Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीचा काँग्रेसला दगा

0
0
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मित्रपक्ष काँग्रेसला चकवा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आपल्याच पक्षाचे सदस्य निवडून आणले आहेत.

तडीपारीचे २२ प्रस्ताव

0
0
विधानसभा निवडणूक काळात अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिला आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या परिमंडल एकच्या हद्दीतून आतापर्यंत १२ जणांना तडीपार करण्यात आले असून, २२ जणांचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

‘धर्मदाय आयुक्तालय सक्षम करण्याची गरज’

0
0
नाशिक येथील धर्मदाय आयुक्तालयातील अनेक पदे रिक्त असल्याने कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून नवीन नावनोंदणीची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी एनजीओ फोरमने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जनार्दन स्वामी जयंती महोत्सवाला प्रारंभ

0
0
जनार्दन स्वामी यांच्या शभंराव्या जयंती महोत्सवास रविवारी (२१ सप्टेंबर) प्रारंभ झाला. तपोवन येथील शर्वायेश्वर महादेव ट्रस्ट रोजी महानगर माहेश्वरी महिला मंडळाने सुंदरकांड सामुदायिक संगीतमय पाठ आयोजित केला.

सावन रुहानी मिशनतर्फे कार्यक्रम

0
0
जागतिक अध्यात्मिक गुरु संत राजिंदरसिंग महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली कॅम्प येथे सावन रुहानी मिशनतर्फे अध्यात्मिक सप्ताह साजरा केला. या मिशनची ५५ देशात सोळाशे केंद्र आहेत.

‘मुक्या प्राण्यांनाही समजून घेण्याची गरज’

0
0
‘शहरीकरणाच्या दुन‌ियेत माणूस आत्मकेंद्री होत चालला आहे. मानवी नात्यांमधील आत्म‌ीयताही कमी होते आहे. या स्थ‌ितीत मुक्या प्राण्यांचा व‌िचार तरी कोण करेल. स्वत:च्याही जगण्यापल‌िकडे पहा अन् मुक्या जीवांचा आधार बना’, असे आवाहन ज्येष्ठ सा‌ह‌ित्यीक चंद्रकांत महाम‌िने यांनी केले.

रेल्वे मजदूर संघातर्फे राष्ट्रीय युवक मेळावा

0
0
‘युवकांना प्रोत्साहन प्रोत्साहन दिल्यास ते आपले योगदान पूर्ण क्षमतेने देऊन देशाची प्रगती करतील,’ असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री प्रविण वाजपेयी यांनी येथे केले.

नेत्र तपासणी शिबिर

0
0
निर्मला लोककल्याण प्रबोधिनीतर्फे एकलहरे येथील भोर मळ्यात मोफत नेत्र तपासणी शिब‌िर झाले.

...पण श‌िक्षणाच्या नावाने चांगभले

0
0
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात त्वेषाने निवडणूक लढवली त्याच नेतृत्वाच्या मदतीने नाशिक मनपाची दुसऱ्या टर्मसाठीची सत्ता मनसेने पुन्हा मिळविली. या प्रकारचे सोयिचे राजकारण करायला आता कुठल्याच राजकिय पक्षाला जड जात नाही.

पितर आणि इतर…

0
0
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष म्हणजे पितरांना (व इतरांनाही ) संतुष्ट करण्याचा काळ, अशी परंपरा रूढ आहे. कावळ्याच्या रूपाने थेट पृथ्वीवर येवून पितरांच्या इच्छा पूर्ण होऊन व त्यांचा आत्मा तृप्त झाल्याने त्यांना मुक्ती मिळते, या धारणेतून पितृपक्ष पाळला जातो.

कोतवालांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश

0
0
राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार सत्तेत येण्यासाठी आपण मंगळवारी (दि. २३) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत. आपले सर्वांचे सहकार्य पुढील काळातही राहू द्या, असे आवाहन आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी देवळा येथील तुळजाई मंगलकार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी केले.

सटाणा शहरात साफसफाई मोहीम

0
0
सटाणा शहरात साथींच्या रोगांच्या नियंत्रणासाठी व डासांच्या निर्मूलनासाठी लोकसहभागातून पाच ट्रॅक्टर व ब्लोअरद्वारे तणनाशक व जंतूनाशक औषध फवारणीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे.

७० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

0
0
सटाणा शहर प्लास्टिककमुक्त करण्याची मोहीम यशस्वीपणे राबवित शहरातून सुमारे ६० ते ७० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही माहिती सटाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. संजय बागंर यांनी दिली.

ट्रॉमाकेअर युनिट बनले शोभेचे बाहुले

0
0
सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्गावरील सातत्याने अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने उभारलेले ट्रॉमाकेअर युनिट पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीअभावी रखडलेले आहे.

मनमाडमध्ये रिपाइंचा पाठिंबा

0
0
विधानसभा निवडणुकीत नांदगावमधून सेना-भाजप-रिपाइं महायुतीतर्फे जो उमेदवार देण्यात येईल त्याचे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार मनमाड येथील कार्यकर्ता बैठकीत जिल्हा संपर्कप्रमुख राजाभाऊ आहिरे यांनी व्यक्त केला.

येवल्यात 'एक खिडकी योजना'

0
0
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचाराकामी लागणारी विविध प्रकारच्या परवानग्यांची आवश्यकता लक्षात घेवून त्या सुविधा त्यांना मिळवून देण्यासाठी येवल्यातील निवडणूक यंत्रणेने येवला विधानसभा मतदारसंघात 'एक खिडकी योजना' सुरू केली आहे.

प्रगतीसाठी ऊस लागवडीची गरज

0
0
कादवा कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढले. काटकसर व पारदर्शी कारभार करीत कारखाना नफ्यात आणला आहे. कादवाला यंदाही ऑडीटमध्ये अ वर्ग मिळाला. मात्र, कादवाच्या प्रगतीसाठी ऊस लागवड करणे गरजचे आहे, असे आवाहन अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सभासदांना केले.

विद्यार्थी तीन, पुस्तक संच एक

0
0
पुस्तक खरेदीसाठी निधीची तरतूद होत नसल्याने अखेर एका सामाजिक संस्थेच्या मदतीने सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना तिघास एक संच अशा पध्दतीने पुस्तकाचे वाटप करून महापालिका शिक्षण मंडळाने स्कॉलरशिप परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचा दोन जागांसाठी जोर

0
0
काँग्रेस राष्ट्रवादीतील जागा वाटापाचा तिढा कायम असताना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघासाठी पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू झाला आहे.

उद्धव ठाकरेंची सभा १० ऑक्टोबरलाच

0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकमधील सभा १० ऑक्टोबरलाच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्यावतीने १० आणि ११ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी गोल्फ क्लब मैदानाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, महापालिकेने ११ ऑक्टोबरची परवानगी नाकारल्याने ही सभा १० ऑक्टोबरलाच होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images