Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बांधकामासंदर्भात उद्योजकांना नोटिसा

0
0
सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील कंपन्यांनी वाढीव बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या सुमारे २३० व्यवसायिकांना नोटिसा बजावण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मुदतीनंतर देखील सादर न केलेल्या व्यवसायिकांना नोटिसा देण्यात येत आहे.

तपोवनाला छावणीचे स्वरूप

0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नाशिकमध्ये येत असून पंचवटीतील तपोवन परिसरात त्यांची सभा होणार आहे. सुरक्षेसाठीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून पोलिस बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

मोदींच्या सभेची जय्यद तयारी

0
0
भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, तब्बल दोन लाखाहून अधिक जण या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे पुन्हा तेच गाजर!

0
0
नाशिकला विमानसेवा सुरू करतानाच मुंबई आणि नाशिकसाठी जलदगती रेल्वेसेवेबरोबरच मोनोरेलही साकारण्याचे गाजर राष्ट्रवादी काँग्रेसने दाखविले आहे. सलग १५ वर्षे सत्ता असताना राष्ट्रवादीने हे करून दाखविलेले नसताना पुन्हा तीच आश्वासने देवून राष्ट्रवादीने नाशिककरांना भूलविण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा परिषदेत ‘नवी’ महाआघाडी

0
0
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीला शिवसेना, भाजपासह अपक्षांनी केलेल्या मदतीची परतफेड राष्ट्रवादीने विषय समित्यामंध्ये केली आहे. शनिवारी झालेल्या चार समित्यांच्या निवडीत राष्ट्रवादीने शिवसेना, भाजपा आणि अपक्षांना प्रत्येकी एक समिती देवून जिल्हा परिषदेत नवी महाआघाडी स्थापन केली आहे.

‘भाजपला महाराष्ट्र तोडायचाय’

0
0
‘भाजपला महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करायचा आहे. त्यासाठी भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसत युती तोडली.’ असा आरोप युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी केला आहे.

भुजबळ पुन्हा रिंगणात

0
0
‘ओबीसींचे मसिहा’ अशी बिरुदावली मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या छगन भुजबळ यांचा याच बहुमानामुळे लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात मराठा समाजाने पराभव केला.

... तर, ना‌शिकलाही ‘बेस्ट’ सेवा देणार

0
0
राज्यातील मंत्रालयात गेले पंधरा वर्ष पाकीटमार बसले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी भ्रष्टवादी पार्टी असल्याची टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी केली आहे.

भुजबळ ओबीसींचे नेते कसे?

0
0
येवलाः महात्मा फुलेंसारख्या क्रांतिकारी समाजसुधारकाचे नाव लावून आपल्या राजकीय स्वार्थासाठी स्थापन केलेल्या समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी स्वतःचा समाज सोडला तर इतर मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी असे कोणते काम केले म्हणून त्यांना आम्ही ओबीसींचे नेते म्हणावे, असा खडा सवाल धनगर उन्नती मंडळाचे येवले तालुक्याचे अध्यक्ष दत्ता वैद्य यांनी केला आहे.

नाशिकची जबाबदारी भरत पंड्यांकडे

0
0
महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी यंदा गुजराथी शिलेदारांकडे भाजपने जबाबदारी दिली आहे. नाशिकमध्ये प्रत्येक मतदारसंघासाठी गुजरातमधील तीन कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. गुजरात भाजपाचे प्रदेश महामंत्री भरत पंड्या यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मतदान चिठ्ठी वाटप संथगतीने

0
0
मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मतदानाच्या दिवशी होणारी झुंबड लक्षात घेऊन यंदापासून मतदार चिठ्ठी घरोघरी देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली असली तरी हे वाटप अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मतदार संभ्रमात असून मतदान चिठ्ठी मतदानापूर्वी प्राप्त होईल की नाही, अशी शंका मतदारांना वाटत आहे.

नाशिकरोडच्या दोघांचा कार अपघातात मृत्यू

0
0
मनमाड-नांदगाव रोडवरील पानेवाडीजवळ झालेल्या कार व टँकर यांच्यात झालेल्या अपघातात नाशिकरोड येथील दोघे जागीच ठार झाले तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत.

संभाजी पवारांच्या प्रचाराला कल्याणराव पाटलांचा नकार

0
0
गेल्या तीस वर्षांपासून निष्ठेने शिवेसनेचे काम करीत आहे. आपण शिवसेनेत असलो तरी, येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा प्रचार करणार नाही.

५५ हजार मते ठरणार निर्णायक

0
0
मत विभाजनाच्या सावटाखाली​ असलेल्या पश्चिम मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत तब्बल ५२ हजार ५४४ नवमतदारांची भर पडली आहे. पुरवणी मतदारयादीत आणखी ३ ते ४ हजार मतदारांची वाढ होण्याची शक्यता असून नवमतदारांची ही मते विजयी उमेदवारासाठी नक्कीच निर्णायक ठरू शकतात.

बालकाची सुटका; अपहरणकर्त्याला अटक

0
0
मित्राच्या दोन वर्षाच्या मुलाला घरी नेण्याच्या बहाण्याने अपहरण करून बालकासह आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या प्रमोद चव्हाण याला लासलगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

साहित्यभूषण परीक्षा लोकाभिमुख व्हावी

0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानची साहित्यभूषण परीक्षा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या लेखकांना विद्यापीठीय दर्जा मिळावा या हेतूने या परीक्षेची पुनर्रचना करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केले.

‘स्वप्न दाखवून अश्रू पुसणे अवघड’

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा लेखाजोखा जनतेला हवा आहे. केवळ न्यूयॉर्क आणि ब्राझीलची स्वप्ने दाखवून शेतकऱ्यांची अश्रू पुसली जावू शकत नाही, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मोदींवर केली.

सोमेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी पर्वणी

0
0
नाशिक शहरातील प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. सध्या ऑक्टोबर हिट त्रासलेले नाशिककर सायंकाळ अल्हाददायक करण्यासाठी धबधब्यावर गर्दी करत आहेत. त्यातच लागोपाट आलेल्या सुट्यांमुळे सोमेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

0
0
वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल तसेच ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरविण्यास महावितरण कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन नाशिक परिमंडळचे मुख्य अभियंता के. व्ही. अजळनाळकर यांनी आज केले.

मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

0
0
‘अच्छे दिन‘ येणार असे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींनी शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचे निर्णय घेतले. लोकसभेचा निकाल अनपेक्षित होता. यामुळे विधानसभेत मतदारांनी गाफील राहू नये, असे आवाहन माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images