Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बनावट कीटकनाशकांवर बंदी घालण्याची मागणी

0
0
बनावट कीटकनाशकांवर बंदी आणून आधीच देशोधडीला लागलेल्या बळीराजाला वाचविण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकारांनी करावा, अशी मागणी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

१२५ शेतकरी स्वीकारणार आत्मदहनाचा मार्ग

0
0
तलाठ्याच्या चुकीच्या व निष्काळजीपणाच्या पंचनाम्यांमुळे तालुक्यातील कंधाणे येथील १२५ गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागले आहे. या शेतकऱ्यांरना २६ ऑगस्टपर्यंत नुकसानभरपाई न मिळाल्यास १२५ शेतकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.

नाशिकरोड महापालिका आवारात पार्किंगचा जाच

0
0
महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाच्या आवारात पार्किंगचा त्रास वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने येथे नो पार्किंगचा कोरा करकरीत बोर्ड लावला आहे. त्यामध्ये महापालिका इमारतीच्या मागील बाजूस वाहनतळावर पार्किंग करण्याची सूचना आहे. विशेष म्हणजे नेते मंडळींबरोबरच अधिकारी-कर्मचारीही बोर्डाकडे साफ दुर्लक्ष करुन आवारातच वाहने उभी करत आहेत.

तरुणांनी व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज

0
0
महाराष्ट्रातील तरुणांनी व्यायाम व कसरतींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीतर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता राहुल बोडके याने केले. येथील मातादी सातपूर केबल नेटवर्कच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून तो उपस्थित होता.

काँग्रेसच्या धोरणांमुळेच देशाची झाली फाळणी

0
0
काँग्रेस नेत्यांच्या बोटचेप्या धोरणामुळेच देशाची फाळणी झाली. फाळणीचा खरा इतिहास आजच्या पिढीला माहिती झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. परिक्षित शेवडे यांनी जेलरोड येथे केले.

भारतीय कामगार सेनेची स्थापना

0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील शुभदा पॉलिमर प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी कामगार सेनेच्या युनियनची स्थापना केली. मंगळवारी कंपनीच्या गेटजवळ युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. अंबड वसाहतीतील ई-सेक्टरमध्ये असलेल्या शुभदा पॉलिमर प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली.

सिडकोत भुरट्या चोरांचा धुमाकूळ

0
0
जुने सिडको परिसरात सध्या भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. घराबाहेरचे कपडे, खिडकीजवळ ठेवलेले मोबाईल, भांडी आदि वस्तुंच्या चोरीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

‘राष्ट्रवादी’च्या दिग्गजांमध्ये चुरस

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ जागांसाठी तब्बल ५८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक शहरातील तीन मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीतील दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत.

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे पुन्हा रखडले वेतन

0
0
ऑनलाईन प्रक्र‌ियेत जाणव‌णाऱ्या तांत्र‌िक अडसरापाठोपाठ आता समाजकल्याण व‌िभागाच्या दुर्लक्षामुळे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडले आहे. सलग तीन मह‌िन्यांपासून रखडलेले हे वेतन त्वरित देण्यात यावे आण‌ि या कर्मचाऱ्यांच्या इतरही मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा येत्या रव‌िवारपासून ३० ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडू, असा इशारा महाराष्ट्र नवन‌िर्माण श‌िक्षक श‌िक्षकेतर संघटनेने द‌िला आहे.

मंदीचा फटका कायम

0
0
औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे २०१३-१४ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नाला ७१ कोटी रुपयांचा फटका बसला. तसेच जकातीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न देखील १८ टक्क्यांनी कमी झाले.

राणेनगरमध्ये वृक्षारोपण

0
0
राणेनगर परिसर मंडळातर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाना बच्छाव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. मंडळाने श्रावणात तब्बल ८१ झाडे लावली असून, त्यात बेला, कडुनिंब, औदुंबर आदींसह विविध औषधी वनस्पतींचा समावेश आहे. वृक्षसंवर्धन व संगोपनासाठी मंडळाची स्वतंत्र ग्रीन टीम तयार करण्यात आली आहे.

