Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अज‌ि, म्या पृथ्वीराज पाह‌िला…!

$
0
0
महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६४ वर्ष झाली. लोकसभा आणि विधानसभेच्या अनेक निवडणूकांमधून प्रचाराचा धुराळाही उडाला. सरकारे आली आणि गेली. पण हरसूल तालुकावासीयांनी कधी मुख्यमंत्री काय माजी मुख्यमंत्रीही पाह‌िला नव्हता.

चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल

$
0
0
‘पालघरचा सागरी प्रबोधिनी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये घेऊन गेले आहेत. मुंबईपेक्षा अहमदाबादचे आणि महाराष्ट्रापेक्षा गुजरातचे महत्त्व वाढविण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे.

भाजपा नेत्यांचा अट्टाहास नडला...

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी निवडलेले मैदान मुळातच चुकीचे असल्याचा पोल‌िसांसह सुरक्षायंत्रणांच्या सूचना होत्या. मात्र स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अतिआत्मविश्वास आणि अट्टाहासामुळे रविवारीच सभा रद्द होवून प्रशासकीय यंत्रणांसह सुरक्षायंत्रणांच्या मेहनतीवरही पानी फेरले गेले.

नाशकात मोदींच्या सभेवर फेरले पाणी

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेला अवघे तीन तास शिल्लक असतानाच वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने भाजपचे कार्यकर्ते अन् मोदीप्रेमींच्या आशेवर पाणी फेरले. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अर्धा तासातच मैदानावरच्या सर्व तयारीचा बोजवारा उडाला.

निष्पक्ष व्यासपीठावर नाशिककरांचा अजेंडा

$
0
0
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमधून विधानसभा निवडणूक प्रचाराचा फोकस नाशिकच्या विकासासंदर्भातील कळीच्या मुद्द्यांकडे वळविण्यासाठी आज, सोमवारी दुपारी चार वाजता यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगण, गोदाघाटावर ‘मटा डिबेट’चे आयोजन करण्यात आले आहे.

मोदी सभेसाठी बेकायदा वृक्षतोड

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी असलेल्या ५० ते ६० मोठ्या व जुन्या वृक्षांवर बेकायदा कुऱ्हाड चालविण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.

टोमॅटो शेड हट‌विण्याचे आदेश

$
0
0
पिंपळगाव बाजार समितीतील शौचालयाचे पाणी परिसरातील शेत व व‌िहिरीत उतरल्याने याविरोधात नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार कृषी विद्यापीठ समितीने दोन आठवड्यात न्यायालयाला अहवाल सादर करावा, तसेच पर्यावरण विभाग व प्रदूषण मंडळाने तातडीने कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

...अन् महावितरण कोलमडले

$
0
0
वादळी वाऱ्यासह दुपारच्या सुमारास अर्ध्या तास झालेल्या पावसाने नाशिककरांची त्रेधा उडवली. त्यानंतर महावितरणच‌‌ी व्यवस्था कोलमडल्याने अर्ध्या शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

अन् कार्यकर्त्यांचा हिरमोड

$
0
0
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातील भाजप कार्यकर्ते सभास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, अचानक सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि अर्धा तासातच होत्याचे नव्हते झाले.

मोदींच्या सभेवर पाणी

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक येथील जाहीर सभेला अवघे तीन तास शिल्लक असतानाच वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने भाजपचे कार्यकर्ते अन् मोदीप्रेमींच्या आशेवर पाणी फेरले. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अर्ध्या तासातच मैदानावरच्या सर्व तयारीचा बोजवारा उडाला.

मोदींनी रोखले आदित्यचे उड्डाण!

$
0
0
शनिवारी संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झालेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे रविवारी सकाळी विमानाने पुण्याला जाणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारीच नाशिकच्या दौऱ्यावर आल्याने आणि त्यांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) ओझर विमानतळाचा ताबा घेतलेला असल्याने आदित्य यांच्या विमानाला उड्डाणाची परवानगीच मिळाली नाही.

रिक्षाचालकावर विनयभंगाचा गुन्हा

$
0
0
रिक्षाला धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणी आणि तिच्या आईशी हुज्जत घालून विनयभंग करण्यात आला. ठक्कर बझार येथील हॉटेल राजदुतसमोर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.

नाशकात शुक्रवारी दिग्गजांची उपस्थिती

$
0
0
निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून, वातावरण बदलण्यासाठी राजकीय पक्षांकडून सभांचा धडाका लावला जात आहे. नरेंद्र मोदींच्या सभेमुळे धास्तावलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेही भाजपला जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.

उमेदवारांनी साधली ईदची पर्वणी

$
0
0
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सोमवारी काही उमेदवारांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या तर काहींनी प्रचार फेऱ्या काढल्या.

मतदार याद्यांचा घोळ जैसे थे!

$
0
0
मतदान स्लीप आणि नवीन मतदारांचे मतदान ओळखपत्र वाटप करण्याच्या मोहिमेला अल्प प्रतिसाद लाभला आहे. सिडकोतील विविध शाळांमध्ये ४ ते ६ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. मतदार यादी आणि ओळखपत्रांवर चुकीचे, अपूर्ण पत्ते असल्याने घरोघर जाऊन स्लीप वाटण्यास बीएलओंनी असमर्थता व्यक्त केली आहे.

कदम-मोगल-बनकर, तिरंगी होणार लढत!

$
0
0
बेरजेच्या राजकारणापेक्षा वजाबाकीचे राजकारण करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला चारी मुंड्या चीत करण्यात हातखंडा असलेल्या निफाड मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे वारे तप्त झाले असून, सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारात वेग धरला आहे.

ग्रामीण भागात प्रचाराचा जोर

$
0
0
कळवण-सुरगाणा मतदारसंघात ग्रामीण भागात प्रचाराचा जोर वाढला असून, सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन चौकप्रचार सभांचा धडाका लावला आहे. आदिवासी राखीव मतदारसंघात सप्तरंगी लढत असली तरी खरी लढत तिरंगी आहे.

परतीच्या पावसाने द्राक्षबागांना तुडविले!

$
0
0
पिंपळगाव बसवंतचा काही भाग, तसेच अंतरवेली, पाचोरा, मुखेड, आहेरगाव, जऊळके या गावांत तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. द्राक्षबागेत दीड ते दोन फूट पाणी साचले होते.

निवडणूक यंत्रणा कळवणमध्ये सज्ज

$
0
0
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, नवमतदारांना ओळखपत्र वाटप आदी कामे सुरू आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नाराज शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी

$
0
0
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना मतदारसंघातील राजकीय समीकरणेही बदलू लागली आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी असावा या उद्देशाने राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस पक्षातील नाराज गट आता शिवसेना उमेदवाराच्या मदतीला धावला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images