Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिककरांचं आरोग्य प्रभारींच्या भरवशावर

$
0
0
प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांसह स्फाट नर्स, क्लार्क अशा विविध प्रवर्गातील निम्म्याहून अधिक रिक्त जागा तसेच आहे त्यांच्याकडे प्रभारी कामे, अशा परिस्थितीत महापालिकेचा वैद्यकीय विभाग कार्यरत आहे. कित्येक वर्षांपासून पुरेसे लिपिकच नसल्याने २०१२ पासून वैद्यकीय विभागाकडे किती कर्मचारी कार्यरत आहे, याची नोंद ठेवण्यात आलेली नाही.

स्वरगंगेच्या काठी वचन देणारा कवी निमाला

$
0
0
'स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या कवितेचे धनी, आपल्या अजरामर शब्दरचनांनी काव्य रसिकांवर गेली अनेक दशके गारूड करणारे मराठी कवितेच्या 'पालखीचे भोई' कविवर्य प्रा. शंकर वैद्य यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काव्यजगत पोरके झाल्याची भावना नाशिककर साहित्यिकांनी व्यक्त केली.

नारायण राणेंमध्ये उत्साह, कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह!

$
0
0
विधानसभेची निवडणूक अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव साजरा होतोय. विधानभवनाला राज्याची धुरा सांभाळणाऱ्यांची आस लागली आहे.

तिढा अडला मुख्यमंत्रीपदावरच

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्यासह अपक्षांच्याही जागा मागीतल्याने आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अडल्याची माह‌िती काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दिली आहे.

शेतकऱ्याला १० लाखांची भरपाई

$
0
0
शेतामधील तारांचे शॉटसर्किट होऊन डाळिंबाचे पीक आणि ठिबक सिंचन नळ्या जळून खाक झाल्या होत्या. संबंधित शेतकऱ्याला न्यायालयाने १० लाखांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक मंच न्यायालयाने विज वितरण कंपनीला दिला आहे.

संयुक्त पथक करणार पाहणी दौरा

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी प्रस्तावित कामांची पाहणी तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक नियोजन करण्यासाठी संयुक्त पथकाद्वारे पाहणी दौरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार हे पथक या आठवड्यातच दौऱ्याला सुरुवात करणार आहे.

MBAसाठी २७,२८ला सीमॅट परीक्षा

$
0
0
अख‌िल भारतीय तंत्रश‌िक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता असलेल्या एमबीए प्रवेशांसाठी द‌ि. २७ आण‌ि २८ सप्टेंबर रोजी कॉमन मॅनेजमेंट अॅडम‌िशन टेस्ट (सीमॅट) घेण्यात येणार आहे. यासाठी उत्तर महाराष्ट्रातून श्री महावीर तंत्रन‌िकेतनची न‌िवड करण्यात आली आहे.

१५० कोटींच्या कर्जासाठी खलबते

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर १५० कोटी रुपयांचे कर्ज उभारणीच्या कामास महापालिकेने गती दिली आहे. आज, आयुक्त सोनाली पोंक्षे-वायगणंकर यांनी काही बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पवारांनी उडवला आश्वासनांचा बार

$
0
0
मालेगाव स्फोटातील र्निदोष मुस्लिम तरुणांच्या सुटकेसाठी मी प्रयत्न करणार आहे. मालेगाव शहराच्या विकासासाठी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या पाठिशी उभे राहा.

भाजप उमेदवारांवर कांदे फेका

$
0
0
भाजपचे उमेदवार मते मागण्यासाठी दारात आले, की त्यांना कांदे फेकून मारा. बेशुध्द पडले तर तोच कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावा, अशा घणाघाती शब्दांत काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी भाजपवर थेट हल्ला चढविला.

टूथब्रशच्या संशोधनाचे पेटंट

$
0
0
नाशिकच्या केबीएच डेंटल कॉलेजचा विद्यार्थी, डॉ. अमोल जाधवने तयार केलेल्या पोटेन्शिओ (कायनेटिक ऑसिलेटिंग टूथब्रश) या टूथब्रशला दिल्लीत झालेल्या अॅन्युअल वर्ल्ड डेंटल काँग्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेमध्ये अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील २२ देशांनी सहभाग नोंदवला होता. तसेच या संशोधनासाठी अमोलला नॅशनल पेटंट मिळाले असून आंतरराष्ट्रीय पेटंटची प्रक्रिया सुरू आहे.

कोटमगावी जगदंबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

$
0
0
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या दर्शनासाठी सुमारे सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दांडियात भरणार राजकीय रंग

$
0
0
इगतपुरी शहरासह ग्रामीण भागात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली झाली असून शहरात दुर्गामातेच्या ठिकठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा उत्सव राजकीय लोकप्रतिनिधींकडून हायजॅक होणार आहे.

सप्तशृंग गड फुलणार भाविकांनी

$
0
0
उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत व साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा ऐन निवडणुकीत नवरात्रोत्सव होत असल्याने भाविकांच्या सोयीसुविधांसाठी राजकीय पदाधिकारी पुढे सरसावले आहेत.

मालेगावी घटस्‍थापनेची लगबग

$
0
0
शहर व परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी वेगाने सुरू आहे. देवी सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जवळपास सर्वच मंडळांनी आकर्षक रोषणाईवर भर दिला आहे. दरम्यान, बाजारात घटस्थापनेचे साहित्य, लाकडी व स्टीलच्या टिपऱ्या, विद्युत रोषणाईच्या माळा विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

चांदवडचे रेणुका माता मंदिर

$
0
0
नवरात्रोत्सवासाठी चांदवड सज्ज झाले आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी येथे मोठी गर्दी होत असते. नऊ दिवस येथे यात्रोत्सव भरतो. चांदवड, मालेगाव, निफाड, देवळा येथील भाविकांची संख्या अधिक असते.

मुल्हेर किल्‍ल्यावरील आशापुरी माता

$
0
0
बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील अतिशय निसर्गरम्य पर्वतरांगातील मुल्हेर किल्ल्याच्या मागील बाजूस पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र नरकोळ येथे नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे.

सिडकोत ३७ मंडळांची नोंदणी

$
0
0
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिडकोतील बाजारात घट आणि पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. मातीची मडके, दिवा, दांडिया, फुले, पूजा साहित्याने दुकाने सजली होती.

नवरात्रोत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज

$
0
0
नवरात्रोत्सवानिमित्त शहरात भरणाऱ्या यात्रा आणि ठिकठिकाणी रंगणाऱ्या दांडीयात्रेत अनूचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पुरेसा बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही सारखी सतर्क यंत्रणा या काळात संशयास्पद हालचालींवर नजर ठेऊन असणार आहे.

वाहतूक मार्गात बदल

$
0
0
नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होत असून जुना आग्रा रोडवर गडकरी चौकाजवळ कालिका मातेची आणि भगूर परिसरामध्ये रेणुका मातेची यात्रा भरणार आहे. दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नवरात्रोत्सव संपेपर्यंत येथील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images