Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मार्च प्रारंभीच गाठले जकातीचे उद्दिष्ट

$
0
0
जकात वसुलीचे उद्दिष्ट ६५० कोटींचे दिलेले असताना महापालिका प्रशासनाने हे उद्दिष्ट मार्च महिन्याच्या प्रारंभीच गाठले आहे. त्यामुळे खासगीकरणाला बाजूला सारण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

शेतक-यांना १७९१ कोटींचे कर्ज वाटप

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षभरात ४ लाख १२ हजार ५३३ शेतकऱ्यांना सुमारे १७९१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी दिली आहे.

नाशिकवरचा अन्याय दूर करा

$
0
0
'यंदाच्या रेल्वे बजेटपासून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या. मात्र, रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी महाराष्ट्रातील नागरिकांची घोर निराशा केली,' असे सांगत रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह नाशिकवर झालेल्या अन्यायाबाबत खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

केबल ग्राहकांनाही चॅनेल्सचे पर्याय

$
0
0
'डीटीएच'प्रमाणेच (डायरेक्ट टू होम) केबलधारकांनाही विविध चॅनेल्सचे पॅकेज (बुके) निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. केंद्राच्या अखत्यारित असलेल्या 'ट्राय'ने (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी) दिलेल्या निर्देशानुसार 'एमएसओ'ला (मल्टीसिस्टीम ऑपरेटर्स) १५ एप्रिलपर्यंत हे पॅकेज जाहीर करावे लागणार आहेत.

जन्मशताब्दीचा दोन्ही काँग्रेसला विसर

$
0
0
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देशाचे संरक्षणमंत्री झाल्यानंतर खासदारकीसाठी निवड केली ती नाशिक मतदारसंघाची... त्यांनीच ओझरला 'एचएएल' कारखाना आणला... आधुनिक महाराष्ट्राच्या या दिवंगत शिल्पकाराच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता मंगळवारी झाली.

संपर्कातूनच वाढवा स्वागतयात्रेतील लोकसहभाग

$
0
0
‘गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेतील लोकसहभाग वाढविण्यासाठी एकमेकांशी सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे,’ असा सल्ला नववर्ष स्वागत यात्रा समितीचे विश्वस्त डॉ. विनय वेलणकर यांनी दिला. समितीच्या नाशिक शाखेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.

विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जपण्याची गरज

$
0
0
विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन नसल्याने माणूस विचारांची क्षमता हरवून बसला आहे. यामुळे सत्य आणि असत्य यांच्यातील सीमारेषाही त्याच्यासाठी पुसट बनली आहे. सत्य आणि असत्य यांच्यातील भेद शोधण्यासाठी कुणाचे आयते मार्गदर्शन स्विकारण्यापेक्षा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन बाळगा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केले.

बिटको कॉलेजमध्ये १६ मार्चपासून ‘इनव्हेस्टेज’

$
0
0
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जेडीसी बिटको मॅनेजमेंट स्टडीज अँड रीसर्चतर्फे गुंतवणुकदारांच्या मार्गदर्शनासाठी यंदाही ‘इनव्हेस्टेज २०१३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पीएसआय सोनवणे यांची आत्महत्या

$
0
0
पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) जगन्नाथ खंडू सोनवणे (५७) यांनी जेलरोडवरील दसक पोलिस चौकीतच स्वतःच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण उशिरापर्यंत पुढे आले नव्हते.

नाशिकरोडला साडेआठ लाखांची लूट

$
0
0
कारमधील दोघांची दिशाभूल करत चोरट्यांनी भरदुपारी तब्बल साडेआठ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. नाशिकरोडच्या रेजिमेंटल प्लाझासमोरील एचडीएफसी बँकेसमोरील या घटनेमुळे फसवणुकीसाठी चोरटे वेगवेगळे प्रकार अवलंबित असल्याचे समोर आले आहे.

