Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिन्नरची वीज जाणार बाभळेश्वरला

$
0
0
इंडिया बुल्सच्या सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्पात निर्माण होणारी वीज बाभळेश्वरमार्गे राज्याच्या ग्रीडमध्ये समाविष्ट होणार आहे. यासाठी गुळवंच ते बाभळेश्वर दरम्यान टॉवरची उभारणी करण्यात आली असून येत्या रविवारपासून या टॉवरची टेस्टिंग करण्यात येणार आहे.

चुकीबद्दल प्रायश्चित्त

$
0
0
एखाद्या प्रसिध्द व्यक्तीने अनोळखी शहरात प्रमुख पाहुणा म्हणून जायचे म्हणजे नवी ओळख निर्माण करण्यासारखेच आहे. त्यातच पाहुणा असावा तिरसट व त्याला नियमाच्या नावाखाली अनेक त्रासाला सामोरे जावे लागले तर...!

'महिंद्रा', 'व्हिआयपी'त भरती

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अण्ड महिंद्रा लिमीटेड आणि व्हि. आय. पी. इंडस्ट्रीज लिमीटेड येथील रिक्त असलेल्या पदांची भरती होणार आहे. यासंबंधीची माहिती जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे प्राप्त झाली आहे. एकूण ३३५ जागांसाठी आयटीआय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

अनागोंदी कारभाराची चौकशी करा

$
0
0
अनागोंदी कारभारामुळे सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या धान्य वितरण कार्यालयाची सरकारी स्तरावरून गांभीर्याने चौकशी व्हावी, अशी मागणी 'दलित मुस्लिम क्रांती मंच'ने केली आहे. संघटनेने एजंटांसह सेतूच्या कार्यपद्धतीकडेही लक्ष वेधले आहे.

तलाठ्याच्या अंगावर ट्रक घातला!

$
0
0
चोरीच्या वाळूची विक्री रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडल अधिकारी आणि तलाठ्याच्या अंगावरच शुक्रवारी मनमाडच्या वाळू माफियांनी ट्रक घातला. यामध्ये हे दोघेही जखमी झाले असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

नाशिकचे सत्ता समीकरण बदलणार?

$
0
0
नाशिक पालिकेतील सत्तेत एकत्र असतानाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर केलेली टीका मनसेला भारी पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी पालिकेतील अपक्ष नगरसेवकांसह भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उध्दव यांच्याशी केलेली चर्चा भविष्यात महापालिकेतील सत्ता समीकरण तर बदलवणार नाही ना याची जोरदार चर्चा आहे.

आठ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेसच्या आठ मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांनी इतकी संपत्ती जमा केली आहे की त्याची मोजदाद करायलाही त्यांच्याकडे वेळ नसेल.

'अजब' पुस्तकांची गजब कथा

$
0
0
काही दिवसांपूर्वी शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये पुस्तकांची जोरदार विक्री सुरू होती. अनेकजण डोकावून जात होते. काहीजण खरेदी करीत होते, खरेदी करणाऱ्याच्या हातात पाचपेक्षा जास्तच पुस्तके दिसत होती.

फरार ज्वेलरविरोधात गुन्हा

$
0
0
सातपूर कॉलनीतील अनेक ग्राहकांचे जवळपास दीड कोटी रुपयांचे सोने लांबविणा-या ज्वेलरविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरार ज्वेलरचा सातपूर पोलिस शोध घेत आहेत.

'चायनीज' तपासणीची मोहीम सुरू

$
0
0
शहर परिसरात अनधिकृत आणि हानीकारक चायनीज पदार्थांची विक्री होत असल्याच्या 'मटा'तील वृत्त मालिकेची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोहीम सुरू केली आहे.

जिल्हा बँकेचे कामकाज विधिमंडळात गाजणार

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारबाबत माहिती मागविण्यात आल्यामुळे बँकेचे कामकाज विधिमंडळात गाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बँकेची महती राज्यभरातच जाणार असून याप्रकरणी कठोर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

रेल्वे सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणार

$
0
0
दहशतवादाचे आव्हान उभे ठाकल्याने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांनी ‌दिली.

शाळा खासगीकरणाविरोधात निदर्शने

$
0
0
महापालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाचा विषय राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याने या विषयाला विविध संस्थांच्या वतीने विरोध दर्शविण्यात येत आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळाही खासगी संस्थांच्या हाती देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

पोलिस हेडक्वार्टरमध्ये आता बचतगट

$
0
0
बु-हाणपूर येथील महिलांना गोधडी निर्मितीतून रोजगार मिळवून देणा-या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या ‌नीलिमा मिश्रा यांनी नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचा-यांच्या कुंटुबासाठी बचतगट सुरू करण्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांसाठी कृतीशील उपक्रम कार्यान्वित होणार

$
0
0
जिल्ह्यामधील पुणे विद्यापीठाशी संलग्न फार्मसी कॉलेज अणि विद्यापीठ विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी गुणवत्ता सुधार योजनेसाठी कृतीशील उपक्रम लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती पंचवटी फार्मसी क्लस्टरच्या बैठकीत देण्यात आली.

मांजरपाडाची झळ ग्रामस्थांना

$
0
0
सुरगाणा तालुक्यातील बहुप्रतिक्षित मांजरपाडा प्रकल्पांतर्गत केलेल्या भुसुरुंगांचा तडाखा परिसरातील ग्रामस्थांना बसत असल्याची तक्रार स्थानिक शेतक-यांनी शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्याकडे केली.

हे पाप कुठं फेडणार?

$
0
0
नाशिक नगरीचे जीवन अखंडीतपणे प्रवाही ठेवणारी गोदामाई गेल्या काही वर्षांपासून झगडतेय अशुध्द पाण्याशी. पवित्र म्हणून जिचा उल्लेख एकेकाळी होत होता तिच्या पाण्याला स्पर्श करताना भाविक नकळतपणे नाकावर हात लावतात.

पंचवटीला आणखी एक बोगी

$
0
0
नुकताच नाशिक-पुणे मार्ग मंजूर झाला असून त्या मार्गाचा व नाशिक-सिन्नर इंडिया बुल्स प्रकल्पाच्या मार्गाचा परस्पराशी संबध नसल्याचे मध्य रेल्वेचे मॅनेजर सुबोधकुमार जैन यांनी स्पष्ट केले.

पोट भरण्यासाठी करणार काय?

$
0
0
'ताई, कोणाला आवडतं आपलं घर-दार, शेती-वाडी, मुलं-बाळं सोडून यायला? पण जिथं शेतीला पाणी नाही, हाताला कामंच नाही, तिथं पोट भरण्यासाठी करणार तरी काय?' असा उद्विग्न सवाल शिवनाथ दहिफळे यांनी विचारला.

स्पीड ब्रेकरसाठी रस्तारोको

$
0
0
डी. के. नगर व परिसरातील रस्त्यांवर स्पीडब्रेकर व सिग्नल बसवावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी रास्तारोको केला. याठिकाणी १४ फेब्रुवारी रोजी ट्रक आणि रिक्षात झालेल्या अपघातात सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images