Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इच्छुकांनी साधली प्रमोशनची संधी

0
0
विधानसभा निवडणुका तोडांवर असल्याने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपल्या प्रमोशनची एकही संधी सध्या सोडत नसल्याचे चित्र आहे. प्रमोशनसाठी अनोखे फंडे आजमावणाऱ्या या इच्छुकांनी गणेशोत्सवातही त्याचा पुरेपूर लाभ घेतला आहे.

पवन क्षीरसागरसह ५ जणांवर गुन्हा

0
0
किरकोळ कारणावरून तरुणाची गाडी अडवून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, याच प्रकरणात धारदार हत्याराने वार केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पितृपक्षाला प्रारंभ; बाजार थंडावणार

0
0
गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही बाजारपेठेवर परिणाम होणार असला तरी जमिनीचे व्यवहार जोरात सुरू आहेत. शहरातल्या सराफ बाजार व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची ग्राहकांनी बुकिंग करून ठेवली आहे.

दूषित पाण्यामुळे तीनशेजण रुग्णालयात

0
0
बागलाण तालुक्यातील निकवेल येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून दूष‌ित पाणी पिण्यात आल्याने मंगळवारी सुमारे तीनशे ग्रामस्थांना गॅस्ट्रोची (अतिसार) लागण झाली आहे. या सर्व रूग्णांना डांगसौदाणे, केळझर, कपालेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महापौरांची कर्मचाऱ्यांना ‘मनसे’भेट

0
0
महापौरपद निवडणुकीच्या ऐन धामधुमीत महापौर अॅड. यतीन वाघ यांनी पदउतार होण्यापूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना १३ हजार १११ रूपयांचा घसघशीत बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर करून सुखद धक्का दिला.

... तर, स्वबळावर लढणार

0
0
कांदा उत्पादकांवरील अन्यायाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कांद्राप्रश्नी वेळ आली तर, आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

महापालिकेत MNS-NCP एकत्र?

0
0
महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने मनसेपासून काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्थायी समिती निवडणुकीत निर्माण झालेल्या वादानंतर भाजप आपल्याला एकटे पाडणार अशी शक्यता गृहीत पकडून मनसेनहीे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी घरोबा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

माझी चौकशी करा

0
0
लाचलुचपत विरोधी विभागामार्फत माझी चौकशी सुरू असल्याबाबत स्वतः अनभिज्ञ आहे. अशी काही चौकशी सुरू असेल तर, आपण त्यास सामोरे जाण्यास तयार आहोत, असे आमदार माणिकरावर कोकाटे यांनी म्हटले आहे.

अखेर काडीमोड!

0
0
अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर घरोबा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने मंगळवारी मनसेपासून काडीमोड घेतला. त्यानंतर शिवसेनेत चैतन्य भरल्याचे चित्र महापालिकेत दिसून आले.

गोदावरीचा पूर ओसरला

0
0
सोमवारच्या जोरदार पावसाने गोदावरीला आलेला मोठा पूर आता हळूहळू ओसरत असला तरी आगामी २४ तास जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे गोदाकाठी पूरस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत.

पावणेतीन लाख मूर्तींचे संकलन

0
0
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिका व विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी उदंड प्रतिसाद दिला. सोमवारी दिवसभरात जवळपास २ लाख ६२ हजार गणेशमूर्ती, तर १२० टन निर्माल्य संकलित झाले.

अरे रे, राजू शेट्टी, हे काय करताय ?

0
0
गेल्या अनेक दशकांपासून कांदाच नव्हे, तर साऱ्या शेतमाल भावाचा प्रश्न अनेक पक्षांची सरकारे आली व गेली तरी तसाच ढिम्म आहे.

कळवण तालुक्यात बहरली झेंडूची शेती

0
0
नुकताच संपलेला गणेशोत्सव व येऊ घातलेले नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी सणासाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पारंपरिक शेतीसोबतच नवनिर्मितीचा ध्यास घेत कळवणसारख्या आदिवासी तालुक्यात झेंडू शेती बहरत आहे.

मनमाडच्या रामगुळणा नदीवर बंधारा बांधण्यास सुरुवात

0
0
मनमाडच्या रामगुळणा नदीवर सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्याची जबाबदारी लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड या संस्थेने उचलली आहे. महिन्याभरात हा बंधारा मनमाडकरांना सुपुर्द करण्यात येईल, अशी ग्वाही लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइडचे अध्यक्ष हेमराज दुगड यांनी दिली.

सटाण्यात दुकानदाराला ५८ हजाराला लुटले

0
0
शहरातील ताहाराबाद रोडवरील नमस्ते सुपारी सेंटर या दुकानातून अज्ञात व्यक्तिने भीक मागण्याच्या बहाण्याने सुमारे ५८ हजार रुपये रोखरक्कम असलेली बॅग पळविल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

विंधन विहिरीतून निकवेलला पाणीपुरवठा

0
0
बागलाण तालुक्यातील निकवेल येथे अतिसाराची लागण झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी निकवेल ग्रामस्थांना करण्यात येणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील पाणी वितरण बंद करण्यात आले आहे.

चणकापूर, पुनद ओव्हरफ्लो

0
0
कळवण तालुक्यात सातत्याने पावसाची संततधार सुरू असून पुनद, चणकापूर इतर छोटे मोठे धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबरपर्यंत चणकापूर धरण लाभशेत्रात ५०१ मि. मी. पाऊस झाला होता.

पुराने मोसम नदी झाली स्वच्छ

0
0
हरणबारी व चणकापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवार व सोमवारी पावसाचा जोर टिकून होता. यामुळे शहरालगतच्या गिरणा-मोसम नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

चांदशी शिवारात भराव खचला

0
0
नाशिक शहर व परिसरात गेले दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. संतत धारेमुळे चांदशी शिवारातील खाजगी विकासकाच्या जागेतील मातीचा भराव खचल्याने रस्ता चिखलमय झाला होता. मातीचा भराव नदीत वाहून आल्याने संरक्षक भिंतही खचली होती.

ऐन पावसाळ्यात मिळेना पिण्याचे पाणी

0
0
धो-धो पाऊस पडतो आहे. धरणेही तुडूंब भरलेली आहेत. मात्र, तरीही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. होय, ही व्यथा आहे सातपूर गावातील नागरिकांची. गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याचे पुरेसे पाणीच मिळत नसल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images