Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महापौरपदाची निवडणूक १४ सप्टेंबरला?

0
0
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी तारीख व वेळ तसेच, पीठासीन अधिकारी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने अखेर विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. राज्य सरकारचे आदेश अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नसले तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त महापालिका प्रशासनला मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बँकांमधील हालचालींवर पोलिसांचा वॉच

0
0
बॅग स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी शनिवारी पोलिसांनी बँकांमधील नागरिक आणि आणि बँक प‌रिसरात घुटमळणाऱ्या संशयित काही जणांची चौकशी केली. सर्वात महत्वाचे या घटनांमुळे शहरातील रस्त्यांवर पोलिसांची वावर असल्याचे पहावयास मिळाले.

सभापतीपदासाठी मंगळवारी सोडत

0
0
पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या मंगळवारी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये हालचाली गतिमान झाल्या असून मंगळवारच्या सोडतीकडे लक्ष लागले आहे.

नाशिकरोडचे जुने बसस्थानक जमीनदोस्त

0
0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यात येत आहे. जुने बसस्थानक जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहे.

गाडीसह आरोपींच्या मुसक्या आवळल्या

0
0
गावी परतण्यासाठी एका कारमध्ये बसणाऱ्या महिलेचे दागिने लुटल्याची घटना दिंडोरीत घडली असून काही तासांतच पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. कमल राजाराम काळोगे (४२, रा . परमोरी) शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दिंडीरीतील चौफुलीवर थांबल्या होत्या.

रेशन दुकानदारांची राज्यस्तरीय बैठक

0
0
ऑल महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटनेची राज्यस्तरीय बैठक आज (दि. ३१) दुपारी एक वाजता राजेबहाद्दर हॉस्पिटलजवळील हॉटेल कुल पॅलेस येथे होणार आहे. राज्यभरातील रेशन दुकानदारांच्या अडी-अडचणी, अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी यासह विविध विषयावर यावेळी संघटनेचे पदाधिकारी चर्चा करणार आहेत.

संजय पवारांचे तळ्यात मळ्यात

0
0
आमदार पंकज भुजबळ यांना पराभूत करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. शिवसेनेत पुन्हा जाण्याची मानसिकता असली तरीही नांदगावमध्ये तिसरी आघाडी झाल्यास त्या आघाडीसोबत जाऊन उद्दिष्ट साध्य करणार, असे ठाम प्रतिपादन माजी आमदार संजय पवार यांनी नांदगाव येथील निर्धार मेळाव्यात केले.

जिल्ह्यातील ९ धरणे ओव्हरफ्लो

0
0
जिल्ह्यात काही दिवसांपासून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे ९ धरणे शंभर टक्के भरली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये ६४ टक्के साठा झाला आहे. हवामान विभागाने आगामी ४८ तास पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

बॅग लिफ्टिंग फसते तेव्हा!

0
0
विसरण्याची सवय अनेकदा अडचणीत आणत असली तरी ती काहीवेळा फायद्याचीही ठरते. शनिवारी नाशिकरोड येथे याचा प्रत्यय आला. मोटरसायकलच्या डिकीमध्ये विसरलेला पेन घेण्यासाठी एकजण बँकेतून बाहेर पडला अन् बॅगेत मोठे घबाड असल्याच्या शक्यतेने चोरट्यांनी कागदपत्रे असलेली बॅग हिसकावून नेली.

चल यार धक्का मार

0
0
नाशिक शहरातील घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असताना आता घंटागाड्यांचे देखील 'आरोग्य' धोक्यात आले आहे. त्यात निम्म्याहून अधिक घंटागाड्या धक्का मारूनच सुरू कराव्या लागतात.

आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल

0
0
गणपती बाप्पांबद्दल ट्विटरवर अनावश्यक ट्विट करणाऱ्या दिग्दर्शक रामगोपाल वर्मांचा निषेध करण्यासाठी पाथर्डी फाटा येथे मनसैनिकांनी पुतळ्याचे दहन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यभरात गणरायाचे जल्लोषात स्वागत सुरू असताना वर्मा यांनी ते ट्विट केले होते.

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

0
0
जिल्ह्यात रविवारी विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अतिआरामदायी शैली देते आजाराला निमंत्रण

0
0
देशातील वैद्यकशास्त्रापुढे ह्रदयविलकार आणि‌ पॅरालि्सीस या दोन आजारांचे मोठे आव्हान आहे. आगामी वर्षांत भारतातील सुमारे साडेसात लक्ष तरूणांना ह्रदयवि काराचा धोका असल्याचेही जागतिाक आरोग्य विरषयक संस्थांचे निषष्कर्ष आहेत.

महालक्ष्मींच्या स्वागताला सजला ‘गोविंद विडा’

0
0
समृध्दीच्या सोनपावलांनी घरोघरी महालक्ष्मीचे आगमन होणार असून त्यासाठी लागणाऱ्या नाशिकच्या गोविंद विड्याला राज्याच्या विविध भागातून मागणी आहे. वकीलवाडी येथील साईछत्र पान स्टॉलमधून विडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.

कमिशन नको; २५ हजार पगार द्या!

0
0
स्वस्त धान्य तसेच केरोसिनचे वितरण करण्यासाठी सरकारकडून कमिशन दिले जात असले तरी ते तुटपुंजे आहे. सरकारने रेशन दुकानदारांना महिन्याकाठी २५ हजार रुपये पगार द्यावा, असा ठराव रेशन दुकानदारांच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.

महापालिकेवर वक्रदृष्टी कायम

0
0
लोकसभा निवडणुकीदरम्यान लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता मागे घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आतापर्यंत तीन वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात.

नगरसेवक हवालदिलच!

0
0
महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देणार असल्याची आयुक्तांची भूमिका कायम असल्याने नगरसेवक हवालदिल झाले आहेत.

घरपट्टी वसुलीत ४० टक्के वाढ

0
0
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते ऑगस्ट २०१४ पाच महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी वसुलीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बिलांचे वेळेत वाटप, थकबाकीदारांना दोन टक्के दंडाची भीती, थकबाकीदारांविरोधातील कारवाई, विरोधी पक्षांनी उठवलेले रान आणि मिळकतधारकांना ऑनलाईन सारखी मिळालेली सुविधा यामुळे ही वाढ झाली आहे.

नाशिक होणार प. रेल्वेशी कनेक्ट!

0
0
नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेले गुजरात राज्य रेल्वेमार्गाने जोडले जावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इच्छुक आहेत. त्यामुळेच नाशिक ते वघई या रेल्वेमार्गाची मागणी करण्याची सूचना मोदी यांनी दिंडोरी आणि बलसाडच्या भाजप खासदारांना केली आहे.

एचएएलच्या रडार सेक्शनमध्ये आग

0
0
ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ०९९ रडार सेक्शनमध्ये सकाळच्या सुमारास आग लागली. एचएएलचे तीन अग्निशमन बंब आणि पिंपळगाव बसवंत येथील दोन अग्निशमन बंबांच्या आधारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images