Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक

$
0
0
तब्बल दोन अडीच वर्ष विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पती‌सह चौघांना अटक केली आहे. अनिता भूषण सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.

संघाणी यांची चौकशी करा

$
0
0
कडवा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संघाणी यांचीप्रशासकीय चौकशी करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी येवला तालुका जलहक्क संघर्ष समितीचे संजय पगारे, भाऊ लहरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

दर ४ दिवसांनी एका महिलेवर अत्याचार

$
0
0
नाशिक शहर आणि जिल्ह्यात दर चार दिवसांनी एका महिलेवर अत्याचार होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. पीडित महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य या योजनेच्या माध्यमातून ही बाब उजेडात आली आहे.

‘व‌िद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करा’

$
0
0
प्राथम‌िक आण‌ि माध्यम‌िक स्तरावर श‌िक्षण घेणाऱ्या व‌िद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे अवास्तव ओझे होत आहे. यामुळे व‌िद्यार्थ्यांना मानस‌िक तणावासह व‌िव‌िध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

सर्जनशील व्यक्तिमत्त्व हरपले

$
0
0
स्मिता तळवलकर म्हणजे एक हसरे व्यक्तिमत्त्व. धडाडीची अभिनेत्री व निर्माती असेच त्यांचे वर्णन व्हावे. मराठी मालिकांमध्ये कादंबरीचे अस्तित्त्व गडद करण्याला त्यांनी मोलाचा हातभार लावला. अशा गुणी अभिनेत्रीचे अचानक एग्झीट घेणे ही चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक बाब आहे.

तीन आठवड्यात अंमलबजावणी करा

$
0
0
एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेच्या विटांचा बांधकामात वापर करावा यासह ग्रीन ट्रिब्युनलच्या इतर आदेशांची अंमलबजावणी केली नाही, म्हणून विविध सरकारी यंत्रणांच्या विरोधात ग्रीन ट्रिब्युनलमध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

रेड कॉर्नर नोटीसची केबीसीप्रकरणी प्रतीक्षा

$
0
0
केबीसी प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, अशी विनंती पोलिसांनी केली असली तरी त्यासाठी पोलिसांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशी नोटीस बजावण्यासाठी करावयाच्या प्रक्रियेची तपशीलवार माहिती न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेकडे मागवली आहे.

लासलगावजवळ अपघातात पिकअपमधील २५ जखमी

$
0
0
लासलगाव-विंचूर रस्त्यावर बुधवारी सकाळी पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात २५ जण जखमी झाले. यातील पाच जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गाडीतील सर्व प्रवासी नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील रहिवासी आहेत.

लोकशासन आंदोलनाचा मोर्चा

$
0
0
अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे पात्र कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला पाच किलो धान्य अत्यंत अल्पदरात मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. बागलाण तालुक्यातील ६० गावे अनुसूचित क्षेत्रामध्ये असून त्या गावातील भूमिहीनांना त्यांच्या नावावर जमिनीचा सातबारा करावा, अशी मागणी लोकशासन आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.

पावसाळ्यातही पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांचा घेराव

$
0
0
येथील प्रभाग ३४ मधील गोरकेवाडी परिसरातील शास्त्रीनगर, सम्राटनगर येथे पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन दिले.

... अन्यथा ‘एनबीटी’च्या न‌िवडणुकीवर बह‌िष्कार

$
0
0
प्राचार्यांच्या मनमानीला रोख लावावी अन्यथा एनबीटी लॉ कॉलेजमध्ये शन‌िवारी होऊ घातलेल्या जीएसपदाच्या न‌िवडणुकीवर बह‌िष्कार टाकण्यात येईल, असा इशारा व‌िद्यार्थी कृती सम‌ितीच्या वतीने देण्यात आला आहे.

बालवाड्यांच्या मान्यतेसाठी धरणे

$
0
0
राज्यातील खासगी बालवाड्यांना परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथम‌िक श‌िक्षक व श‌िक्षकेतर महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील खासगी प्राथम‌िक शाळांना जोडून असणाऱ्या खासगी बालवाड्यांचे प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी ज‌िल्हाध‌िकाऱ्यांसमोर मांडले.

गंगापूरच्यागंगापूरच्या भूखंडाचा आज फैसला

$
0
0
महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रासाठी आवश्यक असलेला गंगापूर येथील भूखंड ताब्यात घेण्याची प्रकिया पूर्ण झाली आहे. या भूखंडासाठी असलेला १४ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याबाबत येत्या गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

ढिकले पिता-पुत्र मैदानातून बाहेर

$
0
0
निवडणूक ही प्रचंड खार्चिक बाब झाली आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणुक आपण किंवा आपला पुत्र लढविणार नाही, असे मनसेचे आमदार उत्तमराव ढिकले यांनी `महाराष्ट्र टाइम्स`शी बोलताना स्पष्ट केले.

विद्यार्थिनीच्या रॅगिंगनंतर कॉलेजची तोडफोड

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीमधील आय.डी.आय आर्किटेक्ट कॉलेजमध्ये मंगळवारी एका विद्यार्थिनीच्या रॅगिंगचा प्रकार घडला. त्यानंतर बुधवारी अज्ञात टोळक्याने कॉलेजमध्ये घुसून तोडफाड केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

कंटेनरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
बिटको चौकात बुधवारी सकाळी कंटेनरने धडक दिल्यामुळे आठवीतील विद्यार्थी मृत्यूमुखी पडला. अपघातनंतर चालक कंटेनर सोडून पसार झाला. नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, ओम कचेश्वर पवार (१४, रा. गायकवाड मळा, नाशिकरोड) हा विद्यार्थी के. जी. मेहता शाळेत आठवीत शिकतो.

काही भागात उद्या पाणी नाही

$
0
0
नाशिक महापालिकेच्या नवीन नाशिक विभागांतर्गत शिवाजी जलशुध्दीकरण केंद्र ते अंबड जलकुंभपर्यंत थेट पाइपलाइन कामांतर्गत शिवाजी जलशुध्दीकरण केंद्र येथे १ हजार मिलीमिटर व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी केले जाणार आहे. त्यामुळे काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहिल.

अर्धवट पूल : वाहनधारकांचे हाल

$
0
0
कनाशी ते सापुतारा रस्त्यावरील तीन पुलांचे काम सुरू आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एक वर्षापासून काम सुरू असून ते अर्धवट असल्याने गुजरातहून सप्तशृंर्गी देवी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकाची दिशाभूल होत आहे.

राजीव गांधी भवन-CBS रस्ता बंद

$
0
0
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात झालेल्या प्रभाग बैठकीत नागरी समस्यांवरून चांगलीच गाजली. सतंतधार पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली.

निमाची बिनविरोध निवडणूक वादात

$
0
0
गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडलेली नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (निमा) निवडणूक वादात सापडण्याची चिन्हे आहेत. निमाचे सदस्य असलेल्या एका उद्योजकाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या साऱ्या बिनविरोध निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images