Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रहिताचा विसर पडू देऊ नका

$
0
0
‘आपल्याला साध्य करायचे यश हे राष्ट्रासाठी असायला हवे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर राष्ट्रहिताचा विसर पडू देऊ नका,’ असे आवाहन संत पूज्य आसारामजी बापू यांनी केले.

वाचनाने नेतृत्व वाढवावे

$
0
0
वाचनाच्या माध्यमातून कर्तृत्व, नेतृत्त्व वाढले पाहिजे. व्यक्तिमत्त्व संपन्न झाले पाहिजे. आपल्या देशाला महासत्ता बनवायची असेल तर शब्दामागचा विचार नव्या निढीला देणे गरजेचे आहे. त्यासाठी वाचन संस्कृती देऊन नवी पिढी घडवू या, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी केले.

आता दिवसातून एक वेळस पाणी

$
0
0
सिडको, सातपूर आणि पंचवटी भागात पाणीसाठवण क्षमता कमी असल्यामुळे मंगळवारची पाणी कपात डोके दुखी झाली होती. ही बाब ओळखून महापौर अॅड. यतीन वाघ यांनी पाणी कपातीचे फेरनियोजन केले आहे.

'संदर्भ' रूग्णालयात किडनी 'ट्रान्सप्लान्ट' सुविधा

$
0
0
किडनी (मुत्रपिंड) फेल्युअरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यावर किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रात किडनी प्रत्यारोपणाची सुविधा नाशिकमध्ये केवळ दोनच हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे.

मुक्त विद्यापीठ कायदा बदलण्याची प्रक्रिया सुरू

$
0
0
मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पध्दतीमधील नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याची सूचना सरकारतर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला करण्यात आली होती. या कायद्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून याबाबत संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

डीएड कॉलेजना पुढच्या आठवड्यात नोटीस

$
0
0
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) नियमांनुसार सुविधा नसलेल्या राज्यभरातील डीएड कॉलेजना पुढील आठवड्यामध्ये कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार आहे.

इंजिनिअरींग क्लस्टर सौरऊर्जेच्या दिशेने

$
0
0
अंबडमध्ये कार्यरत असलेल्या नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरची वाटचाल ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे होत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून क्लस्टरला लागणारी वीज उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. येत्या मे महिन्यापासून ही सौर वीज क्लस्टरला उपलब्ध होणार आहे.

सोमाणी गार्डनला घरघर दुर्लक्षाची

$
0
0
बच्चे कंपनीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षा संपल्यानंतर सगळीकडे खेळण्या बागडण्याची धूम असेल; परंतु नाशिकरोडच्या बच्चे मंडळींना खेळण्यापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत. शहरातल्या सोमाणी गार्डनला अनेक समस्यांनी ग्रासले असून मुलांनी खेळण्यासाठी जावे कुठे हा एकमेव प्रश्न पालकांना सतावतोय.

‘मुक्त’च्या वाट्याला परंपरा जाते तेव्हा...

$
0
0
बळी देण्यासाठी परंपरा कारण ठरल्याची उदाहरणे वेगळी नाहीत; पण परंपरेचा जेव्हा बुध्दीवाद्यांकडून बळी जातो, तेव्हा ही बाब विशेष ठरते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे नुकताच कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार विख्यात गुजराथी साहित्यीक सीतांशू यशश्चंद्र यांना देण्यात आला.

धाडस करा; उमलत्या कळ्यांना वाचवा

$
0
0
मुलीचा जन्मदर वाढावा, याकरीता राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर तब्बल २६० तक्रारी नोंदविल्या गेल्या. या आधारे झालेल्या कारवाईत ४५ दोषी डॉक्‍टरांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. या हेल्पलाइनवर तक्रारी येणाऱ्या तक्रारदारांमध्ये नाशिकचा क्रमांक तिसरा आहे. ही धक्कादायक बाब असून जिल्हा प्रशासनाला स्त्री भ्रूण हत्येबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे दिसते. खुडल्या जात असलेल्या कळ्या फुलविण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न आहे, पण गरज आहे ती धाडस करण्याची.

