Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘लायसन्स’ साठी ऑनलाइन अपॉइंटमेंट

$
0
0
लर्निंग लायसन्ससाठी तासनतास रांगेत उभे राहण्याच्या आणि हेलपाटे मारण्याच्या कटकटीपासून नागरिकांची आता सुटका होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून त्यासाठी घरबसल्या अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.

ठाम भूमिकेअभावी भाजपची फरफट

$
0
0
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक १२ तारखेला होत असल्याने राजकीय वातावरण चांगले तापले आहे. महापौरपद मिळविण्यासाठी राजकीय पक्ष पदाधिकारी आपल्या पातळीवर फिल्डिंग लावत आहेत.

उद्योजकांकडून तक्रारींचा पाऊस

$
0
0
महापौरांच्या दालनात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांनी महापालिकेच्या कामकाजाविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला.

LICची महिन्याभरात एसएमएस सेवा

$
0
0
पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी पोस्टाच्यावतीने पाठविण्यात येणारी रिसीट मिळत नसल्याने हैराण झालेल्या पॉलिसीधारकांना भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

उ. महाराष्ट्रात ५१ किलो खवा जप्त

$
0
0
गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळयुक्त खव्याविषयीची विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत अवघ्या दोन-तीन दिवसातच एफडीएने उत्तर महाराष्ट्र ५१ किलो खवा जप्त केला असून अनेक ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

सेंट फ्रान्सिस शाळेला इशारा

$
0
0
बेकायदेशीर फी वसुलीपोटी विाद्यार्थ्यांचे नि काल हेतूपुररस्सर अडविरणे आणि विचद्यार्थी, पालकांवर दबाव निशर्माण करण्याचे अधियकार शाळेला नसल्याचे सांगत फी वाढ रद्द करण्याचे आदेश मनपा प्रशासनाधि काऱ्यांनी सेंट फ्रान्सि‌स शाळेला दिले आहेत.

नाशिककरांच्या प्रेमामुळे भारावले

$
0
0
‘नाशिककरांबरोबर बाप्पांची आरती करण्याची संधी मिळाल्याने मी भारावले आहे. नाशिकच्या प्रेक्षकांचं असचं प्रेम मिळत रहावं’ असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र टाइम्स’ प्रस्तुत आरती विथ सेलिब्रिटी या उपक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांनी केले.

कलाविष्काराची दिग्गजांना साद !

$
0
0
रांगोळीसारख्या कलावि.ष्काराच्या माध्यमातून साकारलेली व्यक्तिन‌चिरत्रही जेव्हा जिंवंत भासू लागतात, तेव्हा ती केवळ कला राहत नाहीत. त्या कलेला परिसाचा स्पर्श होतो.

भाजपमध्ये संभ्रमावस्था

$
0
0
महापौरपदाची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी मनसे, भाजप व युतीसह आघाडी आणि शिवसेनेने आपआपल्या नगरसेवकांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे.

कुशल मनुष्यबळ; महिंद्राचा पुढाकार

$
0
0
ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा उद्योग समुहाने या क्षेत्राला आवश्यक असलेला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिकसह एकूण १० शहरांमध्ये महिंद्राने ट्रेनिंग सेंटर सुरु केले असून, याद्वारे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

लाखो विद्यार्थी ऐकणार मोदींचे भाषण

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकदिनानिमित्ताने (५ सप्टेंबर) करणार असलेले भाषण नाशिक विभागातील २८ लाख विद्यार्थ्यांना एकता यावे यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

केंद्र समन्वयकांची अखेर हकालपट्टी

$
0
0
नाशिक महापालिाकेच्या शिक्षण मंडळातील शाळेंमध्ये मागील दाराने भरण्यात आलेल्या २४ केंद्र समन्वयकांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात अनेक दिवसांपासून एकाच शाळेवर हे केंद्र समन्वयक कार्यरत होते.

आपत्ती व्यवस्थापनात असमन्वय

$
0
0
गोदावरीला २००८ सारखा पुन्हा पूर येणार आहे. तत्काळ घरे सोडा, अशा प्रकारचा संदेश नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास देवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.

‘मुख्यमंत्री दडपणाखाली’

$
0
0
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्यात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत होणार असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वतःच दडणपणाखाली आहेत. त्यामुळे नैराशातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केल्याची टीका केंद्रीय अन्न व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

नाशिककर तापाने फणफणले

$
0
0
पाऊस आणि थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे शहरात साथीच्या आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत शहरातील सुमारे दोन हजार जण तापाने फणफणले आहेत.

तिघा लेकरांसह स्वतःलाही संपविले

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील जांबूटके येथील एका शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून दोन मुली व एका मुलासह स्वतःलाही संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलांना मॅक्झिमो गाडीतून गणपती पाहायला म्हणून घेवून जातो, असे सांगत त्याने गाडी पेठ रस्त्यालगतच्या रासेगाव शिवारातील एका तलावात टाकून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव

$
0
0
महापौरपदाची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी मनसे, भाजप व युतीसह आघाडी आणि शिवसेनेने आपआपल्या नगरसेवकांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे.

महिला पथके अन् कवायतींची परंपरा

$
0
0
सोमवार पेठेतल्या गुलालवाडी व्यायामशाळेने सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा १९२५ साली केला. श्रीधर उद्धव गायधनी यांचा त्यात पुढाकार होता. या व्यायामशाळेचे सत्व असे की नाशिकच्या गणेशोत्सवाचे एक झळाळते वैशिष्टे म्हणून गुलालवाडीच्या लेझीम पथकाचा उल्लेख केला जातो. तीन ते तेरा वर्ष वयोगटातील विद्यार्थी या पथकात सामील असतात.

...तर शिक्षक होतील इम्प्रेस

$
0
0
शाळा, कॉलेजांबाहेर आज शिक्षक दिन असल्यानं फुले आणि गुच्छ दिसतीलच. तुम्हीही आपल्या शिक्षकांना असंच काहीसं देण्याच्या विचारात असाल, तर थोड थांबा. फुलांच्या पलीकडे जाऊन विविध प्रकारच्या भेटवस्तू तुमच्या शिक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत. त्यावर टाकू या एक नजर...

पौरोहित्यातही महिलाराज

$
0
0
कोणतंही धार्मिक कार्य करायचं असेल तर त्याचे पौरोहित्य करण्याची जबाबदारी पुरुषांचीच असे चित्र आजही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. पण नाशिकमध्ये मात्र काही महिला या वेगळ्या वाटेवरुन चालताना आपल्याला पाहायला मिळतील.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images