Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विकास आराखडा अन् ‘भुक्ते पॅटर्न’

$
0
0
नाशिक शहरासाठी नव्याने विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने नगररचना विभाग सहसंचालक प्रकाश भुक्ते यांच्यावर सोपविल्यानंतर कामाची सूत्रे महानगरपालिकेकडून सरकारकडे गेली.

नवी बँक खाते योजना, आर्थिक विकासाची संधी?

$
0
0
केंद्र सरकार 'घर तिथे बँक खाते' योजना सुरू करीत आहे ही उत्सावर्धक व आनंदाची बातमी आहे. या योजनेचा तपशील अजून यायचा आहे. पण मुख्यतः, प्रत्येक घराला बँकिंग सेवा पुरविण्यासाठी घरटी एक (तरी) खाते उघडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असून, आगामी चार वर्षांत २०१८ पर्यंत शहरी भागात तीन कोटी व ग्रामीण भागात बारा कोटी बँक खाती उघडण्यात येणार आहेत.

कॉलेजरोडवर सिनेस्टाईल हाणामारी

$
0
0
सुट्टी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भरगच्च गर्दी असलेल्या कॉलेजरोडवर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे कॉलेजरोडवरील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

नारळीकर सरांचा प्रश्नोत्तराचा तास

$
0
0
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे गेल्या आठवड्यातील नाशिकमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानच नव्हे, तर त्या नंतरच्या प्रश्नोत्तरांचा तासही श्रोत्यांसाठी उदबोधक ठरला.

आयुष्याचे हुमान सोडविण्यासाठी ‘त्याने’ केली मदत

$
0
0
‘हुमान म्हणजे कोडे. माझे आयुष्याचे हुमान सोडविण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने मदत केली. त्याचे नावही उत्तम होते व तो कलागुणांनीही उत्तमच होता. त्याने लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला अल्लड हा किताब बहाल केला होता, त्याच्या व माझ्या वयात १० वर्षांचे अंतर होते हे अंतर त्याने कायसाठी ठेवले,’ असे प्रतिपादन ‘हुमान’ आत्मचरित्राच्या लेखिका, सनदी अधिकारी संगीता धायगुडे यांनी केले.

सिंहस्थाची ८० टक्के कामे कागदावर पूर्ण

$
0
0
भूसंपादन प्रक्रियेसाठी राखीव असलेले २०० कोटी रूपये वगळता उर्वरीत ८५२ कोटी रूपयांच्या आराखड्यापैकी तब्बल ६९३ कोटी ११ लाख रूपयांच्या वर्क ऑर्डर महापालिका प्रशासनाने ​दिल्या आहेत. उर्वरीत कामांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, सिंहस्थ कुंभमेळ्याशी निगडीत सर्व कामे कागदावर तरी पूर्णत्वाकडे निघाल्याचे दिसते.

किडनीची गरज पाचशे जणांना

$
0
0
नाशिकमध्ये ५०० हून अधिक पेशंट डायलेसिसवर आहेत. किडनी ट्रान्सप्लांट या पेशंटसाठी जीवदान ठरू शकते. मात्र, झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) बाबत पुरेशी माहिती नसल्याने फक्त एकाच पेशंटने किडनीसाठी नावनोंदणी केली आहे.

आदिवासींच्या आरक्षणला धक्का लावू देणार नाही

$
0
0
आमचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही. परंतु, आमच्या आरक्षणाला कुणी धक्का लावत असेल तर आदिवासी बांधव शांत बसणार नाही, असा इशारा अादिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी (ता.१७) दिला.

सातपूरकरांना विजेचा फटका

$
0
0
विजेच्या कमी अधिक दाबामुळे रविवारी मध्यरात्री सातपूर परिसरातील नागरिकांना मोठे नुकसान सोसावे लागले. अचानकपणे वीजपुरवठा खंडीत झाल्याने घरातील इलेक्ट्रानिक वस्तूंचे नुकसान झाले. परिसरात यापूर्वीही असेच प्रकार घडूनही महावितरण कंपनीकडून लक्ष दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इको गणेशाशी गट्टी

$
0
0
जेलरोड-सायखेडा मार्गावरील दुर्गामाता देवस्थान ट्रस्टतर्फे शाडू मातीपासून इको फ्रेन्डली गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात झाली. पर्यावरण रक्षणाचा संदेश मिळाल्याने बालगणेशाची इको गणेशाशी गट्टी जमली.

