Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व‌िद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक

$
0
0
वाढीव फीच्या मुद्यावरून यंदाच्या शैक्षण‌िक वर्षाच्या सुरुवातीला वादात सापडलेली सेंट फ्रान्स‌िस शाळा अद्यापही व‌िद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.

‘महापालिकेकडून वृक्षारोपणाची हमी घ्या’

$
0
0
महापालिकेला तोडाव्या लागणाऱ्या २,०१४ झाडांमागे २०,०१४ झाडांचे वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याची मागणी सेवास्तंभ या सामाजिक संघटनेने मुख्य वनसंरक्षकांकडे केली आहे. विविध रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेला हजारो झाडे तोडावी लागणार आहेत.

‘मध्य नाशिक’मध्ये मनसेचा वैयक्तिक भेटीगाठींवर भर

$
0
0
विधानसभा मतदानास अवघे चार दिवस राहिले असल्याने निवडणुकीने रंग भरला आहे. नाशिक मध्य मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान आमदार वसंत गिते यांनी गल्लीबोळ, वाड्या वस्त्यांवर वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला असून त्यांच्या सोबत मतदारही सहभागी होत आहे.

वृंदावन नगरात तरुणांची PSI ला धक्काबुक्की

$
0
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करीत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की आणि दमदाटी करण्यात आली. आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत‌ील वृंदावन नगरमध्ये हा प्रकार घडला.

भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी भाजपला साथ द्या

$
0
0
गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर केला. भ्रष्टाचाराने हे राज्य पोखरून टाकले. आज ते मोदींकडे १०० दिवसांचा हिशेब मागत आहेत. पण, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या या भ्रष्ट सरकारला घरी पाठवा.

बदलाची परंपरा टिकणार, की इतिहास घडणार?

$
0
0
इगतपुरी विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील सर्वाधिक विस्तीर्ण मतदारसंघ आहे. आदिवासी मतदारसंघ असूनही निर्णायक मतदार मात्र बिगर आदिवासी असतो. या मतदारसंघात काहीसे जातीपातीचे राजकारण चालते.

पाणी कराराविषयी माहिती द्या

$
0
0
इंडिया बुल्स आणि एनटीपीसीशी झालेल्या पाणी कराराबाबत माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. गोदाप्रदूषणाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान पाणी कराराचा मुद्दा समोर आल्याने कोर्टाने सरकारला आदेश दिले.

सातपूरसह पश्चिम भागात उद्या पाणीपुरवठा बंद

$
0
0
बळवंतनगर जलकुंभाजवळील कार्बन नाका ते रामराज्य जलकुंभ भरणाऱ्या ५०० एमएम व्यासाच्या पाईपलाईनवरील गळती बंद करण्यासाठी तसेच, पाईललाईन जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन १२ ऑक्टोबर रोजी काम सुरू करणार आहे.

‘अच्छे‌ दिन’चे स्वप्न सत्यात उतरलेच नाही

$
0
0
भारतातील जनता, महागाई, बेकारीमुळे वैतागली आहे. मोदी सरकारच्या राजवटीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून माणसांचे भाव मात्र कमी झाले आहेत. मोदी सरकारचे अच्छे दिनाचे स्वप्न सत्यात उतरलेच नाही, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

कोणाच्या हातात देणार महाराष्ट्र माझा!

$
0
0
सिंहस्थासाठी निधीची गरज असताना केंद्र सरकारने एक पैसा दिला नाही. केंद्राचे मंत्री राज्यात गल्लोगल्ली फिरत असताना सिंहस्थासाठी निर्णय घ्यायला वेळ नाही. कांद्याचा प्रश्नही त्यांना सोडवायचा नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

ई स्कॉलरशीपसाठी ONLINE अर्ज

$
0
0
भारत सरकार मॅट्रीकोत्तर श‌िष्यवृत्ती व श‌िक्षण फी या योजनेसाठी २०१४-१५ या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ई श‌िष्यवृत्तीसाठी व‌िद्यार्थ्यांनी mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आावाहन समाजकल्याण व‌िभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात आज वीजपुरवठा बंद

$
0
0
वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी महावितरण आज, शनिवारी दुरुस्तीची कामे हाती घेणार आहे. यासाठी शहरातील व ग्रामिण भागातील वीजपुरवठा खंडित रहाणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

१५० टन कचरा पडून

$
0
0
पगारी रजेच्या वेतनाचे पैसे ठेकेदाराने द्यावे, अशी मागणी करीत घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी तीन विभागात चक्का जाम आंदोलन केले. यामुळे सातपूर, सिडको आणि पश्चिम विभागातील सुमारे १५० टन कचरा पडून राहिला.

अबू जुंदालचा जामीन फेटाळला

$
0
0
नाशिकमधील महत्वाच्या स्थळांची रेकी केल्याप्रकरणी ऑर्थररोड कारागृहामध्ये असलेल्या अबू जुंदाल याचा जामीन अर्ज शुक्रवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. या खटल्याची लवकरच सुनावणी सुरू होणार असून जुंदालही त्यास उपस्थित राहणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

`डी. जी`, मेंगाळ यांची हकालपट्टी

$
0
0
विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी आणि इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पाक, चीनविरोधात गप्प का?

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली छबी आणि मार्केटिंग खराब होवू नये, म्हणून ते पाकिस्तान आणि चीनविरुद्ध बोलण्याचे टाळत आहेत. त्यांचा दिखाऊपणा आता उघड झाला असून, भाषाही बदलली आहे.

जैन कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची लढाई

$
0
0
घरकुल घोटाळ्यात धुळे कारागृहात असलेल्या सुरेश जैन यांच्या अनुपस्थित त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी जैन यांचे बंधू, मुलगा व पत्नी निवडणुकीच्या रणागणात उतरले आहे.

किनारपट्टीवर युद्धपातळीवर मदतकार्य

$
0
0
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले ‘हुदहुद’ चक्रीवादळ धडकण्यापूर्वी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे.

नावीन्यपूर्ण संकल्पनांतूनच पर्यटन विकास

$
0
0
नाशिक जिल्हा हा टूरिस्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखला जाणे आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधने आणि तीर्थाटनासाठी आवश्यक बाबी जिल्ह्यात आहेत. ठोस पाठपुराव्याअभावी नाशिकचा पर्यटन विकास होऊ शकलेला नाही.

वादळामुळे निवडणूक निरीक्षकही ‘रिकॉल’

$
0
0
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या हूडहूड वादळामुळे निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणुकीत नियुक्त केलेले तीन निरीक्षक रिकॉल केले आहेत. त्यात नाशिक आणि बीड जिल्ह्यातील निरीक्षकांचा समावेश आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images