Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

श्रावणाच्या पहिल्या सरीत वृक्षारोपण

$
0
0
श्रावणाच्या पहिल्या सरीत बालगोपाळांसह राणेनगर परिसर मित्रमंडळातर्फे २५ दुर्मीळ झाडे लावण्यात आली. राणेनगरातील पोलिस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या जागेतील समाज मंदिराच्या प्रांगणात ही झाडे लावण्यात आली.

`क्रीडा साधना`तर्फे कारगिल दिन साजरा

$
0
0
क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडा साधना संस्थेतर्फे दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यंदाही एनसीसीच्या ७ महाराष्ट्र बटालियनला प्रशिक्षण देणाऱ्या ३५ सैनिकी अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला.

ठिय्या मांडलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

$
0
0
एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक वेळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत आढावा घेण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. १७ जुलै रोजी झालेल्या महासभेत नगरसेवक दिनकर पाटील यांनी सदर प्रश्न उपस्थित केला होता.

‘मानधनावरील नियुक्ती’ येणार स्थायीवर

$
0
0
महापालिका हॉस्पिटल्सच्या सुरक्षेसाठी मानधन तत्त्वावर १५२ कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर आगामी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाईल हिसकावून पोबारा

$
0
0
पायी चाललेल्या तरुणीच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पोबारा केला. गंगापूररोडवर ही घटना घडली. जागृती संजय पाटील (२०, रा. सिध्दार्थ बंगला, जेहान सर्कल) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

तीन तासांत दरोडेखोर जेरबंद

$
0
0
नाशिकरोडच्या शहाणे ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याच्या शोधासाठी शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त संदीप दिवाण, डॉ. डी. एस. स्वामी, अविनाश बारगळ, सहाय्यक आयुक्त हेमराजसिंग राजपूत, फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

आता तरी CCTV कॅमरे बसविणार का?

$
0
0
नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकाजवळील शहाणे ज्वेलर्सवर रविवारी भरदुपारी दरोडा पडल्यानंतर तरी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार का, असा सवाल नागरिक आणि व्यावसायिक उपस्थित करत आहेत.

भय इथले संपत नाही...

$
0
0
‘मनप्पूरम गोल्ड लोन’मधून १५ किलो सोने पळवून नेल्याच्या घटनेनंतर नाशिकरोड परिसर चर्चेत आला आहे. नाशिकरोड परिसरातील पोतदार ज्वेलर्स तसेच दैवी चौकातील सराफ दुकानांतही चोरट्यांनी हात साफ करण्याच्या घटना घडल्याने व्यापारी धास्तावले आहेत.

आई-वडील हेच आपले परमेश्वर

$
0
0
‘आपल्या घरात दोन फुटांवर बसलेली आपली पत्नी किंवा चार फुटावर बसलेल्या आईशी संवाद करायला आपल्याकडे वेळ नाही. परंतु, फेसबुक किंवा व्हॉटस् अॅपवर चारशे मैलांवर बसलेल्या व्यक्तीशी बोलायला आपल्याकडे वेळच वेळ आहे.

मालेगावी भगवा सप्ताह अभियान

$
0
0
शिवसेना युवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नुकतेच " गाव तिथे शाखा , घर तिथे शिवसैनिक ' अभियानाची घोषणा केली होती. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालेगावचे शिवसेना आमदार दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली येथील शिवसेनेचा 'भगवा सप्ताह'ला श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे शुभारंभ करण्यात आला.

‘कालिदास’च्या बाहेर खुला रंगमंच बांधावा

$
0
0
नाशिकमधील कलाकारांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी महाकवी कालिदास कलामंदिराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेवर खुला रंगमंच बांधून द्यावा. यासाठी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

गायरान जमीन हस्तांतरित करा

$
0
0
सटाणा शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठेगोंडा येथील गायरान जमिनीचे हस्तांतरण सटाणा पालिकेकडे करून देण्याची मागणी सटाणा नगरपरिषदेचे गटनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते काका रौंदळ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

मालेगावी मनपा महासभेची उत्सुकता

$
0
0
मागच्या आठवड्यात मालेगाव मनपात असलेली काँग्रेस-तिसरा महाजची युती संपुष्टात आल्याची एकतर्फी घोषणा आमदार मुफ्ती मोहम्मद यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे होणे अपेक्षित होते, अशी चर्चा मालेगावच्या राजकीय वर्तुळात असली तरी केवळ विधानसभा निवडणूक एवढेच गणित या राजकीय उलथापालथीमागे नसून, त्याचा परिणाम मनपातील सत्तांतरणातही होवू शकतो.

ब्रह्मगिरी, गंगाद्वार विकासाच्या प्रतीक्षेत

$
0
0
आजपासून सुरू होणाऱ्या श्रावणी सोमवारच्या फेरीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे ते ब्रह्मगिरी पर्वतराजींना. मात्र, या परिसराच्या विकासासाठी सरकारने आखडता हात घेतल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भावली धरणावर दल लेकची अनुभूती

$
0
0
महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपूरी तालुक्यातील भावली धरणाचा नयनरम्य परिसर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कंबर कसली आहे.

‘नॅक’ला म‌िळणार स्वायत्त दर्जा

$
0
0
उच्च श‌िक्षणाच्या मूल्यांकनासाठी देशस्तरावर कार्यरत असणारी ‘नॅक’ यंत्रणा (नॅशनल अॅसेसमेंट अॅण्ड अॅक्रिडेशन कौन्स‌िल) आता व‌िद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) पंखाखालून स्वतंत्र होणार आहे. यापुढे ‘नॅक’ यंत्रणेवर केंद्रीय मनुष्यबळ व‌िभागाचे न‌ियंत्रण असणार आहे.

आरोपींच्या मालमत्ता गोठविल्या

$
0
0
केबीसीतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ७३ कोटींच्या मालमत्ता गोठविण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांबाबत कुणाला माह‌िती असेल तर ती माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

गोळीबार करून दरोडा

$
0
0
नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकाजवळील शहाणे ज्वेलर्सवर आज भरदुपारी पडलेल्या दरोड्यात रोकड आणि सोन्याची लुट करण्यात आली. दरोडेखोरांच्या गोळीबारात दुकानमालक व त्याचा मावस भाऊ जखमी झाला.

गंगापूर धरणालगत अॅडव्हेंचर क्लब

$
0
0
गापूर धरण परिसरात साकारत असलेल्या पर्यटन महासंकुलात लवकरच अॅडव्हेंचर स्पोर्टस् क्लब सुरू होणार आहे.

पवार यांना आरक्षणविरोधाची धग

$
0
0
नंदुरबारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी स्थानिक आदिवासींचा रोष सहन करावा लागला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images