Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चमचमीत अन् चवदार ठेवा

$
0
0
सूप, स्टार्टर्स आणि मेन कोर्समधील विविध पदार्थांचे प्रशिक्षण घेत महिलांनी ‘चमचमीत अन् चवदार’ या कुकरी वर्कशॉपध्ये विविध बक्षिसेही मिळवली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘मायको एम्प्लॉइज फोरम’मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना शेफ सुबोध झारे यांच्या मार्गदर्शनाखाली चमचमीत अन् चवदार पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले.

डीडीसीसी कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0
धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (डीडीसीसी) परवाना रद्द करण्याची पूर्वतयारी रिझर्व्ह बँकेने सुरू केल्याची कुणकुण लागताच बँकेच्या सुमारे पाचशे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी थकबाकीदार असलेल्या शिरपूरच्या प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीसमोर जोरदार निदर्शने केली.

साक्रीतील ‘सौर’वीज मार्चअखेरपासून

$
0
0
हेक्टरगणिक पसरलेला उजाड प्रदेश, एका बाजूस पवन ऊर्जेच्या शेकडो चक्रांची भिंत आणि दुसरीकडे हजारो एकरांवर फुललेली सौर ऊर्जेची शेती… धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये असलेल्या शिवाजीनगर गावाच्या ओसाड रानाची ही सध्याची स्थिती.

नाशिक मनपात सत्ताधारी मनसे-भाजप युतीत तणाव नाही

$
0
0
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हल्लाबोल केल्यानंतर नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी 'पेटून उठल्याचे' उसने अवसान आणले खरे; परंतु 'आगामी सत्ताकारणातील सहभागावर पक्षाची भूमिका काय राहिल?' या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर 'नो कमेंट' असे उत्तर देऊन उपमहापौर सतीश कुलकर्णी आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी आपले 'मनसे'प्रेम दाखवून दिले.

कार्बाइड नको, इथिलिन गॅस वापरा

$
0
0
कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी कार्बाइडचा वापर करण्याऐवजी इथिलिन गॅसचा वापर करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आंबा विक्रेत्यांना दिले आहेत. आंब्याचा आगामी हंगाम लक्षात घेऊन गॅस वापराचा ‘फॉर्म्युला’ देण्यात आला आहे.

... तर परिणाम स्थायी, प्रभाग समित्यांवर

$
0
0
राज्याच्या राजकारणात आता मनसे आणि भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम नाशिक महापालिकेच्या सत्ताकारणावर होऊ शकतो. मनसे आणि भाजपमध्ये तेढ वाढत गेल्यास स्थायी समितीच्या सभापतीपदासह प्रभाग समित्यांच्या निवडणुकांची समीकरणे बदलणे शक्य आहे.

मारहाण करून तरुणाचा खून

$
0
0
रात्री पायी जाणाऱ्या तरुणास मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना भद्रकाली परिसरात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी तपास करीत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले.

गावकऱ्यांना मिळाली रोजगाराची ऊर्जा

$
0
0
जानेवारीचे वेध लागले की साक्री तालुक्यातील लोक रोजंदारीच्या शोधात गुजरातच्या दिशेने कूच करतात. गवंडी काम, वीटभट्ट्यांची कामे करत पावसाची वाट पाहात मिळेल तो रोजगार घेतात. शिवाजीनगर येथे सुरू झालेल्या १५० मेगावॉटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामांमुळे परिसरातील गावकऱ्यांच्या हातांना चांगले काम मिळाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थलांतरही कमी झाले आहे.

५३ गावांना टँकरने पाणीपुरवठा

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील पाच धरणे कोरडी पडली असून ६३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यात ६३ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. ५८ टँकरच्या माध्यमातून या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.

शिरपूर पॅटर्नचा पहिला बांध चाळीसगावला

$
0
0
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात करजगाव शिवारात शिरपूर पॅटर्नचा कामाचा शुभारंभ नुकताच झाला. शिरपूर पॅटर्न जिल्ह्यात राबवता येईल काय, याबाबत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी या शिरपूर पॅटर्नचे जनक भूवैज्ञनिक सुरेश खानापूरकर यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन केले होते.

