Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

८ शिक्षकांवर कारवाईचा बडगा

$
0
0
बागलाण तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रमाच्या पाहणी दौऱ्यात ताहाराबाद येथील मुले व मुलींच्या प्राथमिक शाळेतील कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

१० तहसीलदारांना नोटिसा

$
0
0
दैनंदिन पावसाची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील दहा तहसीलदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मंडल अधिकाऱ्यांकडून पावसाची इत्यंभूत माहिती घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाला दररोज सकाळी माहिती पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वनव‌िभागाचे कर्मचारी बेमुदत संपावर

$
0
0
व‌िव‌िध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नाश‌िक ज‌िल्ह्यातील सुमारे चारशेवर वनकर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. नाश‌िक वनवृत्तातील वनरक्षक आण‌ि वनपाल या पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या संपात सहभाग आहे. व‌िभागीय कार्यालयासमोर या कर्मचाऱ्यांनी ठ‌िय्या द‌िला आहे.

मानस रिसॉर्टच्या वाढीव बांधकामावर हातोडा?

$
0
0
इगतपुरी नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या मानस रिसॉर्टच्या अतिरिक्त बांधकामप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला नोटीस बजावली आहे. रिसॉर्टच्या बांधकामाला स्थगिती देवून आतापर्यंत झालेले बांधकाम तत्काळ पाडण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पर्यावरण मंजुरीवरून ग्रामस्थ हातघाईवर

$
0
0
सिन्नरच्या प्रस्तावित मल्टीप्रॉडक्ट विशेष आर्थिक क्षेत्रातील नव्या औष्णिक प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जाहीर जनसुनावणीत प्रकल्पाच्या मंजुरीवरून ग्रामस्थांमध्येच दोन गट पडले.

नाश‌िक कॅम्पससाठी जागा अखेर ताब्यात

$
0
0
प्रशासकीय परवानग्यांच्या औपचारिकतेचा रखडलेला टप्पा पूर्ण करीत अखेर साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाने नाश‌िक कॅम्पससाठीची जागा ताब्यात घेतली. या टप्प्यामुळे बहुप्र‌त‌ीक्ष‌ेत असणाऱ्या नाश‌िक कॅम्पसच्या कार्याला प्रत्यक्षात गती म‌िळणार आहे.

विनापरवानगी स्टॉल लावणाऱ्यांवर गुन्हा

$
0
0
महापालिकेची परवानगी न घेता रस्त्यावर अनधिकृतपणे स्टॉल लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मंडप डेकोरेटर्सवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डिगोरे मंडप डेकोरेटर्स आणि मे. जोसारभाई डेकोरेटर्स अशी त्यांची नावे आहेत.

जाधव, शेख यांच्यात महापौरपदासाठी चुरस

$
0
0
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुक कामाला लागले आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापौर आपल्याकडे ठेवण्यासाठी मनसेनही ताकद पणाला लावली आहे. सभागृह नेते शशिकांत जाधव आणि नगरसेवक सलिम शेख यांच्यातच आता स्पर्धा आहे.

नाशिक मध्य अन् पूर्व मतदारसंघावर NCP चा दावा

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील नाशिक जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. जिल्ह्यातून ग्रामीणच्या १२ जागांसाठी ४४, तर शहराच्या तीन जागासांठी १६ अशा ६० इच्छुकांनी बुधवारी मुलाखती दिल्या.

भाजपचे शिष्टमंडळ आज राज ठाकरेंना भेटणार

$
0
0
नाशिकचे महापौरपद भाजपला द्यावे, या मागणीसाठी भाजपचे एक शिष्टमंडळ गुरूवारी (२८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे स्थानिक नेते या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.

भूमीहिनांसाठी RPI चे आंदोलन

$
0
0
देशातील रिक्त जमीन भूमीहिन दलितांना वाटप करावी, जमिनीचे राष्ट्रीयकरण करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाने नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले.

१० जणांना कुत्र्याचा चावा

$
0
0
शहरातील विविध भागांमध्ये कुत्र्याने दहा जणांना चावा घेतला आहे. यापैकी पाच घटना मखमलाबाद परिसरात, तर तीन घटना अंबड लिंकरोड परिसरात घडल्या आहेत. याखेरीज जिल्ह्यात ६ जणांना सर्पदंश झाला असून, या सर्वांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

‘भीमज्योत’ ब्रेल लिपीतून

$
0
0
परिवर्तन-क्रांतिगीतांचा आंबेडकरी गीत संग्रह ‘भीमज्योत’ हा पहिल्यादांच ब्रेल लिपीतून प्रसिध्द झाला आहे. वामनदादा कर्डक यांच्या ४३ गीतांचा हा संग्रह लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद दिनकर शेजवळ यांनी संपादित केला आहे.

२४ आमदार, ४ खासदार ‘मौनी’बाबा

$
0
0
आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारावर जाहीरपणे बोलणाऱ्या आणि सभागृहात सतत प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधीही चौकशी समितीपासून लांब असल्याचे चित्र आहे. विभागातील योजनामधील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात गेल्या दहा वर्षांत विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी तारांकित प्रश्न विचारले आहेत.

दाम्पत्याला ३ लाखांना लुटले

$
0
0
कार खरेदीसाठी दाम्पत्याने एचडीएफसी बँकेतून काढलेली तीन लाखांची रोकड एक्झ्युकीटीव्ह म्हणून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरील तिबेटीयन मार्केटजवळ बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

‘एनए’साठी पूर्वपरवानगी नकोच

$
0
0
विकास आराखडा तयार असलेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत जमिनींच्या बिगर शेतीसाठी (एनए) पूर्वपरवानगीची अट रद्द करावी, असा आदेश राज्य सरकारने द‌िला आहे.

गणेशोत्सवातही भारनियमनाचे ‌‌विघ्न

$
0
0
नाशिक परिमंडळातील वीजगळती व थकबाकी असलेल्या काही भागात भारनियमन सुरू असून हे भारनियमन सुरुच रहाणार आहे.

सहा हजार हॉकर्सचा सर्व्हे पूर्ण

$
0
0
शहरातील ६ हजार १३१ हॉकर्सचे बायो मॅट्रीक सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून शहराच्या कानाकोपऱ्यातील हॉकर्सची नोंद पूर्ण होईपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त डी. टी. गोतीसे यांनी दिली.

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे उपोषण

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घंटागाडी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत वर्ग करण्यात यावे, या मागणीसाठी १६ जानेवारीपासून धरणे आंदोलन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांनी गुरूवारी उपोषणाचे हत्यार उपसले.

सिंहस्थ कामांना मंजुरी

$
0
0
सिंहस्थातील सर्व कामे तसेच प्रशासकीय मान्यता मिळालेली पंरतु वर्कऑर्डर अभावी प्रलंबित असलेल्या कामांना आवश्यकतेनुसार मंजुरी देण्यात येईल, अशी भूमिका महापालिकेच्या प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांनी घेतली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images