विकासमार्गांना अखेर ग्रीन सिग्नल

$
0
0
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी नाशिक-पुणे आणि मनमाड-इंदौर या दोन रेल्वेमार्गांची बुधवारी संसदेत घोषणा करून उत्तर महाराष्ट्रवासीयांना दिलासा दिला आहे. आता येत्या आठ ते दहा वर्षांत या मार्गांवर रेल्वे धावेल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मार्गांचा हा आढावा...

प्रसार माध्यमे आणि साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ

$
0
0
प्रसार माध्यमे आणि साहित्य यांचा गुंता जुना असून एकमेकांना पूरक असूनही या दोन्ही क्षेत्रांत संघर्ष बघावयास मिळतो. स्पर्धा व समाजाच्या मागणीमुळे दोन्ही क्षेत्रांत बदल होत असून दोन्हीही माध्यम समाजहितासाठी प्रभावी ठरतात, असे प्रतिपादन दैनिक गांवकरीचे कार्यकारी संपादक शैलेद्र तनपुरे यांनी केले.

शहरात १५ ठिकाणी नव्याने सिग्नल

$
0
0
शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी १५ ठिकाणी सिग्नल बसविणे प्रस्तावित आहे. याविषयीची माहिती वाहतूक समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आली.

रेशनकार्डवर बनावट सही, शिक्का

$
0
0
मुख्यमंत्र्यांच्या नावे वितरित करण्यात आलेल्या एका रेशनकार्डावर बनावट सही व शिक्क्याचा वापर करण्यात आल्याची बाब पुढे आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या बनवेगिरीप्रकरणी धान्य वितरण अधिकारी (एफडीओ) सरकारवाडा पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.

उत्सुकता 'टेलिकिनेसिस'ची

$
0
0
पंचवटीतील 'के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अॅन्ड रिसर्च सेंटर'मध्ये यंदाही 'टेलिकिनेसिस' या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटतर्फे हा महोत्सव आयोजित केला जातो.

सप्तश्रृंग गडावर आज शिवसेनेचा 'जागर'

$
0
0
नाशिक शिवसेनेतर्फे सप्तश्रृंग गडावर आज (गुरुवार) कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नुकतीच घोषित करण्यात आलेली कार्यकारिणी व आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होत आहे.

स्थायीच्या निवडणुकीसाठी हायकोर्टात याचिका

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १ मार्चपर्यंत होणे आवश्यक असताना ही निवडणूक घेण्यास महापौर टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप नाशिक नागरी विकास आघाडीचे अध्यक्ष तथा स्थायी समितीचे माजी सभापती संजय चव्हाण यांनी केला आहे.

नाशिक क्राइम डायरी

$
0
0
कधी मागून येऊन, तर कधी पत्ता विचारण्याचा बहाणा करत चेनस्नॅचिंग करण्याच्या घटनांतील सातत्य कायम आहे. बुधवारीही चेन स्नॅचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या. त्यातील एका घटनेत महिलेच्या प्रसंगावधानतेमुळे पूर्ण मंगळसूत्र लांबविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

एलईडीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

$
0
0
शहरातील एलईडी फिटिंगच्या ठेक्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची माहिती आमदार जयप्रकाश छाजेड यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. विधानपरिषदेत एलईडीसह साडेसतरा कोटींची रोबोटिक मशिनची खरेदी, पंधरा कोटींची हायड्रोलिक प्लॅटफॉर्म शिडी, पदोन्नती, अडीचशे कोटींचे डिफर पेमेंट याविषयी आ. छाजेड यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

असुरक्षिततेचा चायनीज ‘उद्योग’

$
0
0
शहरात सर्वत्र चायनीज पदार्थांचे स्टॉल्स फोफावले असून यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने हा आरोग्याला धोकादायक झालेला हा उद्योग शहरासाठीही असुरक्षितता वाढविणारा ‘उद्योग’ ठरू लागला आहे. अनेक चायनीज विक्रेते रस्त्याच्याकडेला अन्नपदार्थ फेकत आहेत, तर काही ठिकाणी मद्यप्राशनाचे प्रकार सुरू असल्याने गाड्या असणाऱ्या परिसरात असुरक्षित वाटत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images