सरकारविरोधात चक्का जाम करा

$
0
0
एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे नतद्रष्ट आघाडी सरकारचा कारभार, अशा परिस्थितीत आपल्या अधिकारांसाठी जनतेने सरकारविरोधात देशभर चक्का जाम करावा, असे आवाहन माकपाचे खासदार सीताराम येच्युरी यांनी केले.

‘आयएमए’चा जेनेरिक मेडिसिन स्टोअरसाठी पुढाकार

$
0
0
नाशिकमधील पहिले जेनेरिक मेडिसिन स्टोअर शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये सुरु होणार आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेने हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात हे स्टोअर सुरु होण्याची शक्यता आहे.

वकिलांचे कामबंद; कोर्टात शांतता

$
0
0
जयपूर व चंदिगड येथे वकिलांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिक वकील संघाने कामबंद आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. अखिल भारतीय वकील परिषदेने देशभरातील वकीलवर्गास कोर्टाच्या कामात सहभागी न होण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक वकील संघाने हे आंदोलन केले.

पालकांची पोलिसांकडे धाव

$
0
0
रासबिहारी शाळेच्या फी वाढीला विरोध करणाऱ्या पालकांच्या मुलांवर शाळेमध्ये अन्याय होत असल्याची तक्रार करत संबंधित पालकांनी सोमवारी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले असून संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी तक्रारीवर कारवाई करण्यास नकार ‌दिला आहे.

‘महा’पालिकेच्याच पाणपोई तहानलेल्या

$
0
0
शहरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे; परंतु पाणपोईसाठी देखील पाणी नाही अशी अवस्था मात्र नक्कीच नाही. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास व महापालिका प्रशासनाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यास पाणपोईत पाणी ठेवणे सहजशक्य आहे.

गुन्हेगारीकडे झेपावलेले राजकारण

$
0
0
कितीही चघळला तरी चोथा होत नाही असा विषय म्हणजे राजकारणातील गुन्हेगारीकरण. जो वर्ग एरवी याकडे दुर्लक्ष करतो, त्यालाही आता या विषयाची गोडी वाटू लागली आहे! पण चघळून हा विषय तोंडावेगळा करताना दोषाची वाटणी मात्र, क्वचितच वास्तवाशी मेळ खाते.

फुकट्या कानाचा!

काळाराम मंदिरात बसले मेटल डिटेक्टर

$
0
0
धार्मिक मंदिरांना सुरक्षा देण्याच्या प्रश्नावर अनेक शहरांमध्ये केवळ चर्चा-बैठका होत असताना काळाराम मंदिरात मात्र तातडीने मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे. मंदिर सुरक्षेच्या प्रश्नावर ‘मटा’ने नुकतीच सिरिज केली होती. त्यात काळाराम मंदिरात केलेले स्टींग प्रसिध्द केल्यानंतर ‌विश्वस्तांच्या बैठकीत डिटेक्टर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

भगवद्प्राप्ती सहज सुलभ

$
0
0
सदैव प्रसन्न राहणे हीच ईश्वराची सर्वतोपरी भक्ती आहे. भगवंताला दूर मानणे म्हणजे भगवंताचा अपमान करण्यासारखेच आहे. भगवदप्राप्ती सहज सुलभ आहे फक्त हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्याचा मृत्यु होत नाही, वियोग होत नाही, जो धोका देत नाही त्याचे नाव भगवंत. असे प्रतिपादन आसाराम बापू यांनी केले.

...तर यशवंतराव चव्हाण साहित्यिक झाले असते

$
0
0
‘यशवंतरावांनी ‘कृष्णाकाठ’सारखे नितांत सुंदर आत्मचरित्र लिहिले. ते राजकारणात नसते तर मोठे साहित्यिक असते,’ असे प्रतिपादन भालचंद्र नेमाडे यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images