Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नासीर पठाणला न्यायालयीन कोठडी

0
0
कैदी पार्टीतील पीएसआयवर प्राणघातक हल्ला करणा-या नासीर पठाण यास शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारवाडा पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री अटक केली होती.

पायांच्या बोटांवर सुरू तिची लढाई

0
0
नाशिकमधील शासकीय कार्यालये, बँका, पोस्ट ऑफिस व सिव्हील हॉस्पिटलबाहेर ‘त्या’ अपंग आणि ज्येष्ठांच्या गर्दीत हरवलेल्या दिसून येतात. जवळ गेल्यावर लक्षात येते की पायाच्या अंगठ्यात पेन धरून गरजूंना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्या झगडत आहेत. स्वतःला दोन्ही हात नसतानाही त्या मनाने अन् संवेदनांनी अपंग झालेल्या समाजात खंबीरपणे उभ्या आहेत… गेली दहा वर्षे त्यांचा हा लढा सुरू आहे!

बँक सुरक्षेसाठी पोलिस तैनात

0
0
शहरातील बँकामधून काढलेल्या पैशांवर डल्ला मारणा-या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी बँके तसेच त्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यास सुरूवात केली आहे. याबाबत 'मटा'ने 'चोरट्यांचे सॉफ्ट टारगेट' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते.

भूखंड घोटाळा पोहोचला विधानसभेत

0
0
कधी तलाठी, सर्कल तर कधी खुद्द प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांच्या कृपेने वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या ओढा व सय्यदपिंप्री जमीन घोटाळा अखेर विधानसभेपर्यंत पोहोचला आहे. या घोटाळ्याप्रश्नी शिवसेनेचे आमदार अनिल कदम व धनराज महाले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून बाजू मांडली जाणार आहे.

ओझर विमानतळ उभारणीला गती

0
0
मुंबई विमानतळाला पर्यायी विमानतळ ठरू शकणा-या ओझर येथील विमानतळ टर्मिनलच्या उभारणीला गती मिळाली असून, ते काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिले.

'सेट टॉप' करणार पर्दाफाश

0
0
केंद्र सरकारने देशभरात 'सेट टॉप बॉक्स' (एसटीबी) बसविण्याचा निर्णय घेतला आणि कमी ग्राहकसंख्या दाखवून परस्पर अर्थकारण साधणा‍ऱ्या ऑपरेटर्सना मात्र चांगलाच धक्का बसला आहे.

सव्वादोन लाखांचा अपहार

0
0
पेठरोडवरील आरटीओ कार्यालयात आरसी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) स्मार्ट कार्ड देण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीमधील कर्मचा-याने २ लाख २० हजार ४५० रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण रविवारी उघडकीस आले.

टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फी माफ

0
0
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून जागोजागी पाण्याचे, चाऱ्याचे दुर्भिक्ष्य आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.

सिटीबसमधून दीड लाखांची चोरी

0
0
पंचवटी कारंजा बस स्टॉप ते त्र्यंबक नाका या दरम्यान सिटीबसमधून प्रवास करणा-या प्रवाशाचे दीड लाख रूपये चोरट्यांनी चोरी केले. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली.

पुणे विद्यापीठात येत्या वर्षापासून बारकोड पध्दती

0
0
पुणे विद्यापीठांतर्गत चालू शैक्षणिक वर्षापासून होणा-या सर्व विद्याशाखांच्या परीक्षांसाठी बारकोड पध्दती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

स्वा. सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी प्रयत्न करू

0
0
प्रखर देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेबरोबरच सावरकरांमध्ये महान समाजसुधारकही दडला होता. स्वा. सावरकरांसोबतच्या भेटीने राष्ट्रपिता महात्मा गांधीही अत्यंत समाधानी झाले होते. सावरकरांमधील या सर्व पैलूंचा अभ्यास आणि आचरण नव्या पिढीने करावे, असे आवाहन करतानाच स्वातंत्र्यवीरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सरकारी स्तरावर नेटाने प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

तुजविण जीवलग दुजें कोण होईल

0
0
भजनसम्राट पंडित शंकरराव वैरागकरांचा स्वर व या मखमली स्वराला गायत्री जोशी यांची साथ असा अनोखा माहोल जमून आला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पंडीत शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठान आणि अथर्व संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'गुरुवंदना' या संत रचनांवर आधारित मैफलीत.

तुटीचा अर्थसंकल्प सादर

0
0
उत्तर महाराष्ट्र विदयापीठाचा २०१३- १४ चा १२९२.९५ लक्ष रूपयांचा तुटीचा अर्थसंकल्प शनिवारी विदयापीठाच्या सिनेटच्या सभेत मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम होते.

जळगाव जिल्हयात अवकाळी पाऊस

0
0
जळगाव जिल्हयाला शनिवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला जिल्हयात वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर केळी हरबरा गहू या पिकांचे नुकसान झाले . भुसावळ ,यावल ,रावेर बोदवड ,अमळनेर चोपडा तालुक्यात शनिवारी वादळी वा-यांसह पाऊस झाला.

खान्देशात वीज पडून तिघांचा मृत्यू

0
0
खान्देशाला शनिवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगाव जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर केळी हरबरा गहू या पिकांचे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातही वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

शेतक-यांवरील आरोप मागे घ्या

0
0
पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याची चोरी केल्याच्या आरोपाखाली निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यात याव्या. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी निफाड उपविभागीय अधिकारी व तहसिदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पंचवटीतील जुगार अड्ड्यावर छापा

0
0
पंचवटीतील पेठरोड येथील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी १४ जणांना अटक करीत ४८ हजार रूपये जप्त केले. पेठरोडवरील शनिमंदिराच्या पाठीमागे असलेल्या समाज मंदिराजवळील एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांना मिळाली होती.

अखेर झेब्रा क्रॉसिंग अवतरले

0
0
शहरातून झेब्रा क्रॉसिंग हद्दपार झाल्यानंतर केवळ पोलिस आयुक्तांचे घर आहे म्हणून सर्व नियम पाळणा-या प्रशासनाला मटाच्या वृत्तानंतर जाग आली आहे. भोसला सर्कल ते एबीब सर्कल दरम्यान महापालिका आणि वाहतूक विभागाने झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले आहेत.

उत्तरपत्रिका बिनचूक तपासा

0
0
ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी निर्धारीत वेळेतच बारावीच्या उत्तर पत्रिका तपासाव्यात अशा कानपिचक्या नियामकांनी दिल्या. ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी उत्तर तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे लांबलेली नियामकांची सभा रविवारी घेण्यात आली यावेळी या सूचना देण्यात आल्या.

भाजी ओट्याचा डोळस निकष

0
0
सातपूरमधील एका प्रभागातील मोकळ्या भूखंडावर भाजी बाजार प्रस्तावित करण्यात आला. त्यासाठी या भूखंडावर ओट्यांची निर्मिती करण्यात आली. आता हे ओटे द्यायचे कुणाला असा प्रश्न निर्माण झाला. मग, काही तरी पात्रता किंवा निकष असणे आवश्यक असल्याने या भागातील नगरसेवकाने कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images