Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील वाहतूक ठप्प

$
0
0
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणी गावाच्या पुढे हॉटेल किनारा व दाते लॉन्स येथे पावसाचे पाणी साचल्याने तब्बल तीन तास रस्ता बंद होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी नाली खोदून पाणी बाहेर काढले. पाण्यातून वाहने काढताना चालकांची चांगलीच कसरत पहायला मिळाली.

पावसासाठी मुस्लिम बांधवांचे साकडे

$
0
0
येवला शहर व तालुक्यात 'रमजान ईद' मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त येवला शहरातील प्रसिद्ध लक्कडकोट इदगाह मैदान व कोर्ट जवळील वलीबाबा इदगाह मैदान या दोन ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.

सटाण्यात ईद उत्साहात

$
0
0
सटाणा शहरासह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात व शांततेत साजरी झाली. येथील ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता मुस्लिम समाज बांधवानी मौलाना हाजी नुरी यांच्या उपस्थितीत नमाज पठण केले.

राष्ट्रवादीचे ‌विलास बच्छाव भाजपच्या वाटेवर

$
0
0
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. विलास बच्छाव हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विधानसभेसाठी कामाला लागा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असून, त्यादृष्टीने कामाला लागावे, अशा सूचना भाजपचे खासदार अशोक नेते यांनी केले. भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत ते बोलत होते.

मरगळ झटकून कामाला लागा

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले.

मिळकतधारकांना एसएमएसची प्रतीक्षा

$
0
0
गेल्या काही वर्षात घरपट्टी तसेच नळपट्टी बिलांच्या वाटपात घोळ असल्याच्या तक्रारी येत असल्याने महापालिका प्रशासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून एसएमएस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

‘ज्ञानेश्वरीतून मूल्यांची शिकवण’

$
0
0
चारशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीतून मांडलेले विचार आत्मसात केले तर खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी लागते. ज्ञानेश्वरीतील विचारांचा दैनंदिन जीवन जगताना उपयोग होतो.

‘उत्सव समकालीन साहित्याचा’

$
0
0
समकालीन प्रकाशन आणि एचडीएफसी होमलोन्सच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान ‘उत्सव समकालीन साहित्याचा’ हा तीन दिवसांचा साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

$
0
0
नाशिकरोड उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेला खड्डा चुकविताना एक महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. तीचा पती गंभीर जखमी झाला आहे.

ब्रिटीशकालीन बंगल्यास आग

$
0
0
देवळाली कॅम्प येथील उद्योजक आणि शिवानंदा कंपनीचे मालक एम. के. बिरमानी उर्फ महाराज यांच्या लॅमरोडवरील बंगल्याला मंगळवारी सकाळी शार्टसर्किटमुळे आग लागली. जिवीतहानी झाली नसली तर कंपनीच्या इलेक्ट्रानिक मालाचे व बंगल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

ईद मुबारक हो!

$
0
0
विश्वात शांती नांदो, एकमेकांमध्ये बंधुभाव जागृत होवो अशी प्रार्थना करीत शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा पावासामुळे इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण न झाल्याने परिसरातील मशिदींमध्येच सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

संजीवकुमार रेसमधून बाहेर?

$
0
0
महापालिकेत कायमस्वरूपी आयुक्तांच्या नियुक्तीबाबत येत्या १ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. अतिरिक्त आयुक्तपदासाठी प्रयत्न करणाऱ्या दिपक कासार यांना आयएएस लॉबीने धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे.

वाइन कॅपिटलची टुरिझमकडे झेप

$
0
0
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकने केवळ द्राक्षनिर्मितीच्या जोरावर उद्योगाची वेगळी वाट चोखाळत वाइन उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली. येथे मोठ्या प्रमाणावर होणारे वाइनचे उत्पादन, वाइनची दर्जात्मक गुणवत्ता आणि सातासमुद्रापार मिळविलेली पसंती यांमुळे नाशिकला ‘वाइन कॅपिटल’ हा सन्मान मिळाला.

वाइन उद्योगापुढील आव्हाने

$
0
0
मुंबई (३९ टक्के), दिल्ली (२३ टक्के), बंगळुरू (९ टक्के) आणि गोवा (९ टक्के) या देशातील चार प्रमुख शहरांमध्ये सुमारे ८० टक्के वाइन रिचवली जाते. उष्णकटिबंध हवामान असल्याने साठवणुकीची कमतरता आणि वाहतुकीच्या सुविधेचा अभाव वाइन मार्केटिंगमधील मोठा अडसर ठरत आहे.

वाइनप्रेमींसाठी खास संशोधन

$
0
0
वाइनप्रेमींना महत्तम आनंद मिळावा आणि वाइनरी टुरिझम वाढीलाही मदत व्हावी यासाठी वाइनचे नवनवीन प्रकार विकसित करण्यावर वाइनरी उद्योगांनी भर दिला आहे. काहीशी गोडसर असलेली दिया रेड वाइन आणि ओक टच असणारी रिजर्व शेनीन ब्लॉक या व्हाईट वाइनचा पर्याय वाइनप्रेमी पर्यटकांसाठी खुला होणार आहे.

आमदार ओवेसीची नाशकात चाचपणी

$
0
0
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुसलमीन पक्षाचे (एमआयएम) आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गेल्या शुक्रवारी पहाटे जुन्या नाशिकला भेट दिली.

पाण्याचे समान आरक्षण टाका

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांवर बिगर सिंचनाचे आरक्षण सम प्रमाणात असायला हवे. त्यामुळे सर्वांना सारखे पाणी मिळेल, अशी मागणी करणारे प्रतिज्ञापत्र कोपरगावचे आमदार अशोक काळे यांनी महाराष्ट्र जलप्राधिकरणाकडे दाखल केले आहे. गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात प्राधिकरणापुढे सुनावणी सुरू आहे.

नाशकात धुँवाधार...

$
0
0
श्रावण महिन्याला प्रारंभ होताच पावसानेही जिल्ह्याच्या सर्व भागात धुंवाधार हजेरी कायम ठेवली असून, बुधवारी दिवसभरही हा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे धरणांची पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढत आहे. मंगळवारी दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पैठणीची दुनिया होणार खुली

$
0
0
विविध प्रकारच्या पैठणी एकाच दालनात असे वैशिष्ट असणारे येवला ग्रामीण पर्यटन केंद्र लवकरच पर्यटकांच्या सेवेत रूजू होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचा शुभारंभ होणार असून, पैठणी क्लस्टरचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images