Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दीड लाख खात्यांचे उद्दिष्ट

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी पंतप्रधान जन धन योजनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी औपचारिक शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी विलास पाटील, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवथापक राजन लोंढे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभांरभ करण्यात आला.

नाशिकरोडला इको फ्रेन्डली गणेश

0
0
सुखकर्त्या-विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी नाशिकरोड व परिसरातील नागरिकांनी केली आहे. जेलरोडवर बिटकोचौकाजवळ छोट्या मोठ्या शंभरावर व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत.

परताव्याच्या आमिषाने फसवणूक

0
0
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात गुंतवणूक केल्यास दरमहा बक्कळ पैसे देऊ, असे आमिष दाखवून एकाला १५ लाख रुपयांना फसविण्यात आले. सारडा सर्कल जवळील आर. के. इन्वेस्टमेंट या कंपनीवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चला रे, गणेश आणू घरा!

0
0
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात शुक्रवारी गणेशाचे घरोघर आगमन होणार असून, घरातील सजावटी बरोबरच बहुतांश सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

पुन्हा तीन लाखांची रोकड लंपास

0
0
चोरट्यांवर पोलिसांचा वचक राहिलाय की नाही, असा प्रश्न कुणीही उपस्थित करावा, अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे. गुरूवारी पुन्हा एकदा पैशांनी भरलेली बॅग पळविण्याची घटना घडली असून, एका व्यापाऱ्याने ३ लाखांची रोकड गमावली आहे.

राज यांनी उडवली टर

0
0
स्थायी समितीचे सभापतीपद हुकल्यानंतर आता महापौरपद पदरात पाडण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी धडपड सुरू केली असून, बुधवारी भाजपच्या पदाधिकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली.

महापौर निवडणुकीला आदेशाची प्रतीक्षा

0
0
महापौरपदांसाठी आरक्षण काढून नामनिराळे झालेले राज्य सरकार पुढील प्रक्रिया राबवण्याचे आदेश कधी देणार याची प्रतीक्षा महापालिका प्रशासनाला लागली आहे. महापौरपदाची निवडणूक १४ ऑगस्टपर्यंत घेणे गरजेचे असल्याने आजपर्यंत (दि. ३०) सरकारचे लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत.

निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची जमवाजमव

0
0
विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनही निवडणूक तयारीच्या कामाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

मोटरसायकस्वारास लुटले

0
0
मोटरसायकलस्वाराला लाथ मारून खाली पाडत चोरट्यांनी १३ हजारांची रोकड हिसकावून नेली. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कॉलेजरोड सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. वाहनचालकांना जखमी करून ऐवज लुटण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने पैसे घेऊन फिरणेही जोखमीचे ठरू लागले आहे.

नाशिकरोडला पावणेदोन लाखांची घरफोडी

0
0
शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून, शुक्रवारी या मालिकेत नाशिकरोड जोडले गेले. या भागात भरदिवसा पावणेदोन लाखांची घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नेहा श्रीकृष्ण तनखीवाले (५२, गार्डन इस्टेट, के. जे. मेहता शाळेजवळ) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विघ्नहर्त्याच्या स्वागतालाच ‘विघ्न’

0
0
गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना अखंडित वीजपुरवठा केला जाईल, असा महावितरणने केलेला दा‍वा शुक्रवारी फोल ठरला. गणेश स्थापनेच्या पहिल्याच दिवशी शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

CBSE व‌िद्यार्थ्यांना संस्कृतचे ऑप्शन

0
0
केंद्रीय माध्यम‌िक श‌िक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) कन‌िष्ठ महाव‌िद्यालयीन स्तरावर व‌िद्यार्थ्यांना पुढील शैक्षण‌िक वर्षापासून आता संस्कृतचेही ऑप्शन खुले होणार आहे. सीबीएसईच्या कन‌िष्ठ महाव‌िद्यालयीन स्तरावर आजवर व‌िद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचा पर्याय नव्हता.

ठेकेदाराविना जनावरे ‘मोकाट’

0
0
मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा निर्णय चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. ठेकेदाराने काम थांबवल्याने रस्त्यांवर मोकाट जनावरे ठिय्या मांडत आहेत.

शहरात मोबाईल चोरांचे पेव

0
0
शहरात जबरी चोऱ्यांच्या घटनांनी पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आणली असताना मोबाईल चोऱ्यांचेही पेव फुटले आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीचा फायदा घेऊन चोरटे सक्रिय झाले असून हातोहात अनेकांचे मोबाईल लांबविले जात आहेत. त्यामुळे तक्रारदारांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच मनस्तापाच सहन करावा लागत आहे.

नाशिकरोडला मटका पुन्हा जोरात

0
0
नाशिकरोड परिसरात मटका व अन्य अवैध धंदे पुन्हा एकदा जोरात सुरू असून, त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. पोलिस ठाण्यांपासून जवळच मटक्याचे अड्डे सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गौरी गणपतीसाठी दोन वेळ पाणी?

0
0
सत्ताधाऱ्यांसह प्रशासनासाठी कळीचा मुद्दा ठरलेला दोन वेळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गौरी गणपतीच्या कालावधीत नागरिकांना दोन वेळ पाण्याची गरज असून महापौरांनी त्वरित याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणीही भाजपाचे गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी केली आहे.

सुरक्षेचे मायक्रो प्लॅनिंग तयार

0
0
गत सिंहस्थ कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थासाठी नाशिक पोलिसांनी सुरक्षा आणि गर्दी नियोजनाचे मायक्रो प्लॅनिंग तयार केले आहे. प्रत्येक पर्वणीला ४० ते ६० लाख भाविकांची संख्या गृहीत धरून हे मायक्रो प्लॅनिंग तयार करण्यात आले आहे.

दिवसातून दोन वेळा पाणी मिळणार

0
0
जून महिना कोरडा गेल्याने नाशिककरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागत होते. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसामुळे ही कपात बंद करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे नाशिकरांना आता दिवसातून दोन वेळा पाणी मिळणार आहे.

गणेश मंडळांना निर्देशांचा ‘प्रसाद’

0
0
गणेशोत्सव आणि आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विषबाधेसारखे प्रकार रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांना निर्देशांचा कडक प्रसाद दिला आहे. महाप्रसाद किंवा भंडारा बनविणाऱ्यांच्या संपर्क क्रमांकासह अन्न पदार्थांचा तपशील जवळ बाळगण्याचे आदेश एफडीएने मंडळांना दिले आहेत.

काँग्रेसचेही दबावतंत्र

0
0
आघाडीचे जागावाटपाचे सूत्र धुडकावत राष्ट्रवादी काँग्रेसने, काँग्रेसच्या जागांवरही इच्छुकांच्या मुलाखती घेत काँग्रेसवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आता काँग्रेसनेही प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images