Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तीर्थक्षेत्री सुविधांची वानवा

0
0
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यावर त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी वाढते. पूर्ण महिनाभर शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. यावर्षी पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र वाहनतळाची दुरवस्था, पाणीप्रश्न, गटारींचे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

कळवणला शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी

0
0
कळवण तालुक्यातील जागृत समजल्या जाणाऱ्या मार्कण्ड पिंपरी, शिरसमणी, सिध्देश्वर,पाळ या ठिकाणच्या शिवमंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी दर्शनसाठी भाविकांनी गर्दी केली होती. पावसासाठी महादेवाला साकडे घालण्यात आले.

पर्यटनाला एमटीडीसीची साथ

0
0
राकट, कणखर आणि दगडांच्या महाराष्ट्राला जाज्वल्य आणि रोमहर्षित करणारा इतिहास आहे. पर्यटनासाठी बाहेर पडताना तेथील भौगोलिक परिस्थितीशी, निसर्गाशी नाते जोडले जाणे आवश्यक असते. त्यासाठी पर्यटकांना माह‌ीत नसलेली ठिकाणे प्रकाश झोतात आणणे हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उद्देश आहे.

प्रभाग ४७ मध्ये सभागृहाचे भूमीपूजन

0
0
नवीन नाशिक येथील प्रभाग क्रमांक ४७ मध्ये मनपाच्या जागेवर सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन आमदार नितीन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार नित‌ीन भोसले यांच्या निधीतून हे काम होणार आहे.

पैठणीची न्यारी दुनिया होणार खुली

0
0
विविध प्रकारच्या पैठणी एकाच दालनात असे वैशिष्ट असणारे येवला ग्रामीण पर्यटन केंद्र लवकरच पर्यटकांच्या सेवेत रूजू होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचा शुभारंभ होणार असून, पैठणी क्लस्टरचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

परवडणारी घरे आता प्रभागातच!

0
0
दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी २० टक्के घरे आता मोठ्या प्रकल्पांच्या प्रभागातच उपलब्ध होणार आहेत. तसे, आदेशच मुंबई हाय कोर्टाने दिले आहेत.

इस्पॅल‌ियर स्कूलने दिला एकात्मतेचा संदेश

0
0
सर्वधर्मीय प्रार्थनेची श‌िकवण प्रत्यक्षात आचरणात आणत इस्पॅल‌ियर स्कूलच्या पाचशे व‌िद्यार्थ्यांनी रमजान ईद न‌िम‌ित्त ‘सूर- ए -फत‌िया’ या प्रार्थनेचे सामूहिक पठण केले. या उपक्रमातून त्यांनी सामाज‌िक एकात्मतेचा संदेश द‌िला. व‌िशेष म्हणजे व‌िव‌िध धर्मांच्या सणांच्या वेळी हे सर्वधर्मीय व‌िद्यार्थी संबंध‌ित धर्माच्या प्रार्थनेचे पठण करतात.

आदित्य आर्ट ज्वेलरीच्या दुसऱ्या शोरुमचा शुभारंभ

0
0
सिटी सेंटर मॉल येथे सुरू झालेल्या आदित्य आर्ट ज्वेलरी शो रुमला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याच अनुषंगाने कॉलेजरोडवर दुसरी शाखा ३० जुलै रोजी सुरू होणार आहे. हे दालन कॉलेजगोईंग विद्यार्थिनी आणि गृहिणींसाठी उपयोगी असल्याचे संचालक आदित्य आडगावकर यांनी सांगितले.

पुरस्कार जाहीर

0
0
संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वर्गीय डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या नावाने त्यांच्या २६ व्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शहरातील अकरा डॉक्टरांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

देवळाली व्यापारी बँकेच्या नव्या शाखेचा शुभारंभ

0
0
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या देवळाली कॅम्प शाखेचे उद्घाटन उत्साहात झाले. बँकेच्या डेटा सेंटर आणि एटीएम सेवेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

प्लास्टिक अन् कचरा मुक्तीचा निर्णय

0
0
सटाणा शहर प्लास्टिक व कचरा मुक्त करण्यासाठी १५ ऑगस्टपासून काटेकोरपणे कार्यवाही करण्याचा पालिका प्रशासन व शहरातील महिला मंडळाच्या वतीने सामूहिक निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण होत्या.

इगतपुरी धरणावर दल लेक!

0
0
महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपूरी तालुक्यातील भावली धरणाचा नयनरम्य परिसर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कंबर कसली आहे.

‘मद‌िना’ला अतिक्रमणाचा वेढा

0
0
मुंबई नाका ते सारडा सर्कल दरम्यान येणाऱ्या मदिना चौक परिसराला अतिक्रमणाने विखळा बसला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक, डंपर, प्रवासी वाहने, बसेस, अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच उभी केली असल्याने येथून जाताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

बोगस कंपन्यांची राजधानी

0
0
पश्चिम बंगाल पाठोपाठ आता महाराष्ट्र बोगस चिटफंड कंपन्यांची राजधानी बनला आहे. गेल्या काही वर्षांत अशा ४१ कंपन्यांनी १० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे ५० हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

सिंथेटीक ट्रॅक डिसेंबर अखेर

0
0
नाशिकमधील अॅथलेटिक्सच्या खेळाडूंना सिंथेटीक ट्रॅक नसल्याने सरावासाठी मुंबई पुण्याला धाव घ्यावी लागत होती. ही गरज ओळखून विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यात येत असून, हा ट्रॅक डिंसेबरअखेर नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

थोडा है, थोडे की, जरूरत है

0
0
सरकारवाड्याच्या वास्तूचे नूतनीकरण सुरू झाले आहे. ब्रिटिशांनी येथे तयार केलेल्या छोटेखानी तुरुंगाची दुर्दशा झाली आहे. वाड्याचा दर्शनी भाग व आतील काही भागाची रंगरंगोटी तसेच सफाईवर पुरातत्त्व विभागाने खर्च केला आहे. उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता आहे.

‘हर हर महादेव’चा जयघोष

0
0
श्रावण महिन्याला सणांचा राजा असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने श्रावण पवित्र महिना मानला जात असून शिवाची पूजा केली जाते. या महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व वेगवेगळे आहे. यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी ना‌शिक शहरासह जिल्ह्यातील शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजली होती.

पावसासाठी मुस्लिम बांधवांचे साकडे

0
0
येवला शहर व तालुक्यात 'रमजान ईद' मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त येवला शहरातील प्रसिद्ध लक्कडकोट इदगाह मैदान व कोर्ट जवळील वलीबाबा इदगाह मैदान या दोन ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.

इगतपुरीत मुसळधार

0
0
इगतपुरी शहरासह तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या ३६ तासांत सुमारे ३४० मिलिमीटर पाऊस झाला असून एकाच दिवसात २५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

दारणा, भावली, भाम, वाकी नद्यांना पूर

0
0
इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात व नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images