Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डेड हाऊसमध्येच संपायचं नाही!

$
0
0
घरातून बाहेर पडलेला माणूस घरी परतलाच नाही तर त्या कुटुंबाच्या वेदना कधीही न संपणाऱ्या असतात. अशाच वेदना अंत्यविधी करायला वारसदार न मिळालेल्या मृतदेहाच्याही असतील, असा विचार कधीच का कोणी करत नाही.

नवीन पापुयोसाठी आमदार गावितांच्या सूचना

$
0
0
घोटी शहराची वाढती व्याप्ती व लोकसंख्या तसेच, पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता घोटीकरांना दररोज स्वच्छ पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी वाकी धरणातून फिल्टरेशन प्लॉन्टसह नवीन पाणीपुरवठा योजना तत्काळ प्रस्तावित करण्याची सूचना आमदार निर्मला गावित यांनी महाराष्ट्र जीवन प्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

सटाण्यात प्लास्टिक बंदीवर जनजागृती

$
0
0
सटाणा शहरातील प्लास्टिक पिशवी व कचरामुक्त अभियानाचा प्रचार व प्रसारासाठी शहरात महिला मंडळ, सामाजिक संस्था, सटाणा नगरपरिषदेसह विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रचार व प्रसार जनजागृती रॅली काढली. प्लास्टिक वापर बंदीच्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली.

जिल्ह्यातील साक्षरतेचा उंचावला आलेख

$
0
0
राज्यासह जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या तीन वर्षांत सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून साक्षरतेचे आलेख उंचावला असून २९ लाख ७८ हजारापर्यंत पोहचला आहे.

पोटभर अन्न अन् स्वच्छ पाणीही मिळेना

$
0
0
सटाणा शहरातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना अत्यंत अपमानास्पद व हिनदर्जाची वागणूक देण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांनी यांनी थेट तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडून वरिष्ठाच्या तक्रारींचा पाढाच वाचला.

महापालिकेच्या पथकाची गाडी अडविण्याचा प्रयत्न

$
0
0
महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिका-यांचीच गाडी अडविण्याचा प्रयत्न सातपूर भागात झाला. मात्र, अतिक्रमण विभागाचे पोलिस व सातपूर पोलिस यांनी मध्यस्ती करून वाद मिटविल्याने अनर्थ टळला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

नाशिकमध्ये साकारणार मेडिकल इन्स्ट्रूमेंट इंडस्ट्री

$
0
0
नाशिकमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळू लागल्या आहेत. या हेल्थ केअर क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.

बजरंगवाडी शाळेला कुलूप

$
0
0
शिक्षक द्या, या मागणीसाठी तालुक्यातील बजरंगवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद सोनवणे यांनी कुलूप ठोकले. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला.

कळवण तालुक्यात ७८ % पेरणी

$
0
0
कळवण तालुक्यात जुलैच्या उत्तरार्धात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे. आत्तापर्यंत ७८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

देवनदी झाली प्रवाही

$
0
0
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्यात असलेले उंबरदरी व कोनांबे धरण पूर्ण पणे भरले आहे. म्हाळुंगी नदीला पाणी वाहत असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोनांबे धरणही भरले असल्याने देवनदी प्रवाहित झाली आहे.

अतिक्रमण निर्मूलन : फक्त फार्स

$
0
0
महापालिकेतर्फे नाशिकरोड येथे शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. संबंधितांनी सहकार्य केल्याने कोणताही अडथळा अथवा तणाव झाला नाही. नेत्यांचे आशीर्वाद असलेल्या तसेच धनदांडग्यांच्या अतिक्रमणांना हात न लावल्याने आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.

पारख यांनी घातला सोन्याचा शर्ट

$
0
0
सोन्याच्या शर्टमुळे राज्यभर टीकेचे धनी ठरूनही येवला पालिकेचे उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी आपल्या ४५ व्या वाढदिवशी सोन्याचा शर्ट घालून आपली हौस भागवली. सोन्याचा शर्ट घालणार नसाल तर, वाढदिवसाला हजर राहील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बजावले होते.

एटीएम फोडून २४ लाखाची चोरी

$
0
0
सिन्नर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन तोडून चोवीस लाख रुपयाची चोरी झाल्याची घटना घडली.

काळाचे तुकडे जुळवताना…

$
0
0
प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि महाराष्ट्राच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. त्यांनी आपलं आजवरचं आयुष्य भारतीय संस्कृतीच्या शोधात घालवलं. प्राचीन संस्कृती ही भारताची खूप मोठी ताकद आहे.

‘धनगर आरक्षण आंदोलनाला राज्य सरकारचीच फूस’

$
0
0
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सध्या राज्यभरात जे काही आंदोलन सुरू आहे त्यास राज्य सरकारचीच फूस असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शनिवारी केला. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबाबत आयोजित रावसाहेब थोरात सभागृहातील आभार मेळाव्यात ते बोलत होते.

डिसेंबरपर्यंत बसस्थानकांवर विश्रांतीगृह उभारणार

$
0
0
चालक, वाहक आणि मेकॅनिक हे एसटीची शक्त‌ीस्थळे आहेत. कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला तरच ते चांगली सेवा देऊ शकतील. २१ डिसेंबर २०१४ पर्यंत आवश्यक त्या प्रत्येक बसस्थानकावर विश्रांतीगृह, स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी शनिवारी व्यक्त केला.

धडाकेबाज पर्यावरण परवानग्या विनाशच

$
0
0
ऑनलाइन आणि धडाकेबाज पर्यावरण परवानग्या देण्याचा मोदी सरकारचा अजेंडा हा देशाला विनाशाकडे नेणारा असल्याची प्रखर टीका जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी ‘मटा’शी बोलताना केली आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना सिंह यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पत्नीचा खून : पतीला अटक

$
0
0
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. रुपेश तुळशीराम गायकवाड (४२, रा. मोरे मळा, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

प्रत्येक मिनिटाला तीन बसेस

$
0
0
तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी लाखो भाविक जातात. भाविकांना त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून तब्बल ४६० बसेस नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणार आहेत. महामंडळाचे एक हजार फेऱ्यांचे नियोजन असून प्रत्येक मिनिटाला तीन बसेस सोडण्यात येणार आहेत.

चौफुली बनली खड्डेमय

$
0
0
शहरातील खड्ड्यांबाबत सध्या जोरात चर्चा सुरू आहे. खड्डे बुजविण्याचे काम उशिरा का होईना हाती घेण्यात आले. मात्र, याला पाथर्डीफाटा चौफुली आणि गणेश चौकातील महेश भुवनजवळील रस्ता अपवाद ठरला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images