Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सोशल मीडियावर ‘मंगल मंगल’

0
0
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले आणि भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा पहिला देश ठरला.

नोव्हेंबरमध्ये कृषीप्रदर्शन

0
0
मीडिया एक्झिबिटर्स व ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १८ नोव्हेंबर यादरम्यान ठक्कर्स मैदानावर कृषी २०१४ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये राज्यातील प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

अरिहंतर्फे कर्करोग चिकित्सा शिबिर

0
0
भारतीय संस्कृती दशॅन ट्रस्ट वाघोली, पुणे व अरिहंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी (२८ सप्टेंबर) सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत अरिहंत नर्सिंग होम, आकाशवाणी केंद्र येथे विनामूल्य कर्करोग चिकित्सा सल्ला शिबिर होणार आहे.

म्हाडातही लाचखोरीचा संसर्ग

0
0
म्हाडाची सदनिका खरेदी केल्याबाबतच्या हस्तांतराची नोंद घेण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या म्हाडाच्या उपसमाज विकास अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

महापालिकेचा स्वच्छता विभाग सलाईनवर

0
0
नाशिक महापालिकेच्या स्वच्छता विभाग हा रिक्त पदांमुळे सलाईनवर असल्याचे चित्र आहे. लोकसंख्येच्या मानाने शहराला पावणेचार हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, केवळ दोन हजार कर्मचाऱ्यांवरच स्वच्छतेचा भार आहे.

लाच स्विकारणारा हवालदार गजाआड

0
0
न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. नाशिक तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत गिरणारे दूरक्षेत्रामध्ये बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी साहित्यिक मेळावा

0
0
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन शनिवार, २७ आणि रविवार, २८ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. संमेलनाचे उद‌्घाटन अनिल अवचट यांच्या हस्ते होणार असून, मेळाव्याच्या अध्यक्षपदी डॉ. मीना वैशंपायन असतील.

बलात्कार प्रकरणी १० वर्षे कारावास

0
0
गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास १० वर्षांचा कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जुलै २०१३ मध्ये ही घटना घडली होती. दत्तु नारायण मते (४५, रा. मुरंबी, ता. इगतपुरी) असे त्याचे नाव आहे.

नाशिकच्या सेवेत पंचतारांकीत हॉटेल

0
0
नाशिक शहर हे विविध क्षेत्रात विकासाच्या मार्गावर असतानाच येथील हॉटेल उद्योगही फाइव्ह स्टार दर्जाकडे जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. सध्याचे ताज हॉटेल हे फाइव्ह स्टार दर्जाचे होतानाच आणखी एक फाइव्ह स्टार तर दोन थ्री स्टार हॉटेल नाशिककरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहेत.

घोलपांची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली

0
0
उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका फेटाळली आहे. त्यामुळे घोलपांचा निवडणूक लढण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद झाला आहे.

निवडणुकीसाठी जिल्ह्यात ११ निरीक्षक

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यात एकूण ११ निरीक्षकांची नियुक्ती केली असून, यातील तीन निरीक्षक नाशकात दाखल झाले आहेत. तर उर्वरित आठ निरीक्षक येत्या शनिवारी जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

पवार कुटुंबियांनी नेले बागलाणमधून अर्ज

0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बागलाणमधून आमदार ए. टी. पवार यांचे पुत्र प्रवीण पवार व जि. प. सदस्या भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे.

‘बागलाण विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या’

0
0
शेतकऱ्यांच्या कांदा व आणि डाळिंब पिकांच्या भावावर घाला घालणाऱ्या मोदी सरकार प्रणित भाजपाचे शासन सत्तेवर आणावयाचे की, शेती क्षेत्राची जाण असलेल्या शरद पवारांच्या विचारांचे पुरोगामी शासन महाराष्ट्रात सत्तेवर आणावयाचे याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले.

सोशल मीडिया बनला बदनामीचे माध्यम

0
0
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या सोशल मिडीयाद्वारे गैरसमज पसरविणाऱ्या मजकूराद्वारे बदनामी केल्या प्रकरणी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दहा जागांवर मैत्रीपूर्ण लढती?

0
0
विधानसभेसाठी एक एक जागा महत्वाची असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या एकमेकांच्या जागा ओढण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपाचा तिढा हा दोन्ही पक्षांची ताकद असलेल्या मतदारसंघावर अडल्याने अशा जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा विचार पुढे आला आहे.

बँक ग्राहकांची तारांबळ

0
0
पुढील आठवड्यात सहा द‌िवसांमध्ये केवळ दोन ते तीनच द‌िवस बँका सुरू राहणार असल्याने ग्राहकांची तारांबळ उडणार आहे. सलग आलेल्या सुट्या अन् याच कालावध‌ीत येणारे दसरा ईद यांसारखे सण यामुळे बँकेशी निगडीत व्यवहारांची गरजही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर भासणार आहे.

सहा इच्छुकांनी भरले अर्ज

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ९४ इच्छुकांनी बुधवारी २२१ अर्ज नेले असून, सहा जणांनी सर्वपित्री अमावस्या आटोपताच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नेल्याने तेही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एटीएमवर मतदानाचे काऊंटडाऊन

0
0
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. ती अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने नामी शक्कल लढविली आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या बँकांच्या एटीएममध्ये मतदानाचे काऊंटडाऊन लावण्यात येणार आहे.

ग्रामदेवता : काल‌िकादेवी

0
0
प्राचीन काळापासून वसलेल्या नाश‌िक नगरीची ग्रामदेवता म्हणून काल‌िका देवीला मान आहे. मुंबई नाका परिसरात असलेले हे जगदंबेचे स्थान जागृत आण‌ि नवसाला पावणारे म्हणूनही भा‌व‌िकांमध्ये व‌िख्यात आहे.

घुमरो घुमरो मारो घागरो

0
0
‘फोक’ गरबा ते ‘बॅले विथ गरबा फ्युजन’ अशा विविध गरबा प्रकारांची मेजवानी नाशिककरांनी मंगळवारी अनुभवली. निमित्त होते ‘महाराष्ट्र टाइम्स’ प्रस्तुत ‘रास गरबा’ वर्कशॉप स्पर्धेचे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images