Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‌व‌िधानसभेचे अंदाज वर्तवा अन् ज‌िंका २१ लाख

$
0
0
व‌िधानसभा न‌िवडणुकांचे न‌िकाल अचूकपणे नोंदवा आण‌ि २१ लाख रुपये ज‌िंका, असे आवाहन अंधश्रध्दा न‌िर्मूलन सम‌ितीने ज्योत‌िष अभ्यासकांना द‌िले आहे. फलज्योतीष शास्त्र नसल्याचा दावा अंन‌िसच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे.

साधुग्रामबाबत आज शेतकऱ्यांशी चर्चा

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अधिग्रहित करावयाच्या साधुग्राम जमिनीबाबत आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. जमीन अधिग्रहणाच्या नोटिसा देण्यात आलेले शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

मूकबधीर असोसिएशनचे डिसेंबरमध्ये अधिवेशन

$
0
0
राज्यस्तरीय कर्णबधीर असोसिएशनची बैठक नुकतीच शरणपूर रोडवरील रचना विद्यालयात होऊन डिसेंबर महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अधिवेशनाबाबत चर्चा झाली. यावेळी आयोजित चर्चासत्रावर व महाराष्ट्र सरकारकडे देण्यात येणाऱ्या निवेदनाबाबत विचार विनिमय करण्यात आला.

स्वच्छतेच्या ध्यासातून साकारले ‘निर्मलग्राम’ केंद्र

$
0
0
निलवसंत मेडिकल फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार निर्मल ग्राम निर्माण केंद्राला आज कालिदास कलामंदिर येथे (७ ऑक्टोबर) प्रदान केला जाणार आहे. यानिमित्त निर्मल ग्राम निर्माण केंद्राविषयी..

‘न्यायालयीन’ पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश

$
0
0
नाशिक जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्प्लेंडर हॉल येथे संपन्न होऊन त्यात ११ टक्के लाभांश जाहीर झाला. संस्थेचे अध्यक्ष माधव राऊत यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

गोदामाईच्या साक्षीने विकासाचा अजेंडा सादर

$
0
0
प्रत्येक निवडणुकीत जनतेला केवळ फसव्या आश्वासनांची व खोट्या जाहिरनाम्यांची खैरात करणाऱ्या राजकीय पक्षांनी सोमवारी गोदामाईच्या साक्षीने मटा डिबेटच्या व्यासपीठावर प्रथमच नाशिकच्या विकासाचा अजेंडा सादर केला.

चव्हाण, बोरसेंवर गुन्हे दाखल

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या व शिगेला पोहचलेल्या निवडणुकीत आजी व माजी आमदांराविरुध्द आदर्श आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

शक्तीप्रदर्शनावर मर्यादा!

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाचे उमेदवार आणि राजकीय पक्षांचे स्वप्न काहीसे धूसर होण्याची चिन्हे आहेत. एकाचवेळी अनेक पक्ष आणि उमेदवार रॅलीची परवानगी मागण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात प्रशासनाकडून लवकरच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली जाणार आहे.

उमेदवार : परप्रांतीयांवर डोळा

$
0
0
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता फार तर आठ ते नऊ दिवस बाकी असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारासाठी दिवस-रात्र एक करण्यास सुरूवात केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदानाची टक्केवारी नेमकी किती राहील याची सर्वांना धास्ती आहे.

नाल्यात बुडून मुलीचा मृत्यू

$
0
0
येवला तालुक्यातील सातारे गावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा नाल्यावर बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे एका मुलीचे प्राण वाचविण्यात यश आले.

क्रीडा धोरण प्रशासनाच्या हाती

$
0
0
जुलै महिन्यात महासभेने मंजुरी दिलेल्या क्रीडा धोरणाचा ठराव तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रशासनाच्या हाती पडला आहे. आता हा प्रस्ताव नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंजुरीसाठी मुंबईला रवाना होणार असून, आणखी किती महिने प्रतीक्षा पहावी,​ असा प्रश्न क्रीडा संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

भाजपला आस कमळ फुलण्याची

$
0
0
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात संभाव्य मोदी लाटेचा अचूक अंदाज करून डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यांची कन्या डॉ. हीना यांना भाजपमध्ये पाठविले आणि आपल्या वैयक्तिक ताकदीवर डॉ. हीना यांना निवडूनही आणले.

बूथ कार्यकर्तेच पक्षाची खरी ताकद

$
0
0
निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष बूथवर जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्षाची खरी ताकद असलेल्या या बूथ कार्यकर्त्यांमुळे विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन नांदगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप मित्रपक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांनी मनमाड येथे केले.

चांदवड-देवळ्याच्या विकासासाठी डॉ. राहुलला निवडून द्या!

$
0
0
केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्प, मांजरपाडा दोनच्या पूर्णत्वासह चणकापूर वाढीव उजव्या कालव्याच्‍या कामास गती देण्यासाठी व चांदवड-देवळा तालुक्याचे नंदनवन करण्याचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आरोग्य मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी केले.

आंबेडकरांच्या विचाराचे सरकार आणा

$
0
0
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आल्यापासून भारतात छुप्या मार्गाने हुकूमशाही सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांचे नव्हे तर, भांडवलदारांचे भले होणार आहे.

मालाची परस्पर विल्हेवाट

$
0
0
कुक्कुट पालनाच्या व्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री कंटेनरमध्ये पाठविण्यास महिना उलटूनही ती अजून शारजाह येथे पोहोचलेली नाही. त्यामुळे सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

$
0
0
विद्युत पुरवठा का खंडित झाला याचा शोध घेत असताना विजेचा शॉक लागून खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सातेकोने गावामध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. हेमंत नामदेव कुंभार (३५, रा. ठाणापाडा) असे त्यांचे नाव आहे.

डोक्यावर खुर्च्या अन् नजरेत मोदींचीच आस

$
0
0
रव‌िवारची रद्द झालेली सभा मंगळवारी पुन्हा होणार का? या प्रश्नाकडे नाश‌िकसह ज‌िल्ह्याचे लक्ष लागले होते. दुपारनंतर शहरात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी द‌िल्याने मोदी चाहत्यांचा ह‌िरमोड झाला होता.

सप्तशृंगी चरणी १.५ लाख भाविक नतमस्तक

$
0
0
सप्तशृंग गडावर कोजागिरी पोर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या नदीमधून कावडधारकांनी आणलेल्या पवित्र जलाने आदिशक्ती सप्तशृंगी मातेवर जलाभिषेक करण्यात आला. कोजागिरी पोर्णिमा व मंगळवार असल्यामुळे गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

जाहिरात विडंबन करतेय मनोरंजन

$
0
0
भाजपने ज्या सोशल मीडियाच्या बळावर लोकसभा सर केली, तोच सोशल मीडिया आता विधानसभा निवडणुकीत भाजपावर पलटला आहे. आर..कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा..ही जाहिरात सध्या टीकेचे लक्ष बनली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images