Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनपा कर्मचारी : बोनस दिवाळीतच

$
0
0
महापौरपद निवडणुकीच्या ऐन धामधुमीत जाहीर करण्यात आलेले सानुग्रह अनुदान (बोनस) महापालिका कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या दोन दिवस अगोदर मिळण्याची शक्यता आहे.

साधुग्राम प्रश्न सरकार दरबारी

$
0
0
साधुग्रामसाठी आवश्यक जागा तात्पुरत्या स्वरुपात नाही तर कायमस्वरुपी घेण्याची एकमुखी मागणी शेतकरी आणि जागा मालकांनी केली. त्यामुळे याप्रश्नी राज्य सरकारकडे शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

... तर बसपाला द्या साथ

$
0
0
महाराष्ट्रात ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यांसारख्या समस्यांपासून जनतेला मुक्ती देण्यासाठी बसपाच्या हाती सत्ता सोपवा, असे आवाहन या पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी नाशिकरोड येथे केले.

कांदा, द्राक्षासाठी नवे धोरण ?

$
0
0
कांदा आणि द्राक्षाच्या समस्या सोडवितानाच ही दोन्ही पिके परदेशात अधिकाधिक निर्यात होण्यासाठी पोषक वातावरण तयार करतानाच शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत दिली.

भाजपला आस कमळ फुलण्याची

$
0
0
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात संभाव्य मोदी लाटेचा अचूक अंदाज करून डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यांची कन्या डॉ. हीना यांना भाजपमध्ये पाठविले आणि आपल्या वैयक्तिक ताकदीवर डॉ. हीना यांना निवडूनही आणले.

सेना २०० जागा जिंकणारः राऊत

$
0
0
या निवडणुकीत शिवसेनेला १८० ते २०० जागा मिळणार असल्याने कुणाच्याही कुबड्यांची गरज भासेल, असे वाटत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, ही शिवसेनेची आणि जनतेची इच्छा आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

गुलाम नबी आझादांची आज मालेगावात सभा

$
0
0
सर्वच राजकीय पक्षांनी मालेगाववर लक्ष केंद्रीत केले असताना काँग्रेसही या स्पर्धेमध्ये उतरली आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद गुरूवारी मालेगावात सभा घेणार आहेत. त्यामुळे मालेगावचा राजकीय आखाडा अधिकच तापणार आहे.

सिन्नरकर कुणाला पाजणार पाणी?

$
0
0
दुष्काळी असलेल्या सिन्नर मतदारसंघात स्वार्थाची राजकीय पोळी भाजणाऱ्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाणी पाजण्याची ताकद सिन्नरकरांमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटलेला नाही.

मध्य नाशिकमध्ये कांटे की टक्कर!

$
0
0
आघाडी आणि महायुतीच्या ताटातुटीमुळे नाशिक मध्य मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची बनली असून, सुरुवातीला पंचरगी वाटत असलेली लढत आता काटाकाटीमुळे चौरंगी झाल्याचे चित्र आहे.

डॉ. आहेर यांचा देवळ्यात प्रचार दौरा

$
0
0
चांदवड-देवळा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी विठेवाडी, भऊर, खामखेडा, सावकी, मटाने, वरवंडी, वाजगाव, खर्डा, मुलुखवाडी, शेरी, वडाळा, कनकापूर, कांचने, झिरेपिंपळ, वार्शी, हनुतंतपाडा आदी गावात प्रचार दौरे काढून मतदारांच्‍या गाठीभेटी घेत विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रचारगीते ठरताहेत लक्षवेधी

$
0
0
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्वच उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत.

भुजबळ नावाचे अरिष्ट हद्दपार करा

$
0
0
गेल्या दहा वर्षात छगन भुजबळांनी एकछत्री अंमल निर्माण करताना येथील राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्याना विविध मार्गाने त्रस्त करीत सार्वजनिक जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. स्वपक्षाच्या बलाढ्य उमेदवारांना समता परिषदेच्या माध्यमातून विरोधी कारवाया करीत पराभूत केले.

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे कधीही भले होणार नाही

$
0
0
विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत भांडी घासायला लावल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे कधीही भले झालेेले नाही. यामुळे भाजपनेही मस्तीत राहू नये, असा इशारा शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिला.

नाशकात पावसाची हजेरी

$
0
0
नाशिक जिल्‍ह्यात बुधवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी रिपरिप सुरू होती. मनमाड, कळवण, सटाणा, मालेगाव, त्र्यंबकेश्वर तसेच इतरही भागात पावसाने हजेरी लावली.

बागलाण मतदारसंघात उमेदवारांचा होम टू होम प्रचारावर भर

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली, चौकसभा आदींनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सटाण्यात होम टू होम भेटीची संकल्पना राबविली आहे. तर, अन्य पक्षांनी तालुक्यातील गावागावांत भेटींवर भर दिला आहे.

भाजपला विस्ताराची आशा

$
0
0
पावसाचा व्यत्यय असतांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेवून उमेदवारांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

मायावतींनी पुन्हा खेळले सोशल इंजिनीअरिंगचे कार्ड

$
0
0
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत झालेला बेबनवाचा लाभ उठविण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनीअरींगचे कार्ड खेळले आहे.

नरेंद्र मोदी आज पुन्हा नाशिकमध्ये

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा झंझावात सुरू केल्याने नाशिकसाठी त्यांचा तिसऱ्यांदा दौरा नियोजित झाला आहे. मंगळवारीच नाशकात सभा झाल्यानंतर मोदी हे गुरुवारी, ९ ऑक्टोबरला पुन्हा ओझर विमानतळावर येणार आहेत.

नरेंद्र मोदींवरील टीका ही तर लोकभावना

$
0
0
शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली जाणारी टीका ही लोकभावना व देशभावना असल्याचा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांच्या शनिवारी ३ सभा

$
0
0
प्रचाराच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेरच्या टप्प्यात मुसंडी मारणार असल्याची चिन्हे असून राज ठाकरे यांच्या शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी तीन सभांचे आयोजन केले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images