Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

घरमालकांविरोधात पोलिसांची मोहीम

$
0
0
भाडेकरुंची माहिती पोलिस स्टेशनमध्ये नोंदविणे सक्तीचे असतानाही त्यास न जुमानणाऱ्या घरमालकांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे.

‘अलाहाबाद के बारे में बवाल मत करो!’

$
0
0
अलाहाबाद येथे गेल्यावर्षी झालेल्या सिंहस्थात अनेक अनियमितता झाल्याचा कॅगने ठपका ठेवल्याप्रकरणी बवाल मत करो अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी दिली आहे. सध्या ते नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

कसारा घाटातील प्रश्न ‘जैसे थे’च

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात रस्त्याला मोठा तडा पडला असली तरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अद्याप काम सुरू होऊ शकलेले नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने ते करणे शक्य नसल्यामुळे पाऊस थांबल्यानंतरच ते केले जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काँग्रेसमधील असंतुष्ट शिवसेनेच्या वाटेवर

$
0
0
काँग्रेसमध्ये निष्ठावान म्हणून ओळखला जाणारा एक गट लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसमध्येच त्यासाठ‌ी खलबते सुरू झाली असून आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मोठा असंतुष्ट गट लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करेल, असे संकेत मिळू लागले आहेत.

सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

$
0
0
महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते सुधाकर बडगुजर यांना पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. तुमच्यावर तडीपारीची कारवाई का करू नये, अशी विचारणा त्यांना या नोटीशीद्वारे करण्यात आली आहे.

प्रतिमा उंचावणारा उपक्रम

$
0
0
कोणत्याही व‌िकास प्रक्रियेसाठी कुणीतरी नेतृत्व स्वीकारावे लागते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने ‘नाश‌िक रायझ‌िंग’ या संकल्पनेने शहराच्या व‌िकासासाठी घेतलेले हे नेतृत्व प्रेरकच आहे.

साधुग्रामचा प्रश्न अधांतरीच

$
0
0
साधुग्रामच्या जागेवरील अतिक्रमण आणि जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध अशा स्थितीतच शनिवारचा साधुग्राम पाहणी दौरा पार पडल्याने साधुग्रामचा प्रश्न अधांतरीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

शाही मार्गाचा निर्णय लवकरच

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात जुन्या शाही मार्गाचा वापर करायचा की नव्या शाही मार्गाचा यासंबंधीचा निर्णय आखाडा प्रमुखांशी चर्चा करुन लवकरच घेऊ, अशी माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी दिली. शनिवारी त्यांनी जुन्या आणि नव्या शाही मार्गाची पाहणी केली.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

$
0
0
नाशिक शहर परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. स्वामी औरंगाबाद येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून तर डॉ. महावरकर रायगड जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून काम पहाणार आहेत.

मनमाड-येवला मार्गावर अपघात

$
0
0
मनमाड-येवला मार्गावरुन शिर्डीच्या दिशेने जात असलेल्या एका व्हॅनची ट्रकशी टक्कर झाली. या अपघातात पाचजण जागीच ठार झाले तर एका व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला; तीनजण जखमी झाले.

मुख्यमंत्री आज नाशकात

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतानाच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी शहरात येत आहेत. कालिदास कला मंदिरात होणाऱ्या काँग्रेस मेळाव्याला उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ग्रॅच्युईटी प्रकरणात श‌िक्षण सच‌िवांची माफी

$
0
0
न‌िवृत्त श‌िक्षकांच्या ग्रॅच्युईटी प्रकरणात सुप्र‌ीम कोर्टाचे आदेश न मानल्याबद्दल कोर्टच्या अवमान प्रकरणी उच्च श‌िक्षण सच‌िव संजीव कुमार यांनी कोर्टाची ब‌िनशर्त माफी माग‌ितली. तर याच‌िकाकर्त्यांचे ३२ कोटी रुपये चार आठवड्यांमध्ये औरंगाबाद खंडपीठात जमा करण्यात यावेत, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने शासनाला द‌िला आहे.

ना‌शिकला हवं पाठबळ ‘आयआयएम’च

$
0
0
व‌िमानतळाच्या न‌िम‌ित्ताने नाश‌िक शहर आता थेट आंतरराष्ट्रीय नकाशावर जात आहे. या टप्प्यावर जगाच्या नकाशावरील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून लौकीक म‌िळव‌िण्यासाठी नाश‌िकला त‌ितक्याच दमदार संस्थांची गरज न‌िर्माण झाली आहे.

स्थायीच्या सभापती निवडीची उत्सुकता

$
0
0
मालेगाव मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाची मुदत ३ ऑगस्ट रोजी संपली असून नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम मनपा प्रशासनाने जाहीर केला आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी स्थायीच्या सभापती पदाची निवड होणार आहे.

पुनर्वसनाअभावी प्रकल्पग्रस्त अडचणीत

$
0
0
इगतपुरी तालुक्यात नव्यानेच बांधलेल्या घोटी-वैतरणा मार्गावरील वाकीखापरी धरणात यावर्षी प्रथमच प्रायोगिक तत्वावर पाणी साठवल्याने वैतरणामार्गच पाण्यात गेला. तत्यात पर्यायी रस्ता नव्याने बांधण्यात आला असला तरी शेवटच्या टप्यात घाईघाईने हा रस्ता तयार केल्याने तो महिनाभरातच खचला आहे.

शहर वाहतुकीचा एसटी अन् प्रवाशांना फटका

$
0
0
शहरातील ट्रॅफीकची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. रस्‍त्यांवर पायी चालणे सुध्दा मुश्किल झाले आहे. रस्त्यावर उभी राहणारी वाहने, नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक याचा ट्रॅफीकवर मोठा परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका सिटी बस व सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

संसरीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार

$
0
0
संसरीच्या पाणीयोजनेचा समावेश केंद्र सरकारच्या २०१४-१५ च्या राष्ट्रीय पेयजल कृती आराखड्यात करण्यात आला आहे. राज्य शासनानेही ५५ लाखाचा निधी दिला आहे. त्यामुळे या गावचा पाणीप्रश्नी कायमस्वरुपी मिटणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

दारूसाठी वाटेल ते केले!

$
0
0
‘नशायात्रा’ लिहतांना स्वतःला आठवून लिहित होतो. दारूच्या प्रचंड आहारी गेलो होतो. मुक्तांगणमधून परतल्यावरही दारूचा अट्टहास सोडला नाही. माझ्या या वागण्यामुळे कुटुंबीयही वैतागले होते. दारूसाठी घरच्यांशी भांडण, चोऱ्या करायला लागलो. कालांतराने असे काही अनुभव आयुष्यात आले जे मनाला चटका लावून गेले.

‘लोकसभेची पुनरावृत्ती करणार’

$
0
0
लोकसभा निवडणुकीत जशी शिवसेनेने मुसंडी मारूण विरोधकांना अस्मान दाखविले त्याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत करू, असा संकल्प प्रत्येक शिवसैनिकाने करून कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी येवल्यातील शिवसैनिकांना केले.

काझी गढी रहिवाशांचे उपोषण सुरू

$
0
0
काझी गढी येथील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असताना लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत जागा सोडणार नसल्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीही तयारी दर्शविली नसल्याने रविवारपासून नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images