Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सर्जा-राजाशी बंदीजनांचे जडले नाते

0
0
नाशिकरोडसह परिसरातील गावांमध्ये बैलपोळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी बैलांचे औक्षण करुन त्यांची पूजा केली. मध्यवर्ती कारागृहाची मोठ्या प्रमाणावर शेती आहे.

सटाण्यात बनावट ओळखपत्र

0
0
एस. टी. बस प्रवासात सवलत मिळवण्यसाठी तसेच इतर शासकीय लाभ मिळविण्यसाठी बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या टोळीचा सटाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सटाणा, मालेगाव व कळवण येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मनमाडला आठ दिवसाआड पाणी

0
0
मनमाड नगरपालिकेच्या पाटोदा येथील साठवणूक तलावाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तलावाची साठवण क्षमताही वाढली आहे. वागदरडी धरणावरील तांत्रिक दोष सुधारून येत्या आठवड्यापासून मनमाड शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

साधुग्रामच्या कामास हिरवा कंदील

0
0
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर साधुग्राम उभारणीसाठी काम सुरू करण्यास स्थायी समितीने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. चारपैकी दोन प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. जागा उपलब्ध होईल, त्यानुसार उर्वरीत दोन्ही प्रस्तावांना स्थायी समितीकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नाशिककरांचा 'घसा' जाम

0
0
ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि पावसामुळे नाशिककरांचा घसा ‘जाम’ झाला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सर्दी-खोकला, पोटदुखी, डायरिया, डेंगी-मलेरियासदृश तापाने नाशिकरांना घेरले आहे.

चांदवड अन् पेठही टंचाईग्रस्त

0
0
राज्यसरकारने आज दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १५ नव्या टंचाईसदृश्य तालुक्याची यादी जाहीर केली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि पेठ या दोन तालुक्यांचा समावेश केला आहे.

महापालिका आवारात तीन चोऱ्या

0
0
शहराची पालकसंस्था असलेल्या महापालिकेतील सुरक्षाव्यवस्थेच्या नाकावर टिचून चोरट्यांनी भरदिवसा ठेकेदाराजवळील तीन लाखांची रोकड हिसकावून नेली. पावणे बाराच्या सुमारास घडलेल्या या जबरी चोरीमुळे महापालिकेच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.

महिलांना ३३ टक्के उमेदवारी हवी

0
0
विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के निश्चित उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच, यासाठी आपण पक्षाकडे आग्रह धरू, अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय महीला आघाडीच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.

माळशेजमध्ये घटला पर्यटकांचा ओघ

0
0
माळीण येथे गतमहिन्यात ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यटकही धास्तावले आहेत. त्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे ५० टक्के पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. परिणामी येथील हॉटेल्स, खाद्य पदार्थांच्या व्यावसायांवर विपरीत परिणाम झाला आहे.

महापौरपदासाठी भाजप 'राज'दारी

0
0
नाशिक महापालिका स्थायी समितीचे सभापतीपद गमावलेल्या भाजपने आता महापौरपदासाठी शिवसेनेसह मनसेशीही पुन्हा हातमिळवणी सुरू केली आहे. स्थायीचे सभापतीपद नाकारल्यानंतर मनसेशी काडीमोडची भाषा करणाऱ्या भाजपने आता महापौरपद आम्हाला द्या, अशी गळ मनसेला घातली असून त्यासाठी बुधवारी (दि. २७) भाजपचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे.

ऑगस्टीन प‌िंटोंचा अटकपूर्व जामीन रद्द करा

0
0
नाश‌िकच्या सत्र न्यायालयाने सेंट फ्रान्स‌िस शाळेचे संचालक ऑगस्टीन प‌िंटो यांना द‌िलेला अटकपूर्व जाम‌ीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी सेंट फ्रान्स‌िस शाळेच्या पालकांच्या बैठकीत करण्यात आली.

पशुधन अधिकारी येवल्यात निलंबित

0
0
शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत आजारी शेळीगट वाटप केल्याप्रकरणी येवला पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एच. अलकुंटे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.

शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

0
0
कळवण शहरातील गटार व सांडपाणी प्रक्रियेसाठी ३ कोटी ५६ लाख रुपये मंजूर केले आहेत. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांनी प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी दिली.

राज्यात आघाडीचीच सत्ता येणार

0
0
जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे देवून महाराष्ट्रातील सुज्ञ जनता फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीशी प्रतारणा करणार नाही, असा विश्‍वास व्यक्त करून महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचेच सरकार येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले.

ऑनलाईनच्या गोंधळात लटकले शिक्षकांचे पगार

0
0
पूर्वी ऑफलाईन पगाराचे काम होत असताना वारंवार पगाराला उशीर होत असल्याने सर्व शिक्षकांचे पगार 'ऑनलाईन' करण्याचे धोरण शासनाने आखले. मात्र, ऑनलाईन सिस्टीम होऊनही शिक्षकांना पगारासाठी दोन दोन महिने वाट पहावी लागत आहे.

सटाण्यातील नववसाहतींमध्ये रस्त्यांची दुरवस्था

0
0
सटाणा नगरपरिषदेला कर स्वरुपात भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या शहरातील नववसाहतींमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

गावित, कोकाटेंची भिस्त इगतपुरीवर

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बिगुल येत्या आठवडाभरात वाजणार असल्याने इगतपुरी तालुक्यात विकासकामांच्या माध्यमातून आमदार निर्मला गावित व माणिकराव कोकाटे यांनी गावोगावचा संपर्क वाढविण्यावर दिला आहे.

साथीच्या आजारांनी नवे निरपूरकर त्रस्त

0
0
बागलाण तालुक्यातील नवे निरपूर परिसरात वातावरणातील बदलाबरोबरच दूषित पाण्यामुळे डेंग्यू, गॅस्टो व मलेरिया सारख्या साथींच्या आजारांनी डोकेवर काढले असून आरोग्य विभागाच्या पथकांनी या ठिकाणी विशेष यंत्रणा उभारली आहे.

‘टोमॅटो उत्पादकाला योग्य भाव मिळावा’

0
0
येवला बाजार समितीत व्यापारी कमी भावाने टोमॅटो खरेदी करीत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी शेजारील पिंपळगाव, लासलगाव येथे माल घेऊन जात असल्याचे चित्र पहायला मिळते.

मालेगाव महापालिकेचा कौल जकातीला

0
0
एलबीटी की जकात? हा तिढा राज्य शासनाने न सोडवता तो चेंडू महापालिकाच्या कोर्टात टाकला होता. यानंतर मालेगाव मनपात नक्की एलबीटी की जकात याबद्दल निर्णय होणे बाकी होते. अखेर महापालिका कार्यक्षेत्रात एलबीटी रद्द करून पुन्हा जकात लागू करण्याचा ठराव मनपा विशेष महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images