Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

घरे झाली मोठी अन् रस्ते झाले लहान

$
0
0
शहर वाढत असले तरी रस्ते आणि जागा तेवढीच असल्याने त्याचे तोटे आता जाणवू लागले आहेत. कामगार वसाहती तसेच कॉलन्यांमध्ये घरांचे आकार वाढल्याने घंटागाडी जाण्यासाठीही रस्ता उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

कुलगुरूंच्या पदग्रहणाची घट‌िका समीप?

$
0
0
सात मह‌िन्यांपासून कुलगुरू पदाच्या न‌ियुक्तीसाठी प्रत‌ीक्षेत असणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त व‌िद्याप‌ीठाची प्रत‌ीक्षा आता लवकरच संपणार आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या मुलाखतीचा पह‌िला टप्पा मंगळवारी संपला. एकूणच कुलगुरू न‌िवडीची प्रक्र‌िया या आठवड्याअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पत्नी-पतीसह मुलगाही भाजला

$
0
0
दिवा पेटविताना भाजलेल्या महिलेला विझविताना पती आणि तिचा मुलगाही भाजला. वाडीवऱ्हे येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. छाया दत्तू कातोरे (४०), दत्तू निवृत्ती कातोरे (४५) आणि दीपक दत्तू कातोरे (९) अशी भाजलेल्या तिघांची नावे आहेत.

मोदींच्या फसव्या घोषणांचा प्रचार करणार

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे. मोदींनी केलेल्या घोषणा निवडणुकींनतर लगेच हवेत विरल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोंदींच्या या फसव्या घोषणांचा राष्ट्रवादीच्या महिला घराघरात जावून प्रचार करणार आहेत.

मनसे आमदारांनाच महापालिकेचे वावडे!

$
0
0
नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असली तरी मनसेच्याच तिन्ही आमदारांचा महापालिका प्रशासनावर विश्वास नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

जगताप यांची पक्षातून हकालपट्टी

$
0
0
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी नाशिक पूर्व विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

येवलेकरांना ३ दिवसाआड पाणी

$
0
0
येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर पाणी साठवण तलावात पालखेडचे 'ओहरफ्लो' चे पाणी मिळाले आहे. यामुळे स्वतंत्र दिनापासून येवला शहर वासीयांना पाचऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.

बोगस चिटफंडसाठी कडक कायदे हवेत

$
0
0
हल्ली एकाच पत्त्यावर चिटफंडच्या १० कंपन्या दाखविल्या जातात. अशा बोगस कंपन्यांना परवानगीच मिळू नये, यासाठी कायदे कठोर व्हायला हवेत. कंपनी कायद्यात बदल आवश्यक असून ते केंद्र सरकारच करू शकते.

...तर त्र्यंबकला पूजाविधीस बंदी

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील विविध प्रकारच्या पूजा साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च तेथील पुरोहित संघाने द्यावा. त्यांनी तो दिला नाही तर त्र्यंबकला पूजाविधी करण्यास नगरपालिकेने बंदी घालावी, असा थेट इशाराच पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने दिला आहे.

नेत्रदानाची मोहीमच ‘दृष्टीहीन’

$
0
0
राज्यात दोन लाखाहून अधिक अंध व्यक्ती आहेत. यातील पंधरा टक्के अंध व्यक्तींना नेत्रदान मिळाले तर ते पुन्हा सुंदर जग पाहू शकतात. मात्र ते पंधरा टक्के अंध कोण ? याबाबत राज्य सरकारकडे अथवा स्वयंसेवी संस्थांकडे डाटाच नसल्याने अशा अंधांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत.

पॅलेस्टिनवरील हल्ल्याचा निषेध

$
0
0
इस्राईलने पॅलेस्टिननवर सुरू केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आज, बुधवारी येवला शहरातील मुस्लिम बांधवानी तहसील कार्यालयावर 'मूक मोर्चा' काढला.

केबीसीच्या ठेवीदारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

$
0
0
केबीसीत पैसे गुंतल्यामुळे हैराण झालेल्या ठेवीदार आणि एजंटांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे गयावया केली. त्यामुळेच गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांशी या सर्वांची भेट करून देण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हाधिकारीच घेणार DIC ची झाडाझडती

$
0
0
तब्बल आठ महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जिल्हा उद्योग मित्रची बैठक (झूम) वादळी ठरली. गेल्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यापासून उद्योजकांच्या इतर समस्यांबाबत यावेळी घमासान चर्चा झाली.

नाशकात वाजणार युवक महोत्सवाचा बिगुल

$
0
0
शहरातील सर्व सांस्कृतिक संस्थांनी एकत्र येऊन पूर्वी पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत होणाऱ्या यूथ फेस्टिव्हलच्या धर्तीवर एक भव्य असा नाशिक युवक महोत्सव भरविण्याची तयारी दाखवली आहे. या युवक महोत्सवामध्ये चित्रकला, नृत्य, नाट्य, संगीत, शिल्प, साहित्य अशा विविध कलांच्या सादरीकरणाचा समावेश करण्यात येणार आहे.

शेंडेंना मूळ सेवेत पाठविणार ?

$
0
0
नाशिक महापालिकेच्या आस्थापनेवरील नगररचना सहायक संचालक विनय शेंडे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना त्‍यांच्या मूळ सेवेत परत पाठविण्याचा ठराव बुधवारच्या महासभेत करण्यात आला आहे.

चव्हाणच्या नातलग महिलेची चौकशी

$
0
0
लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झालेल्या भाऊसाहेब चव्हाण याच्या एका नातलग महिलेला गुंतवणूकदारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना शेळके असे तिचे नाव आहे.

राजकीय भाईंनाच सर्वाधिक फायदा

$
0
0
नाशिक महापालिकेच्या बुधवारच्या महासभेत गोदावरी नदीकाठावरील गावठाणातील मिळकतींच्या बांधकामाना परवानगी देण्याचा निर्णयाचा सर्वाधिक फायदा जमिनीच्या व्यवसायात असलेल्या शहरातील सर्वपक्षीय राजकीय भाईनांच होणार आहे.

गावठाणातील बांधकामांना परवानगी

$
0
0
शहरात गोदावरी काठावरील लाल व निळ्या पूररेषे अंतर्गत येणाऱ्या गावठाणातील शेकडो मिळकतदारांना महापालिकेन दिलासा दिला आहे. नदीकाठावरील गावठाणाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आजच्या महासभेत या मिळकतींना बांधकाम परवानगी देण्याचा ठराव मंजूर केला आहे.

इलेक्ट्रिकल लॅबला अखेर मंजुरी

$
0
0
नाशिक येथे प्रस्तावित असलेल्या पश्चिम विभागीय इलेक्ट्रिकल लॅबला केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अर्थ समितीने मंजुरी दिली आहे. या लॅबसाठी औरंगाबादरोडवरील शिलापूर येथील १५० एकर जागा निश्चित करण्यात आली असून तिचा ताबा दिल्यानंतर ही लॅब सकारली जाणार आहे.

‘श्रीगणेशा’ पर्यावरणपूरकतेचा

$
0
0
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिककरांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक बनविण्यासाठी नाशिककर प्रयत्नशील असून त्यांना या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी यंदाही ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images