Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

...तर, स्वत: उमेदवारी करणार

$
0
0
माजी आमदार मारोतराव पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून येवला मतदारसंघातून उमेदवारी केल्यास आपण त्याच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहोत. मात्र, मारोतराव नसले तर स्वत: उमेदवारी करेल, अशी घोषणा शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

चिमुकल्या जीवासाठी हवा मदतीचा हात

$
0
0
आपल्या दोन लहान मुलांना थॅलेमेसिया हा गंभीर आजार जडल्याने हवालदिल झालेल्या मनमाड येथील दिगंबर हातांगले या रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या पित्याची आपल्या मुलांना वाचविण्यासाठी जीवापाड धडपड सुरू आहे.

नदीपात्रातच मिसळतेय सांडपाणी

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने नदी, नाले खळखळून वाहत आहेत. मात्र, पालिका प्रशासनाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नसल्याने नदीपात्रात सांडपाणी मिसळले जात आहे. या प्रकल्पाच्या आउटलेटमधून काळेशार पाणी बाहेर पडून नदीपात्रात विलिन होत आहे.

मालेगावातही दमदार हजेरी

$
0
0
मालेगाव शहर व तालुक्यात मंगळवार रात्रीपासून पावसाची संततधार बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत होते.

बागलाण तालुक्यात रिपरिप

$
0
0
सटाणा शहरासह तालुक्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारी प्रथमच वरूणराजाचे जोरदार आगमन झाल्याने शहरासह तालुकावासीय सुखावले आहेत. रात्रीपासून संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

मनमाडमध्ये सरींवर सरी

$
0
0
मनमाड शहर व परिसरात मंगळवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्यासाठी आसुसलेल्या मनमाडकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रूपविंदर कौर यांच्या `ड्यु ड्रॉप`चे प्रकाशन

$
0
0
माणसाच्या संवेदना बोथट होत असताना निर्सगाशी एकरुप होत नव्हे तर आपल्या जगण्याशी त्यांचा संबध जोडून घेण्याचे काम डॉ. रूपविंदर कौर यांच्या ड्यु ड्रॉप काव्यसंग्रहाने केले आहे.

स्वस्ताईचं स्मरणरंजन

$
0
0
पुढच्या वर्षी या काळात सिंहस्थ सुरू झालेला असेल. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आराखडाही तयार आहे. येत्या वर्षभरात नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची कामं होतील. आज एवढे मोठे आकडे वाचताना विशेष वाटत नाही.

आयुर्वेद हेल्थ कल्चर व्हावं

$
0
0
नाशिकला बेस्ट इमर्जिंग सिटी इन हेल्थ केअर हे बिरूद मिळाल्याने प्रत्येकाच्या नजरा मोठमोठाली हॉस्प‌िटल्स अन् सुपर स्पेशालिटी सुविधा देत असलेल्या हॉस्प‌िटल्सकडे वळतात. मात्र, या चिकित्सा पद्धतीपूर्वी नाशिकला आयुर्वेदाची मोठी परंपरा राहिली आहे. आजही शहरात आयुर्वेदाने आपला दर्जा राखला असून, आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.

हेल्थ केअर सर्वसमावेशक हवे

$
0
0
वैद्यकीय सेवांचा जवळपास ९० टक्के वाटा खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा आहे. हल्ली कोणीही सरकारी आरोग्य सेवेकडे वळत नसल्याचे दिसते. सरकारी क्षेत्रावर नियंत्रण- व्यवस्थापन नसल्याने सरकारी हेल्थ केअरची वाताहत पहायला मिळते.

शिक्षक संख्या वाढवा

$
0
0
इगतपुरी तालुक्यात शिक्षण आपल्या दारी या योजनेचा बोजवारा उडाला आहे. पाच वर्गांना एकच शिक्षक असल्याने शिक्षणाचे तीन तेरा नऊ बारा झाले आहेत. यामुळे पाचवीपर्यंत एक शिक्षक असलेल्या वर्गांसाठी तत्काळ शिक्षकांची संख्या वाढवावी, अशी मागणी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

मालेगावच्या उर्दू साहित्यविश्वाचा गौरव

$
0
0
मालेगाव शहरात उर्दू साहित्याची मोठी परंपरा आहे. या साहित्याचा व साहित्यिकांचा गौरव राज्य शासनाकडून होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासन उर्दू साहित्य अकादमीच्या सन २0१३ च्या वार्षिक पुरस्कारांसाठी येथील इक्बाल बर्की, अश्पाक उमर, डॉ. इलियास सिद्दिकी, जाहीद अख्तर या चौघा लेखकांची निवड करण्यात आली आहे.

विंचुरेचा जलकुंभ बनला शोभेचे बाहुले

$
0
0
विंचुरे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीने गेल्या सात वर्षांपासून उभारलेला पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ केवळ शोभेचे बाहुले ठरले आहे. सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून देखील या जलकुंभातून पाण्याचा एकही थेंब वितरित होत नाही. परिणामी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

‘फळबाग योजनेला मुदतवाढ द्या’

$
0
0
राज्य शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेऐवजी पूर्वीचीच शंभर टक्के फळबाग अनुदान योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या डाळिंब उत्पादकांनी अद्यापही फळ लागवड केलेली नाही.

स्वस्त धान्य दुकानाविरोधात तक्रारी

$
0
0
येवला तालुक्यातील लौकीशिरस येथील तेजस्वी महिला बचत गटाच्या ताब्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानाविरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यातच या महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाचा कारभार पाहणाऱ्या महिलांनी गावातील ग्रामस्थानंविरोधात येवला तालुका पोलिस स्टेशनमधे जातीवाचक व मारहाणीच्या तक्रारी दाखल करीत ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्याने तणावात भर पडली आहे.

बॅकवॉटरमुळे तापीला पूर

$
0
0
गेल्या दीड महिन्यांंपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने मंगळवारी रात्रीपासून खान्देशावर आपली कृषादृष्टी दाखवली आहे. मंगळवार रात्रीपासून रिमझिम तर बुधवारी पहाटे तीन वाजेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण खान्देशातील नदी नाल्यांना पाणी आले आहे.

१४७ मिमी पावसाची चाळीसगावात नोंद

$
0
0
चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यात बुधवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. संततधार पावसामुळे नोकरदारांसह विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

$
0
0
मंगळवार रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तापी नदीला महापूर येण्याची शक्यात असून आहे. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे.

एसएमएस स्पर्धेचे विजेते जाहीर

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सतर्फे अनवट या चित्रपटाची एसएमएस कॉन्टेस्ट घेण्यात आली होती. यावेळी प्रश्न होता आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी यापैकी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले आहे ? पर्याय होते a- झपाटलेला, b-दुभंग आणि c दुनियादारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते दुभंग.

कम्युनिटी कॉलेजअंतर्गत नवे अभ्यासक्रम

$
0
0
कम्युनिटी कॉलेज संकल्पनेंतर्गत केटीएचएम कॉलेजमध्ये तीन नव्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. यात बॅचलर ऑफ व्होकेशनल इन इंटेरिअर डिझाईन अॅण्ड प्रिंटींग टेक्नोलॉजी, सर्टीफ‌िकेट/ डिप्लोमा कोर्स इन अॅनॅल‌िटीकल टेक्निक्स फॉर फार्मासुटिकल्स आण‌ि नॅनो सायन्स व नॅनो टेक्नोलॉजी या व‌िषयांचा समावेश आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images