Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कळवणचे कांदा मार्केट चिखलमय

0
0
कळवण कृषी उत्त्पन बाजार समितीच्या कांदा लिलाव मार्केट परिसरात पावसामुळे चिखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे माल वाहतुकीसाठी हाल होत आहेत. चिखलामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, लिलावसाठी चिखल तुडवत जावे लागत आहे.

‘विवरणपत्रे अपलोड करा, अन्यथा कारवाई’

0
0
येवला तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांनी ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७९ (१ अ) व कलम ७९ (१ ब) अन्वये झालेल्या नवीन तरतुदीनुसार नमूद केलेली विवरणपत्रे संस्थेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या स्तरावर ३० सप्टेंबरपर्यंत अपलोड करावीत.

गणेशभक्तांची सुरक्षा होती रामभरोसेच

0
0
दरवर्षी गणेशोत्सवाला वाढता प्रतिसाद व ‌विसर्जन मिरवणुकीत वाढती गर्दी लक्षात घेवूनही महापालिका प्रशासन गणेशभक्तांच्या सुरक्षेबाबत उदासीन दिसून आले.

ठेकेदारांसाठी सदस्यांची ‘अर्थपूर्ण’ धावाधाव

0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या कारभाराविरोधात उघडउघड बंड पुकारणारे उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनीही अध्यक्षांनी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा बळी

0
0
पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण १५ जणांचा नैसर्गिक आपत्तीतून बळी गेला आहे. यातील सहा जणांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत देण्यात आली असून दोघांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

मनसे, काँग्रेसला फटका; सेनेचा वाढला टक्का

0
0
भाजपने साथ सोडल्यानंतर महापौरपदासाठी एक एका नगरसेवकाची जमवाजमव सुरू असतानाच मनसेच्या दोन नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे नाशिकरोडचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

जातपंचायत बरखास्त, महिला समितीचा सक्षम पर्याय!

0
0
जातपंचायतीच्या सक्तीने आद‌िवासी कुटुंबांचे जीवन त्रस्त करणाऱ्या व्यवस्थेव‌िरोधात बंड पुकारत नाश‌िकच्या अंध‌श्रध्दा न‌िर्मूलन सम‌ितीच्या कार्यकर्त्यांन‌ी प‌ीड‌ीत कुटुंबास न्याय म‌िळवून द‌िला आहे.

‘सिम्युलेशन’साठी तत्काळ माहिती द्या

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतूक आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सिम्युलेशन मॉडेलसाठी लागणारी माहिती सर्व विभागांनी तातडीने द्यावी, असे निर्देश मेळा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.

शिर्डी `सी प्लेन`चे नाशिकला ओव्हरटेक

0
0
नाशिकमधील गंगापूर धरणातून सी प्लेनची सेवा सुरु होण्याची मोठी उत्कंठा असताना नगर जिल्ह्यातील मुळा धरणात सेवेची घोषणा करुन एमटीडीसी आणि मेहेरने नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विविध परवानग्या रखडल्यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूरच्या सेवेने नाशिकला ओव्हरटेक केल्याचे स्पष्ट होत आहे.

गायकर, कदम यांच्यावर खंडणीचा गुन्हा

0
0
एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पैशांच्या वसुलीसाठी ब्लॅकमेलिंग करू पाहणाऱ्या, दोघा संशयितांव‌िरोधात उपनगर पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PM मोदींनी दिली पोचपावती

0
0
नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि त्यानंतर पंतप्रधानपदी झालेली निवड याबद्दल अभिनंदन करण्यासाठी नाशिकमधील संध्या वैद्य यांनी पाठवलेल्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त करणारे उत्तर दिले आहे.

बिहारहून येणार मतदान यंत्रे

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्तराखंडहून ६१०० बॅलट युनिट आणि ४९०० कंट्रोल युनिट मागविल्यानंतर आता बिहारमधून ४५०० मतदान यंत्रे आणण्यासाठी टिम रवाना झाली आहे. तर, उत्तर प्रदेशातून २१६५ व्हीव्हीपॅटची मशिन्स आणली जाणार आहेत.

जम्मूत कुणी अडकलंय?

0
0
जम्मू-काश्मिरमधील पुरात राज्यातील काही नागरिक अडकले आहेत का, याची माहिती संकलित करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यातील काही व्यक्ती अडकले असतील तर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

MNSचे भवितव्य NCP च्या ‘हाता’त

0
0
नाशिकच्या महापौर पदाची निवडणूक अवघ्या काही तासांवर येवून ठेपली असतानाही महापौराबाबतची अनिश्चितता कायम आहे. भाजपने साथ सोडल्यानंतरही मनसेने आपलाच महापौर होणार असा दावा कायम ठेवल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस व अपक्ष आघाडी किंगमेकर ठरणार अशी चिन्हे आहेत.

प्रशासकीय इमारतीला गळती

0
0
एकाच छताखाली कमी वेळेत कामे व्हावीत, यासाठी आदिवासी उपाययोजनेतून कळवण येथे येवल्याच्या धर्तीवर ८ कोटी ७६ लक्ष रुपये खर्च करून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. मात्र, कार्यालये सुरू होण्याच्या आतच पहिल्याच पावसाळ्यात या इमारतीला गळती लागली आहे.

‘द बँड्स व्हिजीट’ची नाशिककरांना मेजवानी

0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय कार्यालय, दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवारी (१३ सप्टेंबर) संध्याकाळी सहा वाजता दिग्दर्शक एरान कोलीरीन यांचा ‘द बँड्स व्हिजीट’ हा हिंदी चित्रपट दाखविला जाणार आहे.

शाल्मलीची झेप ‘बुध्दिबळा’वर

0
0
एकीकडे मेडिकलचे शिक्षण आणि दुसरीकडे बुध्दिबळाची पॅशन अशी दुहेरी आवड सांभाळणारी शाल्मली गागरे नाशिककरांसाठी अभिमान ठरली आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे डेंटल कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या शाल्मलीची ‘वर्ल्ड ज्युनियर युथ ऑलिम्पियाड बुध्दिबळ स्पर्धे’साठी भारतीय संघात निवड झाली आहे.

नगरसेवक सहलीवर, नाशिककर खड्ड्यात

0
0
महापालिकेने शहरातील खड्डे बुजवल्याचा दावा केला असला तरी शहरातील अनेक भागात अद्यापही खड्ड्यांचे साम्राज्य असून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. ना‌शिककरांना रस्ता शोधावा लागत असल्याने शहराची अवस्था अजूनही खड्डेमयच आहे.

ज्ञानदीप पुरस्कार जाहीर

0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शिक्षण, समाजकार्य, कथा-कविता लेखन या क्षेत्रात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

डाळिंबानं आणलंय डोळ्यांत पाणी

0
0
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले डाळिंबाचे पीक आता रोगराई व खराब हवामानामुळे धोक्यात आले आहे. त्यातच डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडून चिंताग्रस्त झाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images