Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

KBC गुंतवणूकदारांचा बहिष्कार

$
0
0
केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण यास निवडणुकीपूर्वी अटक न केल्यास विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गुंतवणुकदारांनी दिला आहे.

नवनिर्माणाला 'मनसे' दांड्या

$
0
0
नाशिकच्या नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनसेच्या आमदारांमधील हेवेदावे आणि वर्चस्वाच्या लढाईची पुन्हा एकदा नाशिककरांना प्रचिती सातपूर बसस्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी आली आहे.

भुजबळांना रोखण्याची सेनानीती

$
0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव आणि येवल्याकडे न फिरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीत येवल्यात प्रचाराला जाण्याची जाहीर घोषणा केल्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत.

टेम्पो ट्रॅक्स उलटून १ ठार

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे भात लावणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅक्स उलटून एकाचा मृत्यू झाला, तर १९ मजूर जखमी झाले. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास खुंटवाडी बंधाऱ्याजवळ हा अपघात झाला.

सोशल मीडियाला चाप?

$
0
0
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर झालेल्या अपप्रचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हावार स्वंतत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

मेळाचा बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

$
0
0
तालुक्यातील ममदापूर परिसराला जलसंजीवनी देणाऱ्या मेळाचा बंधारा प्रकल्पाला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने ६ कोटी ५३ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही माहिती संपर्क कार्यालयातून बाळासाहेब लोखंडे यांनी दिली.

‘केंद्र सरकारकडून विश्वासघात’

$
0
0
लोकसभा निवडणुकीत शेतकरी व कष्टकरी जनतेला मोठी स्वप्ने मोदी सरकारने दाखवली. जनतेने देखील विश्वासाने मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला स्पष्ट बहुमत देत सत्ता दिली. मात्र, गेल्या दोन महिन्यात या केंद्र सरकारने शेतकरी हितापेक्षा ग्राहक हिताला प्राधान्य देत चुकीचे निर्णय घेत धोरण अमलात आणीत शेतकऱ्यांचा विश्वास घात केला आहे.

पैठणीला मिळणार प्रोत्साहन केंद्राचे बळ

$
0
0
येवल्यातील पैठणी तयार करण्याच्या पद्धतीबाबत पर्यटकांना माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या येवला ग्रामीण पर्यटन माहिती व पैठणी प्रोत्साहन केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी झाला.

शेती महामंडळाची जमीन अल्प दरात देणे थांबवा

$
0
0
मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील शेती महामंडळाची हजारो एकर जमीन अल्प मोबदल्यात काही मूठभर लोकांना कराराने दिली जात आहे. हा प्रकार आमदार दादा भुसे यांचा लक्षात आल्याने शेती महामंडळाने या करार प्रक्रियेला तत्काळ स्थगिती द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शैक्षणिक गुणवत्ता विकासाची आज पाहणी

$
0
0
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवरून गटशिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षकांच्या एका संघटनेत तीव्र मतभेद असून त्यांच्यातील संर्घषाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आज (दि. २३) सकाळी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी दाखल होत आहेत.

दमदार पावसाचे मालेगावात पुनरागमन

$
0
0
महिन्यापासून मालेगाव शहर आणी तालुक्यात पावसाने दडी मराल्याने शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली सापडला होता. मात्र, शुक्रवारी शहरासाह तालुक्यात वरूणराजाच्या पुनरागमन झाल्याने बळीराजा काहीसा सुखावला असून पिकांना दिलासा मिळाला आहे.

समर्थ सहकारी बँकेची वार्षिक सभा बेकायदेशीर

$
0
0
समर्थ सहकारी बँकेने सभासदांना अहवाल न पाठविताच रविवारी आयोजित केलेली वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप बँकेचे सभासद आणि पीपल्स ठेवीदार संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. श्रीधर व्यवहारे यांनी केला आहे.

कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस अटक

$
0
0
कुंटणखान्यात जबरदस्तीने तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलीकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिला २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर त्या चौघींची कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली आहे.

सेंट फ्रान्स‌िस शाळेच्या श‌िक्षकाव‌िरोधात गुन्हा

$
0
0
सेंट फ्रान्स‌िस शाळेतील एका व‌िद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या श‌िक्षकाच्या व‌िरोधात सरकारवाडा पोल‌िस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या शाळेने केलेल्या अवास्तव फी वाढीच्या न‌िषेधार्थ सुरू करण्यात आलेले आंदोलन सुरूच ठेवण्याची भूम‌िका श‌िक्षण बाजारीकरण व‌िरोधी मंचच्या वतीने घेण्यात आली आहे.

कौशल्याध‌िष्ठीत ज्ञानार्जनावर भर द्या

$
0
0
एकव‌िसाव्या शतकाची द‌िशा ही सर्वसमावेशकतेची आहे. या व्यापक व‌िश्वात आपली पावलं घट्ट रोवण्यासाठी कौशल्य व‌िकस‌ित करा. कौशल्याध‌िष्ठ‌ित ज्ञानार्जनावर भर द्या, असे आवाहन अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारीया यांनी केले.

पुणे व‌िद्यापीठाच्या सभेसाठी प्रश्न पाठव‌िण्याचे आवाहन

$
0
0
साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाच्या स‌िनेटची बैठक द‌ि. २७ सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे. व‌िद्यापीठाच्या या अध‌िकार मंडळाच्या सभेत व‌िद्यापीठ प्रशासनास प्रश्न व‌िचारण्याचा अध‌िकारी स‌िनेट सदस्यांना असतो. याबरोबरच व‌िद्यापीठाच्या व्यापक ह‌िताचे ठराव मांडण्याचाही अध‌िकार या सदस्यांना असतो. आगाम‌ी मह‌िन्यात होणाऱ्या सभेसाठी व‌िद्यार्थी आण‌ि श‌िक्षण क्षेत्रातील घटकांनी प्रश्न पाठवावेत, असे आवाहन स‌िनेट सदस्यांकडून करण्यात आले आहे.

चंद्रकांत बढे अंबड पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीच्या नावे खोटे दस्तावेज तयार करून ५० लाखांची कर्जाची रक्कम परस्पर लाटल्याप्रकरणी चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे यांना अंबड पोलिसांनी पालघर न्यायालयामार्फत ताब्यात घेतले. चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्था कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे चर्चेत होती.

गुणवत्ता अन् समाधान हाच प्रगतीचा पाया

$
0
0
भारतीय उद्योग जगतात जीवघेणी स्पर्धा न‌‌िर्माण झाली आहे. उच्च गुणवत्ता व ग्राहक समाधान देणारे उद्योगच या स्पर्धेत अस्तित्व टिकवू शकतील. सकारात्मक मानसिकता व उच्चतम कृती करणारे कुशल मनुष्यबळ असणारे उद्योग ग्राहकांच्या मनावर राज्य करतील, असे मत औद्योगिक कीर्तनकार संदीप भानोसे यांनी व्यक्त केले.

अतिक्रमणप्रश्नी पेढे वाटून आंदोलन

$
0
0
नाशिकरोड महापालिका कार्यालयात शुक्रवारी (ता. २२) झालेली प्रभाग समितीची बैठक अतिक्रमण आणि बंद पथदीप तसेच अधिकारी कार्यवाही करत नाहीत, या प्रश्नांवर गाजली. अतिक्रमणप्रश्नी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी पेढे वाटून गांधीगीरी मार्गाने आंदोलन केले.

`राष्ट्रवादी युवक`चा संवाद अभियानावर भर

$
0
0
जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाभरात युवक संवाद अभियान सुरू करण्यात आले आहे. सोशल मीडियाबद्दल युवकांकसाठी जनजागृती मोहीम आयोजित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे यांनी पक्षाच्या बैठकीत दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images