Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आनंदवली रस्त्याचे दु:ख कोण जाणणार?

$
0
0
आनंदवलीतील मुख्य रस्ता अतिशय धोकेदायक बनला असून भरधाव वेगाने जाणारी वाहने यामुळे विद्यार्थीवर्गाला जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. या रस्त्याला पर्याय म्हणून भुयारी मार्गाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याकडे महापालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे.

सुटता सुटेना तिढा प्राध्यापकांच्या बहिष्काराचा

$
0
0
पाचव्या वेतन आयोगामधील त्रिस्तरीय वेतनश्रेणी एक जानेवारी १९९६ पासून लागू करण्यात यावी, कायम विना अनुदानित तत्व रद्द करावे या प्रमुख मागण्यांसाठी ज्युनिअरच्या प्राध्याकांनी आंदोलन तीव्र केले आहे.

भद्रकालीत सापडली देवीची मूर्ती

$
0
0
भद्रकाली टॅक्सीस्टॅँड परिसरात भुमीगत गटार योजनेचे काम सुरु असतांना तीस फुट खोल खड्ड्यात देवीची काळ्या पाषाणातली मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती तरुण एक्य मंडळाच्या मंदिरात ठेवण्यात आली असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ही मूर्ती पाचशे वर्षांपूर्वीची असल्याचा दावा भाविकांनी केला आहे.

चायनीज फूडचे फास्ट अतिक्रमण

$
0
0
शहर परिसरात चानजीच्या गाड्यांचा सर्रास गोरखधंदा सुरु असून यातीन अनेक गाड्या बेकायदा असल्याची बाब निदर्शनास आली आहे. बंदी असलेल्या अनेक घातक केमिकलचा वापर या पदार्थांमध्ये केला जाण्याबरोबरच स्वच्छतेच्या नियमांनाही सर्रास तिलांजली दिली जात आहे.

वनविभागाची संवेदनशीलताच गायब

$
0
0
अभयारण्यातील जौविक विविधतेच्या संरक्षणासाठी इको सेन्सिटिव्ह झोन (इसीझेड) तयार करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना उत्तर महाराष्ट्रातील केवळ पाल अभयारण्याचा प्रस्ताव वनविभागाने केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

वाहकाला दमदाटी

$
0
0
एसटी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी थेट वाहकालाच दमदाटी व मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री ठक्कर बाजार बसस्टॉपवर घडली.

संशयितांना तीन दिवसांची कोठडी

$
0
0
तरुणाचा खून केल्याच्या संशयावरून भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयितांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती.

सायलीला भेटला स्वप्नांच्या पलिकडचा चिन्मय

$
0
0
तिने 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतून त्याला पाहिलं होतं. पण 'श्यामचे वडिल' या चित्रपटातील त्याची भूमिका तिला अधिकच भावली. तेव्हापासून त्याला भेटण्यासाठी ती खूप उत्सुक होती. अखेर 'महाराष्ट्र टाइम्स'ने तिला ही संधी मिळवून दिली.

रामसृष्टी उद्यानात रंगतो क्रिकेटचा डाव

$
0
0
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तपोवनाचे सौंदर्य वाढविण्यासाठी महापालिकेने रामसृष्टी नावाचे सुंदर उद्यान उभारले आहे. मात्र, या उद्यानाचे प्रवेशद्वार दिवसभर उघडेच राहत असल्यामुळे परिसरातील युवक क्रिकेट खेळण्यासाठी या उद्यानाचा उपयोग करीत आहेत.

N. N. असोसिएटस्चा निवासी प्रकल्प लवकरच

$
0
0
एन. एन. असोसिएट्स प्रमोटर्स, डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्सच्या वतीने जागतिक दर्जाचे आठ निवासी प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांचा शुभारंभ तपोवनात सुरू असलेल्या सत्संग सोहळ्यात करण्यात आला.

तापी विकास महामंडळाचा ४४१ कोटींचा प्रस्ताव

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील टंचाईसदृष्य परिस्थितीवर मात करण्यासाठी तापी विकास महामंडळाने ४४१ .७५ कोटींचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवला आहे. यात जिल्ह्यासाठी ३४१ .३४ कोटींच्या मागणीचा समावेश आहे.

'रासबिहारी'प्रकरणी आंदोलनाचा इशारा

$
0
0
'फी न भरल्याच्या कारणावरून पालक, विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,' असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमार्फत रासबिहारी शाळेला देण्यात आला. मंगळवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा केली.

महापालिकेकडून हायकोर्टाची दिशाभूल

$
0
0
शहर परिसरातील सांडपाणी गोदावरी नदीत सर्रास मिसळत असतानाही नाशिक महापालिकेने मुंबई हायकोर्टाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. गोदावरी नदी स्वच्छ असणारे फोटो प्रतिज्ञापत्रात देऊन महापालिकेने आणखी एक दुःसाहस केल्याचे दिसून येत आहे.

ईएसआयतर्फे ओळखपत्र मोहीम

$
0
0
उद्योजक व कामगारांच्या मागणीनुसार राज्य कामगार विमा योजना महामंडळातर्फे (ईएसआय) सातपूर आणि अंबड येथील दवाखान्यात स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आल्याची माहिती सहसंचालक आर. के. चौधरी यांनी निमा शिष्टमंडळाला दिली.

मनमाडकरांचा पाणीप्रश्न गंभीरच

$
0
0
रोटेशन मिळूनही मनमाडकरांना पुरेसे पाणी न मिळल्याने शहरात पुन्हा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होत असल्याचे उघड होऊनही काहीही कारवाई न झाल्याने साठवणूक तलाव भरलेला नाही.

राज्यातील ११ एसीपींना बढती

$
0
0
गृहविभागाने प्रमोशन दिलेल्या ११ पोलिस अधिका-यांमध्ये नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलिस दलातील चौघांचा समावेश आहे. राज्यातील २२ एसीपींना पुढील महिन्यात प्रमोशन मिळेल, अशी अटकळ असतानाच गृहविभागाने ११ जणांना बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले.

जादूटोणाविरोधी विधेयकासाठी स्वाक्षरी अभियान

$
0
0
अनेक वर्षांपासून लेखी आश्वासन देऊनही सरकारकडून जादूटोणा विधेयक मंजूर केले जात नाही. जादूटोणाविरोधी कायद्याचा १४ वर्षांचा वनवास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपवावा, याकरीता सीबीएसवरील हुतात्मा स्मारक येथे नरेंद्र दाभोलकर यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले.

शेतकरीच सरकारवर गुन्हे दाखल करणार

$
0
0
मनमाड, येवला व इतर शहरांसाठी पालखेड धरणातून सोडलेल्या पाण्याची चोरी केल्याच्या आरोपाखाली सरकारने शेतकऱ्यांची धरपकड व अटक करून त्यांच्यावर पाणी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.

'व-हाड' बघा सवलतीच्या दरात

$
0
0
प्रयोग संपल्यानंतरही प्रेक्षकांना तासन् तास हसवणारे नाटक म्हणून 'वऱ्हाड निघालं लंडनला' या एकपात्री प्रयोगाने आपली ओळख निर्माण केली. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी अजरामर केलेल्या या प्रयोगाची धुरा देशपांडे यांच्यानंतर अभिनेते संदीप पाठक यांनी स्विकारली.

पैसे देऊन काढले बोगस रेशनकार्ड

$
0
0
जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या नावाचे दोन रेशनकार्ड वितरित केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणाची राज्य सरकारच्या पातळीवरून दखल घेतली गेल्याने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images