Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिंहस्थासाठी एक टीएमसी पाणी राखीव

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन गंगापूर धरण समुहात एक टीएमसी पाण्याचे आरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय पालकमंत्री जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणी आरक्षणाबाबत घेतलेल्या बैठकीत दिली.

गुलाब देवकरांना चार सदस्यांची मंजूरी

$
0
0
जळगाव घरकुल घोटाळ्यातील संशयीत आरोपीच्या खटल्याचे कामकाज सोमवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात झाले. आमदार सुरेश जैन, माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह इतर चार संशयित आरोपी न्यायालयात हजर होते.

साधुग्रामबाबत ७ ऑक्टोबरला शेतकऱ्यांची बैठक

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात प्रस्तावित असलेली साधुग्रामची जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ७ ऑक्टोबरला ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

आज ‘राजीवची स्मरण मैफील’

$
0
0
‘चित्र तू नाट्य तू अजरामर मित्र तू’ असा साऱ्याच नाशिककर कलावंतांचा लाडका मित्र असलेला विख्यात दिग्दर्शक राजीव पाटील यांचा आज, ३० सप्टेंबर रोजी पहिला स्मरणदिन… अजूनही मित्र आणि आप्तस्वकीयांचा त्याच्या जाण्यावर विश्र्वास बसत नाही… कायमच क्रिएटीव्ह मित्रांना एकत्र बोलवून मैफील रंगवायला आवडणाऱ्या राजीवचा पहिला स्मरणदिन त्याच्या नाशिककर कलावंत मित्रमैत्रिणींनी अशाच गप्पांच्या, आठवणींच्या अनौपचारिक मैफीलीतून रंगवायचं ठरवलंय.

निफाड मतदारसंघात मतदार जागृती मोहीम

$
0
0
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अभियानाला निफाड मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी फलकांव्दारे नागरिकांना महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

... या ऋणांतून कसा होऊ उतराई!

$
0
0
अनाथ आश्रमात तो जेव्हा दाखल झाला, तेव्हा अवघा पाच-सहा वर्षांचाच होता. आईवडील लहानपणीच गेल्याने नातेवाईकांनी आश्रमात सोडून एक मोठं कुटूंब दिलं. तिथं आल्यावर आता तो एकटा नव्हता.

झेलमधलं दळण!

$
0
0
सकाळी उठल्यापासून ठकसेनचं अंग आज खूप दुखत होतं. (खरं तर त्याला आजपासून इतरांची अंग दुखवायची होती. तसं कामच त्याला मिळालं होतं.) गेलं दोन-चार दिवसांत त्याची पळापळ झाली होती. होम मिनिस्टरानं रात्री तेल अन् लाटण्यानं पाठीची मालिश करूनही त्याला आराम पडला नव्हता.

जिंकण्यासाठी वाटेल ते करा

$
0
0
निवडणुकीच्या प्रचाराला हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले असून, सर्वांपुढेच ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. त्यामुळे आपल्या हक्काचे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी ठोस व्यवस्था करा.

नांदगावमध्‍ये तिघे बाद

$
0
0
नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल ३२ उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारांचे अर्ज सोमवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरले. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. एम. गाडीलकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी सुदाम महाजन यांनी दिली.

चांदवडमध्ये ७ अर्ज अवैध

$
0
0
चांदवड देवळा मतदारसंघातील एकूण २५ उमेदवारी अर्जांपैकी ७ अर्ज छाननीत अवैध ठरले. डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, प्रवीण ठाकरे, गोविंद पगार, रमजान पठान, उदयकुमार आहेर, बाळासाहेब माळी यांचे अर्ज छाननीत बाद झाले.

नांदगावमध्ये रंगणार 'स्‍थानिक-उपरा' संघर्ष

$
0
0
नांदगाव मतदारसंघ यंदा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघात स्‍थानिक विरुध्द उपरा असा संघर्ष जोरू धरू लागला आहे. शिवसेनेतर्फे सुहास कांदे, भाजपतर्फे अव्दय हिरे, काँग्रेसतर्फे अनिल अहेर तर राष्ट्रवादीतर्फे पंकज भुजबळ यांच्यात लढत रंगणार असून आहेर-हिरे हे स्‍थानिक उमेदवार आहेत तर, कांदे व पंकज भुजबळ हे उपरे उमदेवार आहेत.

शिवसेनेचे मायक्रोप्लॅनिंग

$
0
0
विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होताच शिवसेनेने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग सुरू केले आहे. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी नाशिक मध्य विधानसभेचे उमेदवार अजय बोरस्ते यांच्या प्रचारासाठी बैठक घेवून प्रचाराचे नियोजन केले आहे.

पाणी कपातीची टांगती तलवार

$
0
0
पाणी आरक्षणात वाढ करण्यास नकार देणाऱ्या जिल्हा प्रशासनाने महापालिकेचा अतिरिक्त पाणी पुरवठा कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रती व्यक्ती १५० लिटर्स पाणी देणे अपेक्षित असताना, महापालिका सुमारे २०० लिटर्स प्रती व्यक्ती पाणी देत असल्याने जिल्हा प्रशासनाचा यावर आक्षेप आहे.

इगतपुरीत पोलिसाची आत्महत्या

$
0
0
इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत हवालदार विठ्ठल सखाराम जाधव (४८) यांनी पोलिस वसाहतीमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

तुळजाभवानी मंद‌िर

$
0
0
घनकर गल्लीतील तुळजाभवानी देवीचे मंद‌िर सुमारे दीडशे वर्षांपासून भाव‌िकांचे श्रध्दास्थान बनले आहे. या मंद‌िरातील काळ्या पाषाणातील तेजस्वी मूर्ती भाव‌िकांच्या मनाला अभय प्रदान करते.

प्रकाश जावडेकर आज नाशकात

$
0
0
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी पक्षाने मुलुख मैदान ही मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत पक्षाचे केंद्रीय मंत्री येत्या दोन दिवसात राज्यभरात प्रचार दौरे करणार असून याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे मंगळवारी नाशकात येणार आहेत.

शहरांचा विकास शाश्वत हवा

$
0
0
‘केंद्र सरकारने देशातील काही शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकस‌ित करण्याचे घोषित केले आहे. ही अत्यंत परिणामकारक बाब असून या शहरांचा विकास हा शाश्वत व्हायला हवा,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध आर्किटेक्ट हाफीद कॉन्ट्रॅक्टर यांनी केले.

भावनाशून्य पाल्यांना जिजाऊंची गरज

$
0
0
‘मार्कस आणि टक्केवारी याच्या रेट्यापुढे विद्यार्थी हे भावनाशून्य बनत आहेत. विद्यार्थ्यांमधील शुष्कता दूर करण्यासाठी आई-वडिलांचा विचारातही बदल होणे गरजेचे आहे. तसेच, आजच्या विद्यार्थ्यांना जिजाऊंसारख्या मातेची नितांत गरज आहे,’ असे प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे ड‌ीन सुरेश नेरकर यांनी केले.

वीज अभियंत्याला दीड वर्ष कारावास

$
0
0
इमारत‌ीमध्ये सिंगल फेजचे कनेक्शन देण्यासाठी ३ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ट अभियंत्याला न्यायालयाने दीड वर्ष कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नगरसेवक शेलार, शिंदे यांच्याविरुद्ध तक्रार

$
0
0
महापौर निवडणुकीत पक्षाविरुद्ध भूमिका घेणारे मनसेचे जेलरोडचे नगरसेवक निलेश शेलार आणि सौ. शोभना शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असा अर्ज मनसेतर्फे सोमवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना सादर करण्यात आला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images