Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘अपूर्व सूर मल्हार २०१४’

$
0
0
तालुका स्तरापासून सुरू झालेल्या अपूर्व सूर मल्हार स्पर्धा यावर्षी उत्तर महारष्ट्र स्तरावर घेण्यात आली. वयवर्ष ५ पासून ते वयाची सत्तरी गाठलेल्या हौशी कलाकारांनी उस्त्फूर्तपणे सहभाग घेत स्पर्धेत रंग भरला.

नोटिसांना केराची टोपली

$
0
0
सुमारे १० लाख रुपयांची स्टेशनरी, शेकडो कर्मचाऱ्यांचे श्रम आणि अधिकाऱ्यांनी नियोजन करून धाडलेल्या ११ हजार ९२४ नोटिसांना व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची अडचण होत आहे.

मोदक माझा चविष्ट

$
0
0
बाप्पाला आवडणारा मोदक आपल्याही आवडीचा पदार्थ. गणपतीच्या विविध रुपांप्रमाणे विविध प्रकारचे मोदक बनवण्याच्या पद्धतीही तशाच. प्रत्येकजण आपल्या आवडीने आणि पद्धतीने हे मोदक बनवतो.

नियम पाळा वाहतूक कोंडी टाळा

$
0
0
लाडक्या विघ्नहर्त्याला सोमवारी भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी शहरातील विविध मार्गांवरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

भाजपाचा सोमवारी फैसला

$
0
0
महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मनसेची साथ कायम ठेवायची की पारंपरिक मित्रपक्ष शिवसेनेला जवळ करायचे याबाबत भाजपचा निर्णय ८ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

KBCठेवीदारांचा मोर्चाचा इशारा

$
0
0
केबीसीतील गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याऐवजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. या विरोधात १० सप्टेंबरला दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार असून, दुपारी चारपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास मुंबईतील राजभवनापर्यंत महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा केबीसी ठेवीदार संघर्ष कृती समितीने दिला आहे.

विद्यार्थी बनले शिक्षक

$
0
0
शिदक्षक दिशनाच्या नि्मिकत्ताने शहरातील विशविपध शाळा आणिे शैक्षणिरक संस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या नियमिहत्त वितवि ध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. वि्द्यार्थ्यांनी या उपक्रमांना प्रति.साद ‌दििला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाची तसेच मुख्याध्यापकांची भूमिका पार पाडली.

डीपीला हार घालून गांधीगिरी

$
0
0
नाशिकरोड परिसरातील उघड्या डीपींकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेने शनिवारी डीपीला हार घालून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले.

सेस निधीचे कामे थांबवा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या २१ मे च्या सर्वसाधारण सभेत झालेले चार ठराव विधीसंमत आहेत काय, अशी विचारणा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सीईओ सुखदेव बनकर यांना केली आहे.

हेम्पेल पेंट प्रकल्पाचा विस्तार

$
0
0
जगप्रसिद्ध डॅनिश कंपनी हेम्पेलने सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील पेंटिंग कलरचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार किमान २५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे या प्रकल्पात उत्पादित होणारे रंग संपूर्ण दक्षिण आशियात विक्री करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

नाशिकरोडला शोभायात्रा

$
0
0
पर्यूषण पर्व समाप्तीनिमित्त नाशिकरोड जैन श्रावकसंघातर्फे आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये जिल्हाभरातील जैन भाविक सहभागी झाले होते.

निर्विघ्नं कुरुमें देवं

$
0
0
विघ्नहर्त्याच्या उत्सव निर्विघ्न पार पडला. पोलिसांनी बांधलेली नियोजनबध्द बंदोबस्ताची पुजा फलदायी ठरली. या उत्सवाला गालबोट लागेल अशी कुठलीही घटना गेल्या १० दिवसांत शहरात घडली नाही.

पंतप्रधानांचे भाषण अन् शिक्षकांचे प्रश्न

$
0
0
शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एक दिवस पाळला जावा, ही आपले दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची इच्छा प्रत्यक्षात यावी यासाठी त्यांचा वाढदिवस पाच सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

शेततळ्यामुळे सुटला पाणीप्रश्न

$
0
0
वॉटर बँकिंग संकल्पनेच्या धर्तीवर तालुक्यातील उत्राणे येथील जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांनी शासनाच्या मदतीबरोबरच स्वखर्चातून ग्रामपंचायतीला वरदान ठरणारे शेततळे निर्माण केले आहे.

सभापतीपदी अहिल्याबाई माळी?

$
0
0
बागलाण पंचायत समितीच्या दि. १४ सप्टेंबर रोजी होत असलेल्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या अहिल्याबाई माळी यांचा मार्ग सुकर मानला जात आहे. बागलाण पंचायत समितीत १४ सदस्य संख्या आहे.

खतांची मागणी अन् साठेबाजारही वाढला

$
0
0
यंदा पावसाचे उशिरा आगमन झाल्याने खरीप हंगाम पेरणीदेखील उशिरानेच झाली. त्यात गेल्या काही दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांची स्थिती समाधानकारक झाली असून, शेतकरी बांधवांकडून पीकवाढीसाठी खतांची मागणी वाढली आहे.

‘जिकडे जाईल तिकडे विजय निश्चित’

$
0
0
राष्ट्रवादीने माझा फोटो टाकणे बंद केले आहे. २५ - ३० हजार हक्काचे मतदार माझ्याशी संबंधीत असून, मी जिकडे जाईल तिकडे यश निश्चित मिळणार, असा विश्वास म्हाडाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केले.

नाशिकरोड बँकेचा ११ टक्के लाभांश

$
0
0
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेने सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करतानाच व्यावसायिकांना एक लाखापर्यंत विनातारण कर्ज देण्याची घोषणाही केली. बँकेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी बँकेच्या इंगळेनगरच्या सभागृहात झाली.

खड्डेमय रस्त्याला मलमपट्टी

$
0
0
पावसामुळे त्र्यंबकनाका ते सातपूर रस्ता खड्डे माझ्याने सातपूरकर हैराण झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले असले तरी रस्त्यांची चाळण झाल्याने त्र्यंबकनाका ते सातपूर रस्ता मॉडेल करण्याचे काय झाले.

‘आधार’ ९० टक्क्यांच्या घरात

$
0
0
यूपीए सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाणारी आधार (युनिक आयडेंटिटी) कार्डाची नोंदणी ९०.१८ टक्के इतकी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच या योजनेला अभय देण्याचा निर्णय घेतला असून, महापालिका हद्दीत १०० टक्के काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images