इदगाह मैदानास पोलिसांचा ‘ग्रीन सिग्नल’

0
0
इदगाह मैदानासह शहरातील ४० ठिकाणांवर गणेशमूर्ती विक्री स्टॉल्स उभे करण्यात कोणतीही अडचण नाही, अशा आशयाचे पत्र पोलिसांनी महापालिकेस दिले आहे. यामुळे चेंडू आता महापालिकेच्या कोर्टात असून महापौर अॅड. यतीन वाघ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्न सुरक्षा याद्यांचे वाचन तत्काळ पूर्ण करा

0
0
अन्न सुरक्षा विधेयकाच्या अंमलबजाणीसाठी जिल्ह्यातील लाभार्थीच्या अंतिम याद्यांचे वाचन तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी डी. बी. जवजांळ यांनी दिले आहेत. १५ ऑगस्टला याद्यांचे वाचन करू न शकलेल्या ग्रामपंचायतींनी या याद्यांच्या वाचनासाठी लवकर ग्रामसभा बोलावून याद्या अंतिम तयार कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बालगोपालांसह वृध्दांनीही धरला ठेका

0
0
हिची चाल तुरू तुरू, उडती केस भुरू भुरू पासून ते आताच्या माउली माउली पर्यंतच्या जुन्या नवीन सुरेल गाण्यांची मैफल आणि त्यावर मधेच ठेक्यावर ताल धरणाऱ्या बाल कलाकारांपासून ७० वर्ष वयाच्या वसुंधरा कारंजकर यांनी उपस्थित स्पर्धकांचे व प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. निमित्त होते अपूर्व सूर मल्हार २०१४ च्या ऑडिशनचे.

आनंदवल्ली परिसरातून मुलाचे अपहरण

0
0
दहीहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याची घटना आनंदवल्ली परिसरात घडली. आनंदवल्ली गावातील र‌ह‌िवासी समाधान साळवे यांचा बारा वर्षांचा मुलगा आद‌ित्य हा आनंदवल्ली परिसरातील जाधव मळा येथे दह‌िहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी गेला होता. कार्यक्रम संपल्यानंतरही आद‌ित्य उशिरापर्यंत घरी न परतल्याने वड‌िलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने साळवे यांनी आद‌ित्यला अज्ञान व्यक्तिने पळवून नेले असल्याची तक्रार गंगापूर पोल‌िस ठाण्यात नोंदव‌ली आहे.

‘जनगणनेच्या माहितीचा उपयोग करा’

0
0
जनगणनेतून संकलीत झालेल्या माहितीचा उपयोग शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केली. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक व केंद्रीय जनगणना कार्यालयातर्फे बुधवारी येथे कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येस एक वर्ष झाले तरीही, त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. राज्य सरकारचा निषेध म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेतर्फे शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.

साधुग्रामसाठी जमीन अधिग्रहणास मान्यता

0
0
पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्रामसाठी २६९ एकर जमीन भाडेतत्वावर तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्यास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. या मंजुरीमुळे महापालिकेसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. ही जमीन महापालिकेकडे हस्तांतरीत होवून साधुग्रामच्या कामांना चालना मिळणार आहे. एकूणच सिहंस्थकामांची प्रक्रिया गतिमान होणार आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांत वर्चस्ववादाची लढाई

0
0
दाहशामक कंपनीला देण्यात आलेल्या ठेका आमदार वसंत गिते यांच्या पत्राच्या आधारे महापौर अॅड. यतीन वाघ यांनी रद्द केल्यानंतर स्थायी समितीने आपला रोख एलईडीकडे वळवला आहे. एलईडीचे काम सुरू झालेले नसल्याने कायदेशीर सल्ला घेऊन हा ठेका रद्द होऊ शकतो का? याची चाचपणी करण्याचे आदेश सभापती राहुल ढिकले यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दोन मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे २८ जणांच्या मुलाखती

0
0
आगामी विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी मुबंईत पार पडल्या. जिल्ह्यातील ६ जागासांठी तब्बल ३६ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात नाशिक पूर्वमधून विद्यमान जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, मध्यमधून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह शैलेश कुटे यांचा समावेश आहे. नाशिकमधून सर्वाधिक १७ इच्छुकांनी आपली दावेदारी सांगितली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images