Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नेतृत्त्व करणाऱ्या महिलांचा सत्कार

$
0
0
जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत. आयटक व भारतीय महिला फेडरेशनतर्फे विविध क्षेत्रांत महिलांचे नेतृत्त्व करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

४०० गावे, ११९९ पाड्यांना टँकरचाच आधार

$
0
0
नाशिक विभागातील नाशिक, नगर, नंदूरबार, धुळे, जळगाव या पाच जिल्ह्यांत दुष्काळाची भयानक स्थिती असून येथील ४०० गावे आणि ११९९ पाड्यांना केवळ टँकरचाच आधार उरला असून या भागात पाणी पुरवण्यासाठी तब्बल ४४७ टँकर राबत आहेत.

नाशिकला १ एप्रिलपासून ‘मतदार मदत केंद्र’

$
0
0
मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी नाशिकसह प्रत्येक तालुक्यात १ एप्रिलपासून ‘मतदार मदत केंद्र’ सुरू केले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गितांजली बावीस्कर यांनी दिली. या केंद्रांच्या माध्यमातून नवमतदार नोंदणीसह मतदारांना विविध अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

दोन महिन्यांनंतर ‘झूम’ होणार

$
0
0
औद्योगिक समस्यांसंदर्भात होणारी जिल्हा उद्योग मित्र बैठक (झूम) तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता १९ मार्चला होणार आहे. दर महिन्याला ही बैठक होण्याचे घोषित झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत ही बैठक घेण्यात जिल्हा उद्योग केंद्राला अपयश आले.

‘नाशिक फर्स्ट’ देणार एसटीला साथ

$
0
0
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिक सक्षम व्हावी व त्यातून शहर विकास साधला जावा, या दुहेरी हेतूने ‘नाशिक फर्स्ट’ संस्थेने एसटीला मदतीचा हात देऊ केला आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून, एसटीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जाणार आहे.

संदीप फाऊंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

$
0
0
महिरावणी परिसरातील संदीप फाऊंडेशनमार्फत ‘मोबिलिटी फॉर लाइफ, टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन अँड प्रोब्लेम बेस लर्निंग’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पाणी उपसाप्रकरणी अडीचशे जणांविरुद्ध गुन्हे

$
0
0
पालखेड धरणातून सोडलेल्या पाण्याचा सिंचनासाठी उपसा करणाऱ्या २४१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन दिवसांत पाणी उचलण्यासाठी वापरले जाणारे ४००हून अधिक डोंगळे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सोमवारी दिली.

प्रशासनाचा असहकार, पालकही उदासीन

$
0
0
‘वेळेवर सुविधा नाहीत, कामासाठी सहकार्य नाही, अशा अवस्थेत महापालिकेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण देणार तरी कसे’ अशी खंत महापालिका शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली. हुतात्मा स्मारकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मनपा शिक्षण कंपनीकरणविरोधी अभियाना’च्या बैठकीमध्ये महापालिका शाळांच्या दर्जाबद्दल बोलताना शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या.

बना फुलराणी

$
0
0
डान्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि इतर धम्माल म्हणजे केवळ कॉलेज लाइफ हेच समीकरण आपल्याला दिसून येते. विवाहित महिलांसाठी तरी कॉलेजनंतर अशा स्पर्धा किंवा असे व्यासपीठ म्हणजे विरळा. म्हणूनच ‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत ही सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे.

भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीचा घाट

$
0
0
राज्यातील भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीचा घाट राज्य सरकारने घातला असल्याची माहिती सहकार क्षेत्राचे अभ्यासक पां. भा. करंजकर यांनी दिली. यामुळे सहकार क्षेत्राचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचेही करंजकर यांनी म्हटले आहे.

‘प्लंबरने अद्ययावत ज्ञान घेणे गरजेचे’

$
0
0
सर्वच क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे. अशीच क्रांती प्लंबिंगच्या क्षेत्रातही झाली आहे. जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर प्रत्येक प्लंबरने अद्यावत ज्ञान घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंजिनीअर प्रशांत पाटील यांनी केले.

चार महिन्यात निवडणूक घ्या

$
0
0
ओझर टाऊनशीप येथील हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमीटेड मधील शेड्युल्ड कास्टस, शेड्युल्ड ड्राइब्स एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स वेल्फेअस असोसिएशनच्या नाशिक कार्यकारी मंडळाची निवडणूक येत्या चार महिन्यात घ्यावी, असे आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत.

नाशिकरोड परिसरात डासांचे थैमान

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोडच्या अनेक भागांमध्ये डासांनी थैमान घातल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाने धूर तसेच औषध फवारणी करून डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महापौरांचा पाठिंबा काढणार नाही!

$
0
0
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हल्लाबोल केल्यानंतर नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी ‘पेटून उठल्याचे’ उसने अवसान आणले खरे; परंतु ‘आगामी सत्ताकारणातील सहभागावर पक्षाची भूमिका काय राहील?’ या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ‘नो कमेंट’ असे उत्तर देऊन उपमहापौर सतीश कुलकर्णी आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी आपले ‘मनसे’प्रेम दाखवून दिले.

तपोवनाची वाट अंधारलेली

$
0
0
तपोवनातील सुविधांबद्दल आधीच ओरड कायम असताना, आता त्यात बंद पथदिपांची भर पडली आहे. स्वामी नारायण पूलावरील पथदिपांचा लपंडाव वर्षभरापासून कायम असल्याने, ही समस्या अपघातांचे कारण आणि चोरट्यांसाठी संधी बनली आहे.

पाण्याची टाकी कोसळून ४ ठार

$
0
0
राज्यात दुष्काळाचे भयावह चित्र असतानाच पाण्याची टाकी कोसळून चार जण जागीच ठार होण्याची विचित्र दुर्घटना सोमवारी पहाटे नंदूरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रंजनपूर गावात सोमवारी पहाटे घडली.

रोजगाराची ऊर्जा

$
0
0
जानेवारीचे वेध लागले की साक्री तालुक्यातील लोक रोजंदारीच्या शोधात गुजरातच्या दिशेने कूच करतात. गवंडी काम, वीटभट्ट्यांची कामे करत पावसाची वाट पाहात मिळेल तो रोजगार घेतात. शिवाजीनगर येथे सुरू झालेल्या १५० मेगावॉटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामांमुळे परिसरातील गावकऱ्यांच्या हातांना चांगले काम मिळाले

'सीईटी'ची प्रक्रिया १८ मार्चपासून

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत घेतल्या जाणा-या 'एमटी - सीईटी' या इंजिनिअरींग आणि फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची प्रक्रिया १८ मार्चपासून सुरू होणार आहे. ११ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून प्रवेश परीक्षा १६ मे ला होणार आहे.

तमासगीर गार!

$
0
0
मराठी दिनाचे औचित्य साधून शहरात विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले होते. सार्वजनिक वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या कार्यक्षम पुरस्काराचेही वितरणही या सप्ताहात करण्यात आले. नेहमीप्रमाणे घडायचा तोच प्रकार घडला.

नाभिक समाजातर्फे जनगणना सुरू

$
0
0
सम्राट चंद्रगुप्त मौर्य मंडळातर्फे नाभिक समाजाच्या जनगणनेचा उपक्रम शनिवारी सुरू झाला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>