Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाण्यात २ दरोडेखोरांना अटक

$
0
0
शहरापासून जवळच असलेल्या यशवंतनगरमधील स्टेट बँके ऑफ इंडियाच्या शाखेत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने परिसरात दबा धरून बसलेल्या सहा दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात आले. मात्र, चार जण फरार झाले. त्यांचा शोध सुरू आहे.

चव्हाण-गावित भेटीने सटाण्यात चर्चेला उधाण

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री व भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश घेतलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांनी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांची त्याच्या कार्यालयात भेट घेवून चर्चा केली. यामुळे बागलाणच्या राजकीय पटलावर चर्चेला उधाण आले आहे.

वेतन थकल्याने शिक्षक आर्थिक विवंचनेत

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर उजाडला तरी थकले आहे. ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांचे पगाराविना प्रापंचिक हाल होताहेत.

अशोकनगर कोंडीच्या कचाट्यात

$
0
0
समृद्धनगर ते बारदान फाटा गंगापूररोडकडे अशोकनगरहून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व परिसरात राहणारे नागरिक हैराण झाले आहेत. अशोकनगरच्या या रस्त्याला पर्यायी असणारा डीपी रस्ता सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

औद्योगिक वसाहतीत शौचालयांची गरज

$
0
0
नाशिक जिल्हातील औद्योगिक वसाहतीत वाहनचालकांसाठी तसेच कामगारांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनचालक व कामगारांनी केली आहे. याबाबत महापाल‌िका व औद्योगिक विकास महामंडळाने दखल द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

दंड घटला; अनियमितता कायम

$
0
0
काम चुकार, लेटलतीफ तसेच दांडीबहाद्दर घंटागाडी ठेकेदारांकडून गेल्या आठ महिन्यात अवघा ३ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. घंटागाडींची अनियमितता कायम असताना दंडाचा आकडा तुलनेत कमी झाला असून, दंड भरण्यात पूर्व ​विभागातील ठेकेदाराने आघाडी कायम ठेवली आहे.

निवडणूक तक्रारींसाठी हेल्पलाईन

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात तक्रारी जाणून घेण्यासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.

जलसंपदाचा गोदाघाटावर ‘प्रकाश’!

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदाघाटाचा विस्तार करण्यासह या घाटालगत असलेल्या जागेचा विकास आणि याच परिसरात जलसंपदा विभागाकडून विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थात जलसंपदाकडून गोदाघाटावर प्रकाश पडणार आहे.

भूविकास बँकांचा फैसला ३० सप्टेंबरला

$
0
0
राज्यातील भूविकास बँकांसंबंधी राज्य सरकारने येत्या ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे भूविकास बँकांचा फैसला येत्या ३० सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

मतदार नाव नोंदणीसाठी १७ सप्टेंबरची डेडलाईन

$
0
0
विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव बंधनकारक असून, या यादीत नाव नोंदविण्यासाठी येत्या १७ सप्टेंबरपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी तातडीने नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘शिक्षणच्या’ बिलांना लेखा विभागाचा खोडा

$
0
0
शिष्यवृत्ती प​रीक्षांना बसणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे शुल्क कसे भरायचे? शिक्षण मंडळासाठी बजेटमध्ये ५० टक्के तरतूद कोणत्या आधारे होते?

निवडणुकीसाठी महापालिकेचे ९३० कर्मचारी

$
0
0
महापौरपद निवडणुकीतील राजकीय लढाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलीच थंड बस्त्यात गेली. आदर्श आचारसंहितेचा परिणाम महापालिकेच्या कारभारवर देखील झाला आहे.

काश्म‌िरी बांधवांना हवाय मदतीचा हात

$
0
0
गेल्या १७ वर्षांपासून जम्मू अन् काश्म‌िरच्या खोऱ्यात न‌िराधार मुलींसाठी काम करतोय. पण न‌िसर्गाचं इतक भयाण तांडक तिथे कधीही बघ‌ितलं नाही. सध्या पुराने माणसांचं आयुष्यच उद्ध्वस्थ करून टाकलं आहे.

मोबाइल चोरीप्रकरणी दोघांना अटक

$
0
0
खिशातील मोबाइल चोरल्याच्या संशयावरून इं‌दिरानगर पोलिसांनी झारखंड येथील दोघांना अटक केली आहे. पाथर्डी फाटा येथील मंडईजवळ रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा परिषदेत आघाडीत बिघाडीत?

$
0
0
नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. अडीच वर्ष राष्ट्रवादीने कारभारात विश्वासात न घेतल्याने काँग्रेस सदस्यांनी राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यास नकार दिला आहे.

स्थानिक नेत्यांनाही चढले स्फुरण

$
0
0
जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटण्याची शक्यता असल्याने शिवसेनेसह भाजपने प्रदेशपातळीवरच आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनाही स्फुरण चढले असून, पक्षाने आदेश दिल्यास जशास तसे उत्तर देण्याची तयारी चालवली आहे.

...जेव्हा वेताळाच्याच डोक्याची शकले होतात

$
0
0
नाशिकरोड कारागृहामध्ये उघड होणाऱ्या घटना पाहता राजा विक्रमादित्याला प्रश्न विचारून पेचात पाडणाऱ्या विख्यात वेताळाच्या डोक्‍याचीही शकले होतील, इतकी अफलातून शक्कल कैद्यांकडून लढविली जाऊ लागली आहे.

अनिल ढिकलेंवर काँग्रेसकडून कारवाईची तयारी

$
0
0
काँग्रेसचे नाशिक तालुकाप्रमुख व पंचायत समिती सदस्य अनिल ढिकले यांनी पंचायत समिती उपसभापतीच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरू केली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता कक्ष कार्यान्वित

$
0
0
शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम विकास कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागीय शैक्षणीक गुणवत्ता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या कलम ९ प्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज संस्थांची आहे.

खानापूर ग्रामसभेचा ठराव पोलिसांकडे पोहोचलाच नाही!

$
0
0
खानापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जुगार खेळला जात असल्याने, त्याचा बंदोबस्त करण्याचा ठराव १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत करण्यात आला होता. मात्र, हा ठराव पोलिस ठाण्याकडेच पोहोचला नसल्याची स्थिती आहे, तर ठराव होऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images