Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कांदा आगारात कृषीमंत्र्यांचा निषेध

$
0
0
कांद्याचे भाव वाढू देणार नाही, हे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांचे विधान म्हणजे आर्थिक कोंडीत सापडलेल्या कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असून, केंद्राच्या कांदा विषयक धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत असल्याचा आरोप नाफेडचे संचालक तथा लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी केला आहे.

पुणेगावचे पाणी पेटणार?

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड व तीसगाव धरणे भरलेली नसताना पुणेगाव धरणातून डाव्या कालव्याच्या चाचणीसाठी सोडलेले पाणी त्वरित बंद करावे यासाठी आमदार धनराज महाले यांनी गेट बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाने पाणी बंद केले आहे.

असंगाशी संग...

$
0
0
‘पुणे पॅटर्न’, ‘स्थानिक निर्णय’, ‘वरिष्ठांचा आदेश’, अशा गोंडस नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याची अहमहमिका नाशिक महापालिकेतील पक्षांमध्ये लागली आहे.

आरोग्य शिक्षणात द्या दर्जाला प्राधान्य

$
0
0
नव्या महाव‌िद्यालयासाठी प्रस्ताव सादर करते वेळीच सर्व अटी व नियमांची पूर्तता करणाऱ्या संस्थांनाच परवानगी देण्यात येईल, अशी भूम‌िका महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाने घेतली आहे. आरोग्य श‌िक्षणाच्या अभ्यासक्रमात दर्जाशी तडजोड केली जाणार नाही, अशीही भूम‌िका विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. अरुण जामकर घेतली.

अन् जवानाच्या पत्नीला मिळाला न्याय

$
0
0
भ्रष्टाचारात बरबटलेल्या सरकारी बाबूच्या लालफितीशाहीचा फटका नाशिक जिल्ह्यात समायोजनेवर बदली झालेल्या लष्करी जवानाच्या शिक्षक पत्नीलाही बसला आहे.

इं‌जिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिलासा

$
0
0
शैक्षण‌िक वर्ष २०१३-१४ मध्ये नव्याने सुरू झालेल्या अभ‌ियांत्र‌िकी महाव‌िद्यालय आण‌ि तंत्रन‌िकेतांमध्ये मागासवर्गीय व‌िद्यार्थ्यांना फीचा परतावा देण्यात यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला द‌िले आहेत. राज्यभरातील इंज‌िनीअरिंगच्या सुमारे ७ हजार व‌िद्यार्थ्यांना या न‌िर्णयाचा फायदा होणार आहे.

पंकजा मुंडेंची संघर्ष यात्रा आज नाशकात

$
0
0
आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलेली भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांची संघर्षयात्रा शुक्रवारी (ता. १२) नाशिकमध्ये येत आहे. पक्षातर्फे चांदवड, लासलगाव आणि नाशिकमध्ये सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

साधू आले, आयुक्त राहिले!

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येकी एका साधू-महंतांना स्थान देण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. मात्र, या समितीत नाशिक पोलिस आयुक्तांचा प्रवेश अजूनही दूरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

जम्मूत जिल्ह्यातील ५ जण अडकले

$
0
0
जम्मू-काश्मिर येथील महाकाय पूरस्थितीत नाशिक जिल्ह्यातील पाच जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन जण नाशिक शहरातील तर दोन जण मालेगाव येथील आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे या पाचही जणांच्या नातेवाईकांनी तक्रार केली आहे.

झेडपी उपाध्यक्षांना २५ लाखांचे आमिष

$
0
0
जिल्हा परिषदेततील निधी नियोजनाच्या वादाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. निधी नियोजनातील गोंधळाविरोधात आवाज उठविणारे उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना २५ लाखांचे अामिष दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.

मेडिकल ग्रॅन्टस् कमिशनवर चर्चा

$
0
0
आरोग्य विज्ञान विद्यापीठांसाठी स्वतंत्र मेडिकल ग्रॅन्टस कमिशन स्थापन करण्यात यावे, या मुद्द्यावर आरोग्य विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माह‌िती आरोग्य विज्ञान विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

व‌िद्यार्थ्याला मारहाण

$
0
0
वर्गामध्ये हजेरी सुरू असताना रोल नंबर पुकारूनही प्रत‌िसाद न द‌िल्याचा राग येऊन व‌िद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. व‌िद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याने गंगापूर पोल‌िस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्णय वरिष्ठच घेणार

$
0
0
बहुमताच्या त्रांगड्यात सत्तेचे गणित जमवून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आल्यास महायुतीचा पराभव निश्च‌ित मानला जात आहे.

ससूनमध्ये आरोपींची तोडफोड

$
0
0
ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलेल्या चौघा आरोपींनी वार्ड नंबरमध्ये ४० मध्ये तोडफोड केल्याचा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विद्यापीठांनाही हवा UGC

$
0
0
देशातील पारंपरिक विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासाठी अनुदान देण्यासाठी स्थापलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) धर्तीवर आता आरोग्य विज्ञान विद्यापीठांना देखील स्वतंत्र अनुदान आयोग स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

पालिकेत भरतीचा मार्ग मोकळा

$
0
0
महापालिकेत नव्याने केल्या जाणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेत ३ हजार ८७७ पदांवर नव्याने भरती करण्याचा अध्यादेश गुरुवारी राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे.

विकासासाठी संघटना एकवटणार

$
0
0
नाशिकच्या विकासात असलेले अडथळे दूर करण्यासाठी शहरातील संघटना एकत्र आल्या असून यापुढे संघटीतपणे काम करण्याचा निर्धार या संघटनांच्या अध्यक्षांनी ‘मटा राऊंड टेबल’मध्ये केला.

पतंगरावांना भुजबळांचा टोला

$
0
0
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितच लढणार असून, आघाडीच्या जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

आज ठरणार नाशिकचा महापौर

$
0
0
बहुमताच्या त्रांगड्यात सत्तेचे गणित जमवून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. महायुतीला रोखण्यासाठी मनसे आघाडीचा हा ‘नाशिक पॅटर्न’ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार आहे.

नाशिक महापौरपदी मनसेचे मुर्तडक

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपमधील राजकीय घटस्फोटामुळे चुरशीच्या ठरलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर मनसेने बाजी मारली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे नाशिकच्या महापौरपदी राज यांचे शिलेदार अशोक मुर्तडक यांची निवड झाली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images