वंचितांसाठी धावले विद्यार्थी

$
0
0
समाजातील वंचित बालकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नवजीवन फाउंडेशनतर्फे आयोजीत केलेल्या ‘वर्षा रन’मध्ये अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रविवारी सकाळी आठ वाजता शिवशक्ती नवजीवन डे स्कूलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रंगणार ‘समग्र गोपीकृष्ण’

$
0
0
नाशिकमधील कीर्ती कलामंदिरतर्फे नटराज ‘पंडित गोपीकृष्ण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे २१ वे वर्ष असून, यंदा ‘समग्र गोपीकृष्ण’ या थीमनुसार यामध्ये नृत्य सादर करण्यात येणार आहे.

उद्यापासून पेट्रोलपंप बंद

$
0
0
महाराष्ट्र पेट्रो डिलर्स असोसिएशनचा महासंघाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंद आंदोलनाला नाशिक जिल्हा पेट्रो डिलर्स असोसिएशनने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रवींद्र शिंगेंना सक्तीची निवृत्ती

$
0
0
अनेक गैरव्यवहारांचा ठपका ठेऊन सिव्हिल हॉस्पिटलचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक रवींद्र शिंगे यांनी सक्तीची निवृत्ती घ्यावी, असे आदेश राज्य शासनाचे उपसचिव रा. श. जाधव यांनी दिले आहेत.

पाणीपुरवठा उद्या बंद

$
0
0
बळवंतनगर जलकुंभाजवळील कार्बन नाका ते रामराज्य जलकुंभ भरणारी ५०० एमएम व्यासाची पाईपलाईन जोडणीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सातपूर तसेच पश्चिम विभागातील अनेक भागात २७ ऑगस्ट रोजी सायंकाळचा तसेच गुरूवारी, २८ ऑगस्ट रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.

एलईडी ठेकेदाराची प्रशासनाकडून पाठराखण

$
0
0
एलईडी फिटींग्सचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, प्रशासन ठेकेदाराची पाठराखण करण्यातचे धन्यता मानत आहे. यामुळे चालढकल करणाऱ्या ठेकेदाराविरुध्द कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल सभापती अॅड. राहुल ढिकले यांनी उपस्थित केला.

सिंहस्थाच्या कामांना गती

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळाच्या विकासकामांसाठी राज्य सरकारने नव्याने ५१ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर केला असून संबधीत विभागांना तत्काळ या निधीचे वितरण करण्यात आल्याने सिंहस्थाच्या कामांना गती मिळणार आहे.

शहरातील पाणीप्रश्नी केवळ चर्चेचे गुऱ्हाळ

$
0
0
दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. सत्ताधारी गटातीलच नगरसेवक दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याची मागणी सातत्याने करीत असून सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा त्यावर चर्चा झाली.

काचेच्या इमारतींना नियमांचे वावडे

$
0
0
सध्या काचेचा वापर करून इमारती तयार करण्याचे फॅड शहरात पसरले असून हे काम कोणत्या नियमात होते, याचे स्पष्टीकरण स्थायी समिती सदस्य कुणाल वाघ यांनी प्रशासनाकडे मागितले होते.

तेलही गेले, तूपही गेले…

$
0
0
‘चकाकते ते सगळेच सोने नसते’ अशी म्हण प्रचलित आहे. सोने अस्सल असेल तर ते फार चकचकावे, अशी अपेक्षाही नसावी. परंतु, तसे होत नाही. मुळात आपल्याकडे आहे त्याचा देखावा करण्याची मानसिकता, ते इतरांना ठळकपणे दिसावे यासाठी केला जाणारा अट्टाहास हा मोहच अनेकदा स्वत:वर आपत्ती ओढावून घेण्यास कारणीभूत ठरत असतो.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images