Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

परिसराला प्रदूषणाचा विळखा

$
0
0
प्रभाग १६ मधील आसाराम बापू आश्रम परिसर प्रदुषणाच्या विळख्यात सापडला आहे. येथील नदीपात्राच्या किनारी बरेचसे नाले फुटलेले असल्याने नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.

डाटा एंट्रीच्या नावाखाली फसवणूक

$
0
0
डाटा एन्ट्रीच्या कामांसाठी सुमारे दोन लाख रुपये डिपॉझिट घेऊनही अस्तित्वात नसलेल्या कंपनीची कामे देऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कामगारसेनेचे वेतनासाठी ठिय्या आंदोलन

$
0
0
सहाव्या वेतन आयोगाचा फरक व कामगारांना देय असलेली इतर रक्कम त्वरित मिळावी यासाठी बुधवारी कामगार संघटनांच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या आंदोलनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगारांना देय असलेली रक्कम दोन हप्त्यात देण्याचे आश्वासन प्रभारी आयुक्त संजीव कुमार यांनी दिले.

‘बीएआय’ची उद्यापासून परिषद

$
0
0
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची (बीएआय) दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला येत्या शुक्रवारी प्रारंभ होणार आहे. या परिषदेत देशभरातील तब्बल हजार प्रतिनिधी सहभागी होणार असून, बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील संधी तसेच आव्हाने या विषयावर या परिषदेत विचारमंथन केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या पश्चिम विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

`पोळ यांच्यावर गुन्हा दाखल करा

$
0
0
विवेक आणि विज्ञाननिष्ठेचा आयुष्यभर जागर करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा तपास करताना पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेट या तथ्यहीन पध्दतीचा अवलंब केला. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

निमाच्या अध्यक्षपदी रवी वर्मा

$
0
0
तब्बल दोन दिवसांच्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या अध्यक्षपदाची माळ रवी वर्मा यांच्या गळ्यात पडली आहे. निमाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीसाठी कसोशीचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

महापालिकेत सत्ताधाऱ्यांचेच आंदोलन

$
0
0
नाशिक महापालिकेला राज्य सरकारने पूर्णवेळ आयुक्त द्यावा, या मागणीसाठी सत्ताधारी मनसेनेच महापालिकेसमोर आंदोलन केले. यावेळी महापालिकेत जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने सकाळी दहावाजेपासून कामगार प्रवेशद्वाराजवळ उभे होते.

टिप्पर गँगची कारागृहातही दहशत

$
0
0
जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहात टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाणने इतर कैद्यांच्या मदतीने एका कैद्याला मारहाण केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

लालफितीत दबला भावनांचा उद्रेक

$
0
0
केबीसी फसवणुकीतील मुख्य सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, फसवणूक झालेल्या छोट्या गुंतवणूकादारांना सरकारने पैसे द्यावेत, या मागण्यांसाठी गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला.

अक्षय ऊर्जेवर परिसंवाद

$
0
0
महाराष्ट्र नॉन कन्व्हेन्श‌नल एनर्जी प्रोड्यूसर असोस‌िएशनच्या वतीने शन‌िवारी (द‌ि. २६) अक्षय उर्जा उत्पादन आण‌ि वापर या व‌िषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी फार्मसी कॉलेज येथे हा उपक्रम होणार आहे.

मूत्रप‌िंड शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

$
0
0
आर्थिक प्रत‌िकूल प‌रिस्थ‌ितीत मूत्रप‌िंडाच्या आजाराशी झुंजणाऱ्या तरुणावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी मदतीचे आवाहन केले आहे. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च येणार आहे.

लोकमान्य टिळक यांना आदरांजली

$
0
0
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नाशिकरोड येथील देवीचौकातील पुतळ्याला शिवसेनाप्रणित युवासेनेचे विभागप्रमुख समर्थ मुठाळ यांनी पुष्पहार अर्पण केला.

कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

$
0
0
जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहात टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाणने इतर कैद्यांच्या मदतीने एका कैद्याला मारहाण केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

खरंच, देखते रह जाओगे...

$
0
0
समारंभ, नोकरी किंवा कालेजमध्ये जाताना आपल्याकडे सर्वांचे लक्ष जावे, असे प्रत्येक महिलेला वाटते. प्रत्येक टप्प्यावर प्रेझेंटबल कसे राहावे, याच्या टीप्स आज देखते रह जाओगे या मोफत ग्रुमिंग वर्कशॉपमध्ये मिळाल्याने महिलावर्ग जाम खूश होता.

आयुर्वेदच्या पोथ्या एका छताखाली

$
0
0
मंत्रभूमी नाशिक आयुर्वेदशास्त्रासाठी पुराणापासून प्रसिद्ध होती, याचे दाखले सापडतात. रामायणापासून दिसणाऱ्या आयुर्वेद शास्त्राची महती १० व्या शतकातील पोथ्या व ग्रंथांमध्ये आढळते.

जिल्हाभरात जोर‘धार’

$
0
0
तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

तिथे लॉजिंग-बोर्डींग सुरू करा?

$
0
0
महाराष्ट्र सदनाच्या वादावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांवर तोफ डागलीय. 'भुजबळांनी महाराष्ट्र सदनाचं नाव बदलून तिथे लॉजिंग-बोर्डींग सुरू करावं', अशी सडकून टीका उद्धव यांनी केलीय.

गरज प्रगल्भ समाज मनाची

$
0
0
नाशिक आधाराश्रमातून तीन व्याधीग्रस्त मुले-मुली केअरिंग (चाईल्ड अॅडॉप्शन रिसोर्स इन्फरमेशन अॅण्ड गायडन्स सिस्टीम)च्या तरतुदीमुळे स्पेन व इटलीच्या दाम्पत्यांनी अॅडॉप्ट केली. भारतात या बालकांना कोणी वाली मिळू नये, ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे.

कुशल संघटक : अर‌व‌िंद (काका) तरटे

$
0
0
कर्तेपणा स्वत:कडे न घेता व‌िधायक सूत्रासाठी अखंड झटणारी काही व्यक्त‌िमत्व समाजात असतात. समाजोध्दाराच्या उद्दिष्टासाठी प्रसंगी स्वत: झळ सोसून या उद्दिष्टाचं रक्षण करणाऱ्या पुरुषाला समर्थांनी दासबोधात ‘कुशल संघटक’ म्हटले आहे.

पिक्चरची डीव्हीडी

$
0
0
अनेक इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात असले तरी कित्येकदा आपल्याला त्याचा नेमका अर्थ माहीती असतोच असं नाही. त्यामुळे कधी कधी आपला चांगलाच ढोल वाजतो. असाच एक किस्सा घडला. शहरात एका आगामी सिनेमाविषयी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images