांच्या परिपक्वतेतून येणारे साहित्य हे अधिक सकस, समृद्ध आणि जीवनाशी नाते सांगणारे असते. संत साहित्यातील अभंग या वाङमय प्रकारात हे दिसून येते. मंगलाताई गोखले यांच्या भक्तिसुगंध या काव्यसंगहात हीच प्रगल्भता जाणवत असल्याचे प्रतिपादन कवी ना. धों. महानोर यांनी केले.

मनमाडला पाणी मिळणारच

$
0
0
काही दिवसांपासून मनमाड शहरात पाणी केव्हा मिळेल, याची शाश्वती नाही, असे चित्र उभे करून चुकीची माहिती दिली जात आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे, टीका करणे गैर नाही, पण चुकीची माहिती देऊन लोकांमध्ये अफवा पसवणे गैर आहे. मनमाडसाठी पाणी मिळणारच, असे नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

प्रदेश कोअर कमिटी ठरवणार जिल्हाध्यक्ष

$
0
0
इच्छुकांची गर्दी व एका नावावर होत नसलेली सहमती यामुळे भाजप जिल्हाध्यक्षाची निवड पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीवर सोपविण्यात आली. मुख्य म्हणजे इच्छुक उमेदवारांनीच ही मागणी केल्याने जिल्हाध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता वाढली आहे.

सिंहस्थ निधी : मंत्रीमंडळात निर्णय घेऊ

$
0
0
आगामी सिहस्थांसाठी निधी उपलब्ध होण्याकरता मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन हा निधी जिल्हाप्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल कार्यालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीदरम्यान दिले.

एलईडीतून उघड झाला बेबनाव

$
0
0
एलईडी फिटींगच्या मंजुरीच्या ‌प्रक्रियेसह ‌निविदेवर आक्षेप घेणा-या महापालिकेतील पदाधिका-यांना त्यांच्याच पक्षातील स्थायी समितीच्या सदस्यांनी चपराक दिल्याचे सोमवारी ‌निदर्शनास आले. त्यातील काही सदस्यांनी खुलेपणाने तर काहींनी मौन बाळगून प्रस्तावाला समर्थन दिले.

दूध सहकारी संस्थांना घरघर

$
0
0
नाशिक जिल्ह्याचे दूधाचे उत्पादन वाढावे यासाठी सहकारी दूध संस्थांचे जाळे जिल्हाभरात उभे करण्यात आले होते. मात्र सरकारच्या दूर्लक्षामुळे ६५७ पैकी ५६२ दूध सहकारी संस्था आटल्या असून फक्त ९५ संस्था सुरू आहेत. त्यांच्याकडून दररोज फक्त ५२ हजार लीटर संकलन होते.

विद्यार्थ्यांना 'ती' समस्या नाही

$
0
0
दहावीमध्ये विज्ञान विषयात ४० पेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना ११ वी मध्ये विज्ञान शाखेला प्रवेश देण्या-या कॉलेजांची मान्यता रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले जातील अशी सूचना नाशिकमध्ये बोर्डाने दिली होती. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या धास्तीने जुलै महिन्यातच संबंधित कॉलेजांनी हे प्रवेश रद्द केले होते.

रेल्वेची खडी उडाल्याने आठ जखमी

$
0
0
रेल्वे रुळाखालील खडी उडाल्याने रेल्वेचे आठ कर्मचारी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी लहवित जवळील गंगापाडळी परिसरात घडली. जखमींना नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

क्लीनर भरतीकडे डोळेझाक

$
0
0
अनुकंपावरील कर्मचा-यांची गोठविलेली पदे मुक्त करुन एसटीची स्वच्छता स्वतःच करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी २८ एप्रिल २०१२ ला जाहीर केला होता. असे असतानाही त्या निर्णयाकडे पाठ करत एसटीच्या अधिका-यांनी ठेकेदार धार्जिने धोरण स्विकारत, वर्षांनुवर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटूंबांना वा-यावर सोडले आहे.

लेखक नंदींना अटक करा

$
0
0
मागासवर्गीय समाजाला भ्रष्टाचारी म्हणणा-या वादग्रस्त लेखक आशिष नंदी यांना त्वरीत अटक करावी, या मागणीसाठी नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षातील बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत 'बहुजन समाज कृती समिती'ची स्थापना केली. दरम्यान लेखक नंदींना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन खासदार भुजबळ यांनी विभागीय महसूल आयुक्तांना सोमवारी दिले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images