१८ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

$
0
0
बागलाण तालुक्यातील मुंगसे येथील राखीव वनक्षेत्रातील अनधिकृत जलवाहिन्या वन विभागाने उखडून टाकल्या आहेत. विनापरवाना अनधिकृत जलवाहिन्या टाकल्याप्रकरणी मुंगसे व पिंपळकोठे ग्रामपंचायतीसह दोन्ही गावांतील १८ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पुढे सपाटीकरण मागे अतिक्रमण

$
0
0
एकिकडे रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेकडून सपाटीकरण मोहिम सुरु असताना दुसरीकडे आयत्या सपाटीकरणामुळे विक्रेत्यांनी आपले स्टॉल मांडण्यास सुरुवात केली आहे. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते डीजीपीनगरला जोडणाऱ्या संत सावतामाळी मार्गावर सुरु असलेला हा प्रकार महापालिकेने त्वरित उधळून लावला नाही तर हे स्टॉल अपघातांना निमंत्रण ठरण्याची शक्यता आहे.

चुलत नात्याची सख्खी गोष्ट

$
0
0
सख्खे भाऊ जिवाला जीव देत नसल्याचे चित्र समाजात असताना चुलतभावाच्या जीवावर आलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी स्वत:ची किडनी देऊन नाशिकरोडच्या बाबुराव यलप्पा चाफळकर यांनी आदर्श निर्माण केला आहे. कुठल्याही अपेक्षाशिवाय त्यांनी केलेल्या किडनी दानातून इतरांनीही आदर्श घ्यायला हवा, अशी अपेक्षा दोघे भाऊ व्यक्त करतात.

दोन अपघातांत तिघांचा मृत्यू

$
0
0
शहर व परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मृतांत पंचवटीतील डॉ. अविनाश आनंदराव चव्हाण यांचा समावेश आहे.

उत्तर महाराष्ट्राला ‘रेल्वे भेट’

$
0
0
तब्बल शतकाहून अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या ‘मनमाड-इंदूर’ आणि गेल्या १६ वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या ‘नाशिक-पुणे’ या दोन्ही रेल्वेमार्गांची घोषणा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी बुधवारी संसेदत केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून होत असलेली उत्तर महाराष्ट्राची उपेक्षा या निर्णयाने दूर झाली आहे.

एक था 'टायगर'

$
0
0
मनसेला सत्ता मिळताच वाहतुकीचा प्रश्न सुटेल, गोदावरी स्वच्छ होईल, रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास येईल अन् सारं काही अलबेल होईल, अशी अपेक्षा बाळगत नाशिककरांनी मनसेला भरभरुन मतदान केलं आणि त्याची फलनिष्पत्ती सत्ताग्रहणात झाली.

'हॉर्टिकल्चर'तर्फे आयोजित स्पर्धांमध्ये शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग

$
0
0
चितेगाव येथील नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या शाखेमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हॉर्टिकल्चर संबंधित वादविवावद, भाषण, रांगोळी, सॅलड प्रीपरेशन, निबंध अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

गरज शहरातील दूषित अन्नाच्या पाहणीची

$
0
0
चायनीज पदार्थ, भेळीसारख्या पदार्थातून हेपिटायटीस-ईचा भयानक विषाणू हल्ला चढविण्याचा धोका निर्माण झाला असल्याची धक्कादायक माहितीचा अहवाल मुंबई पालिकेच्या आरोग्य समितीने मुंबईतील चायनीज स्टॉलवरील पदार्थांच्या पहाणीतून नुकताच मांडला होता.

तोतया पोलिसांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

$
0
0
चेन स्नॅचिंगच्या घटना डोकेदुखी ठरत असतानाच तोतया पोलिसांनी डोके वर काढत बुधवारी दिवसभरात तीन ठिकाणी चोऱ्या केल्या. त्यांनी २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी भद्रकाली, अंबड आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा निकालाची

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या इंजिनिअरींगच्या सेकंड इयर मधील फर्स्ट सेमिस्टरचा निकाल अद्यापही न लागल्याने विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. परीक्षा विभागाच्या या ढिसाळपणाबद्दल विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images